Skip to main content

स्वरांजली

लेखक मिडास यांनी सोमवार, 27/03/2017 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट आणि रात्र या मधली वेळ. कशी कुणास ठाऊक आज अश्या अवेळी जाग आली तिला. कूस बदलून पाहते ती, पण निद्रादेवी काही प्रसन्न होत नाही. झोपडीचं दार उघडून ती बाहेर येते. आकाशात तारे मंद चमचमत आहेत. पहाटेच्या वाऱ्याने तिच्या अंगावर शहारा येतो. पदर गच्च आवळून घेत ती चालू लागते. कुठे जायचंय ठाऊक नाही पण ती चालू लागते. पहाटेच्या दवात भिजलेली मऊशार माती तिच्या पायाला पावलागणिक माखतेय. कसलास धुंद सुवास पसरलाय चहूकडे. त्या सुवासाने तिची आठवण जरा चाळवते. चंदनाचा सुवास. तिच्या मनात भरलाय तो वास. आठवणींच्या कपाटात ती धुंडाळतेय काहीतरी. आणि अचानक गवसते तिला ती नेमकी स्मृती.

त्यांना हे जमत कसं..?

लेखक Pradeep Phule यांनी सोमवार, 27/03/2017 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरचा माझा हा पहिला लेख. पण विषय कोणता निवडावा हा यक्षप्रश्न माझ्यासमोर आं वासून उभा होता. कारण मिपावर सर्व विषयांवर भरपूर प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. शेवटी विषय मिळालाच. ज्यांच्या कविता वाचून मी मोठा झालो, त्यांनाच निवडावं असं ठरवलं. यांच्या शिवाय मराठी साहित्य संस्कृती अपूर्ण आहे, असं म्हंटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्या म्हणजे "बहिणाबाई चौधरी". लिहायला सुरवात तर केली, पण शब्द मात्र ययातीतल्या अलका सारखे गट्टी फु करून बसलेत. माझं प्रत्येक वेळी असचं होतं, कोरा कागद समोर आला कि डोकं कसं अगदी बधिर होऊन जातं. आणि त्यांच्या बद्दल मी काय लिहावं. त्या म्हणजे शब्दांच्या पलीकडे आहेत.

निघाला (गजल)

लेखक संदीप-लेले यांनी रविवार, 26/03/2017 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याला हवे कळाया, तो भाबडा निघाला नको नेमका तो, मनकवडा निघाला त्याची अदा निराळी, मी लुब्ध आज झाले अंदाज हा चुकीचा, तो दारुडा निघाला नीती नियम सारे, त्याला जरी पढवले माणूस पाहण्याला, तो नागडा निघाला घेऊन कर्ज माथी, ते शेतात पेरले म्हशीला टोणगा, ढग कोरडा निघाला नागास पाहता मी, वार इतके केले घाव ज्यावरी झाला, तो केवडा निघाला शत्रूस पाजून पाणी, सैनिक तहानलेले नदीच्या पात्राचा रंग तांबडा निघाला देवास नवसून, ज्यास हुलकावले ‘तो’ पाहतो म्हणणारा शेंबडा निघाला (दोस्त हो, इथे नुकतेच पदार्पण केले. आणि इतरांच्या अतिशय सुंदर गजल वाचून प्रभावित झालो. ही माझी पहिलीच गजल आहे.

जिओच ठेवायचं की. . . .

लेखक उपयोजक यांनी रविवार, 26/03/2017 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
या ३१ मार्चला जिओची फुकट नेट योजना संपतेय.बहुतेक जणांनी भारतात स्मार्टफोनवर 4G इंटरनेट आणि मोफत कॉल्ससाठी ही "मोफतची" योजना वापरली.अर्थात जगात फुकट काहीच मिळत नाही.आपण काय सर्फिंग,डाऊनलोडींग इ.करतो त्याचा डेटा व्यवस्थित वर्गीकरण करुन आपल्यालाच वस्तू,सेवा विकण्यासाठी वापरला जातो.पण हा वेगळा विषय आहे. आतापर्यंत जिओ मोफत असल्यानं काही दोष नजरेआडही करण्यात आले,जसं की सर्फिंगचा वेग 4G चा वाटत नाही.जिओवरुन केलेला कॉल बर्‍याचदा ड्रॉप होतो.इतरही काही त्रुटी अद्यापही आहेत. तर आता ३१ मार्च २०१७ नंतरही स्मार्टफोनवर 4G इंटरनेट आणि कॉल्ससाठी जिओच ठेवावं का? जिओमुळे बर्‍याच नेटवर्क कंपन्या

गँगस्टर - 2

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 26/03/2017 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
या युगांताला प्रखरतेची नांदी नाही. खोलीतल्या जाळ्यांसारखे मनातले विचारही धुरकट झालेत. घड्याळ वाजत राहते टकटक. जसं फटीतून बघितलेली त्या बाईची छाती. धकधक. बाथरुमचा नळ सताड चालू आहे. वर पंखा गरगर फिरतोय. भिंतीवर एक पाल आहे. आणि या सगळ्याला काहीच अर्थ नाही. फुललेला श्वास घेऊन मी त्या गंजक्या चाळीतून बाहेर पडलो. राहील थेटरमध्ये कसा आलो मला आठवत नाही. चालू असलेला कुठलातरी सिनेमा अखेर संपला. "चलना है क्या?" ही एक कोण बाई मला काहितरी विचारत होती. आणि त्यावेळी मी कुठल्यातरी बोळीतून स्टेशनवर जात होतो. "ए हिरो.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७ : निकाल

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 26/03/2017 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, 'शतशब्दकथा' या मिपाच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. अनेक उत्कृष्ठ कथा या निमित्ताने मिपावर वाचायला मिळाल्या. यावर्षी स्पर्धेला थोडीशी कलाटणी द्यावी म्हणून चित्रावरून शतशब्दकथा लिहायची स्पर्धा मिपावर आयोजित केली आणि त्याला अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. मतदानासाठी सात दिवसांचा कालावधी होता. आधीच जाहीर केल्याप्रमाणे २५ तारखेला भारतीय प्रमाण वेळेनुसार २३:५९:५९ वाजेपर्यंत आलेले गुणांकन ग्राह्य धरले आहे. आलेल्या गुणांकनातून प्रथम क्रमांक दिलेल्या कथांना ५ गुण दिले आहेत.

[खो कथा] पोस्ट क्र. ७

लेखक ५० फक्त यांनी रविवार, 26/03/2017 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भागावरुन पुढे, खुदिराम प्रथम पुरुषी एकवचनी.. ... शालु आणि शशिकांत दोघ्ंही गेले, निदान् या मितिमध्ये तरी मेले, पण मग इतर मितीमध्ये कुठ्ं जिवंत असले तर् काय्, माझा आणि त्यांचा तिथ्ं कधी सामना झाला तर ते बदला घ्यायचा प्रयत्न करतील ना ? त्यांच्या मरणाला मी उघड् उघड् नसलो तरी जबाबदार् आहेच् ना का मिती बदलली की जबाबदारीतुन् देखिल् मुक्तता होते ? तो नैन्ं छिंदन्ती वाला आत्मा, तो कुठं गेला त्या दोघांचा ? तो मिती बदलु शकतो का, बदलुन् देखिल् पुन्हा नव्या शरीरात् प्रवेश् मिळवु शकतो का ?

माण णा माण, मी पायला सुलताण!

लेखक तिमा यांनी शनिवार, 25/03/2017 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंगः- वोल्वोचा प्रवास वेळः अर्थातच कुवेळ घटना:- सुलताण पिक्चर बघायला लागणे तर, मी आप‌ला, असाच मौजमजेसाठी प्रवास करत होतो. तसं पहिल्यांदा, बरं चाललं होतं. म्हणजे बस वेळेवर सुटली होती, सीट मनासारखी मिळाली होती, रिक्लायनिंग सीट चक्क काम करत होती, वरचा एसीच्या हवेचा फवारा बंद करता येत होता. गंतव्य स्थान यायला चांगले चार तास तरी होते. छान पैकी डुलकी काढावी, म्हणून डोळे मिटले. अल्पावधीत झोप लागलीही. थोड्याच वेळात मोठ्ठ्या आवाजात पार्श्वसंगीत सुरु झाले. दचकून जागा झालो(यांच्या पार्श्वभागावर एक सणसणीत ... द्यावी अशी इच्छा झाली). समोरचा टी.व्ही. चालू झाला होता.

पुन्हा भोन्डला (भोन्डल्याची गाणी )

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 25/03/2017 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
(सध्या चालू असलेल्या भारत - ऑस्ट्रेलीया कसोटीतल्या ताज्या घडामोडीवर हा आमचा भोन्डला ) पात्र - वात्र परिचय स्मीथा- स्टीव स्मीथ ग्लेना- ग्लेन मॅक्सवेल नाथा - नाथन लायन रेन्शा - मॅट रेन्शा केशभूषा - गणपत हज्जाम वेशभूषा - भगवान कटपीस हाऊस विशेष आभार : चप्पल गुरुजी डी आर एस घे स्मिथा घेऊ मी कशी ? ह्या स्टॅन्ड चा त्या स्टॅन्ड्चा इशारा नाही आला ठाऊक नाही मला घेऊ मी कशी ? उठ ग ग्लेना उठू मी कशी ? डाव्या बाजूचा उजव्या बाजूचा चेन्डू अडविला खान्दा निखळिला उठू मी कशी वळव ग नाथा वळवू मी कशी ह्या बाजूने त्या बाजूने चेन्डू वळविला टर्न नाही झाला वळवू मी कशी ? थाम्ब ग रेनशा थाम्बू मी कशी ह्या गावचा त्या
काव्यरस

मराठीतला पहिला पॉडकास्ट: विश्वसंवाद

लेखक mandardk यांनी शनिवार, 25/03/2017 04:51 या दिवशी प्रकाशित केले.
"विश्वसंवाद" या पहिल्या मराठी पॉडकास्टचे एपिसोडस "मिसळपाव"वर प्रसिद्ध करण्याची संधी मला मिळते आहे, ही आनंदाची बाब आहे. मराठीतला हा पहिला पॉडकास्ट. नव्यानं ओळख झालेल्या या माध्यामानं गेली काही वर्षं अगदी झपाटून गेल्यासारखं झालंय. इंग्रजीतले अनेक, वेगवेगळ्या विषयांवरचे पॉडकास्टस ऐकल्यानंतर, मराठीत हा प्रकार आणायलाच हवा असं वाटत होतं.