Skip to main content

डाव!!!

लेखक विद्या चिकणे मांढरे यांनी बुधवार, 22/03/2017 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
'आज स्वाती आणि गौरवच्या घरातून खुपचं आवाज येतोय, नाही?', डोळे किलकिले करत स्वातीच्या बाल्कनीकडे बघत जोशीकाकू बोलल्या. पेपरात खुपसलेलं डोकं आणखीनच खुपसंत काका फक्त 'हुं' एवढंच म्हणाले. 'अहो नेहमीपेक्षा जास्त वाटतंय आज', नं रहावुन त्या परत बोलल्या. 'तुझं आपलं काहीतरीच असतं मला पेपर वाचू देत बऱ', पेपरचं पान बदलत काका म्हणाले. 'थांबा मी बेडरुमच्या खिडकीतून काही कळतंय का बघते.' असे म्हणत काकू बेडरूम कडे धावल्या. 'तुला फार चौकशा लागतात, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तू नको नाक खुपसू त्यात,' काका बोलले. पण काकूंनी लक्षच नाही दिलं.

लाल टांगेवाला

लेखक रासपुतीन यांनी बुधवार, 22/03/2017 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, मी वाचलेल्या आणि न वाचलेल्या पुस्तकांची त्यांच्या प्रकारानुसार (आत्मचरित्रे, विनोदी, कादंबरी ई.) गूगल शीट/वर्कशीट/स्प्रेडशीट बनवत आहे. यामध्ये पाहिलेले अन अजून परत पाहण्याची इच्छा असलेले, आवडलेले अन न आवडलेले मराठी/हिंदी/इंग्रजी/तेलगु/कन्नड्/भोजपुरी चित्रपट ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे. आवडत्या/नावडत्या डिशेस व होटेल्स ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे. तसंच केलेला आणि न केलेला व्यायाम सुद्धा प्रकारानुसार (पोहणे/पळणे/सायकलिंग) असा ऍप मधला डाटा एकत्र करत आहे.

तू असतीस तर

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 22/03/2017 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
तू असतीस तर ... अमराठी व्यक्तीच्या प्रेमात पडण्याचा एकच प्रोब्लेम असतो , तुम्ही तिला मराठी कविता नाही समजाऊन सांगु शकत. भाषांतर करता येते , अगदीच नाही असं नाही, पण भाषांतराने कवितेचा आत्माच हरवुन जातो. हे म्हणजे अगदी खुप काही तरी सांगायचय पण व्यक्त करता येत नाहीये अशी काही अवस्था !

मन... जीवन...

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 22/03/2017 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्न माझे मनीच माझ्या जीवन वाहे खळाळ सरिता गोडी तयांची अवीट भासे मन.. सरितेचे अबोल नाते मनास येता भरती माझ्या जीवन सरिता स्थब्द असे प्रवाही जीवनाच्या संगे मन हे वेडे धावतसे एक स्वप्न-एक सत्य भासे मज शब्दात वर्णू कसे किती दोन्ही माझे मी दोघांची मन-जीवन असे अमूर्त जरी
काव्यरस

पात्रामध्ये नदीच्या प्रेते सडूनी गेली ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 22/03/2017 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
आज आमच्या कवितेच्या ग्रुपवर स्वाम्याच्या (स्वामी संकेतानंद) मस्करीला उत्तर देताना एक मित्र कौतुक शिरोडकर याने हां शेर लिहीला होता. माझ्या खरेपणाची देऊ कशी मी ग्वाही मसणातल्या मढ्यानो बोलाल का हो काही ? ****************************************************** त्यातल्या प्रश्नाचा संदर्भ घेवून सुचलेल्या काही ओळी ! रस्त्यास त्या बिचाऱ्या सांगाल का हो काही ? पथभ्रष्ट भास्कराला शिकवाल का हो काही ? सगळे खरेच आहे खोटे न येथे कोणी, रचल्या चितेस सांगा बोलाल का हो काही ? 'योगी' कितीक झाले, होतील लाखो मुल्ला ऐन्यास बोल थोडा लावाल का हो काही ? झोळी गळ्यात बांधुन दारात ऊभा आहे पुत्रास त्या 'बळीच्या' वा
काव्यरस

प्रकाशवाट

लेखक यांनी बुधवार, 22/03/2017 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
एका मग्न तळ्याला होता आठवणींचा गहिरा डोह भौवतालच्या पर्वत रंगांना आकाश शिवण्याचा होता मोह ह्या पर्वत रांगांच्या दरीत होते साठवणींचे कवडसे कुठे होते तापवणारे ऊन तर, कुठे झोंबणारे गार वारे कुठे तरी लपून बसल्या होत्या काळ्याकुट्ट रहस्यांच्या गुहा तर कुठे होता पठारावर फिरणारा उनाड मनमोकळा स्वछंदी वारा त्या तळ्याच्या काठून एक पायवाट भविष्यात जाणारी तर एक होती विसाव्याची जागा क्षणभर विश्रांती देणारी विसावा घ्यावा म्हणून जरासा त्या ठिकाणी थांबलो न राहवून गहिऱ्या डोहाच्या पाण्यात जरा डोकावलो पाण्याने काळ्या गर्द रंगाचा साज चढवला होता निळ्याशार पाण्याला काळ करणारा मेघ भरून आला होता गर्द काळे ढ
काव्यरस

गोविंदराव तळवळकर

लेखक विकास यांनी बुधवार, 22/03/2017 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच कळले आणि नंतर वाचले की महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत गोविंदराव तळवळकर यांचे ह्युस्टन येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ज्या एका व्यक्तीमुळे आजही जालावर मराठी वृत्तपत्र पहायला गेलो की आपोआप महाराष्ट्र टाईम्सचे पान उघडले जाते अशी एक विचारवंत व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेली. महाराष्ट्राच्या आणि त्यातही खासकरून मुंबई-पुण्याच्या वृत्तपत्रीय जगताची स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक-आगरकर, काळकर्ते परांजपे, न.चिं केळकर आदी अनेक दिग्गजांनी एक जडणघडण घातली. त्याच काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातही सुरवातीस आचार्य अत्रे, ह.रा. महाजनी आदींनी वैचारीक जडणघडण चालूच ठेवली.

पेटुनी आरक्त संध्या...

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 22/03/2017 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
पेटुनी आरक्त संध्या,मातला अंगार आहे... केवडा वा रातराणी..मोगराही फार आहे! मोकळे बाजार-रस्ते,शांत आहे शहर सारे... वाटते आहे उद्याचा,वादळाचा वार आहे! काजव्यांच्या चार ओळी,सारख्या फिरतात येथे... सांग त्यांना..पेटलो तर,सूर्य माझे सार आहे! एक तुकडा चांदण्याचा,बांधला होता उराशी... त्याच तुकड्याने नभीचा,चंद्र मी टिपणार आहे! मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही... आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे! सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी... मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे! —सत्यजित

खिडकी पलीकडचं जग भाग ७ (शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 22/03/2017 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ : http://www.misalpav.com/node/39159 भाग 2: http://www.misalpav.com/node/39179 भाग 3: http://www.misalpav.com/node/39196 भाग 4 : http://www.misalpav.com/node/39212 भाग 5: http://www.misalpav.com/node/39222 भाग 6: http://www.misalpav.com/node/39230 भाग ७ लांबच लांब बोळ होता तो.

(ग़ज़ल - म्हटलेच होते)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 21/03/2017 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
२१ मार्च हा जागतिक कविता दिन आहे(च), म्हणून एखादी ताजी कविता आपणही शोधू म्हटलं. सादर आहे.... (म्हटलेच होते...) सुबक दिसता, दे हृदय म्हटलेच होते नाइलाजाला सवय म्हटलेच होते खीर देती ते पुन्हा घेता पुरी मी मीहि चरण्याला विजय म्हटलेच होते एक मिटता नयन अन खुलताही दुसरा उमटते गाली वलय म्हटलेच होते वाटली होतीच भीती या क्षणाची त्या कडीने ना अभय, म्हटलेच होते!! 'परतुनी' जा(ये)ती कशा समजे न रंग्या सासवांना मी प्रलय म्हटलेच होते! -चतुरंग २१-३-१७
काव्यरस