Skip to main content

मुन्तजिर

लेखक मिडास यांनी सोमवार, 20/03/2017 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
राग, मत्सर, लोभ, द्वेष, अहंकार कुठल्याही नातेसंबंधात अपरिहार्यपणे येणारे हे भोग. कुणी कधी जिंकतं तर कधी कुणी हरल्याचं दाखवतं. पण साचत जातं काहीतरी आतल्या आत. घुसमट होते. तापलेल्या मनावर पुटं चढत जातात अपमानाची आणि मग कधीतरी कोंडलेली वाफ नको तिथे फुटते. पोळून निघतात मनं. मग रस्ते वेगळे होतात. दिवस जातात, वर्षं उलटतात. आणि मग एखाद्या नाजूक क्षणी जुनी पायवाट आठवते. भुरभुरणाऱ्या पावसात पसरणारा मातीचा गंध दाटून येतो छाती भरून. फिरून कुणाला तरी परत भेटावं अशी आस लागते. दूर आहे म्हणून काय झालं, शेवटी कुठलातरी चिवट बंध रेंगाळतोच मागे. त्याच रेशमी धाग्याला पकडून कुणीतरी साद घालतं.

"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 20/03/2017 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले. वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही तब्बल चार वर्षानंतर, पुन:लेखन करून, संवाद, लावण्या आणि प्रसंगात बदल करून, "वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

खिडकी पलीकडचं जग भाग 5

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 19/03/2017 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ : http://www.misalpav.com/node/39159 भाग 2: http://www.misalpav.com/node/39179 भाग 3: http://www.misalpav.com/node/39196 भाग 4 http://www.misalpav.com/node/39212 भाग 5 ओरस् आणि गौरी दोघेही दचकले. ओरसने वळून बघितल. शेजारच्या एका मोठ्ठया झाडामागुन एक अत्यंत उंच आणि गोरिपान, तेजस्वी व्यक्ति ओरस च्या शेजारी येऊन उभी राहिली. त्यांनी शुभ्र पांढरा गाऊन घातला होता...

||कोहम्|| भाग 3

लेखक शैलेन्द्र यांनी रविवार, 19/03/2017 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
Part 1 Part 2 कोहम् भाग 3 मागच्या भागात आपण होमो या मानवाच्या वेगवेगळ्या प्रजातींची माहिती घेतली आणि त्याच बरोबर त्यांची थोडीशी वैशिष्टही समजून घ्यायचा प्रयत्न केला. पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती अशी की या प्रजातींना जरी आपण वेगवेगळ्या स्पिसीज म्हणत असलो तरी याचा अर्थ हा नाही की त्या गाढव आणि घोड्यासारख्या, बऱ्याचश्या मिळत्या-जुळत्या दिसणाऱ्या पण जनुकीय दृष्ट्या पूर्ण वेगळ्या प्रजाती होत्या, आणि असाही नाही की त्या कुत्र्याच्या जातींसारखे फक्त दिसायला वेगळे पण सहजप

Ingmar Bergman चे चित्रपट भाग-१

लेखक मारवा यांनी रविवार, 19/03/2017 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
तर झालेले असे आहे की, एलिजाबेथ व्होगलर ही एक नाटकात काम करणारी अभिनेत्री आहे. एका प्रयोगादरम्यान ती अचानकच संवाद थांबवुन गप्प झालेली आहे. काही मिनिटात पुन्हा भानावर येते, नाटक पुर्ण करते. त्या दिवसानंतर मात्र तीने पुर्णपणे मौन धरलेले आहे. तिच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्यांतुन याचे काहीही निदान झालेले नाही, ती पुर्णपणे नॉर्मल आहे पण एकदम गप्प ती गप्पच.( चाफ़ा बोलेना चाफ़ा चालेना सारखी अवस्था ) तिची डॉक्टर सल्ला देते की चेंज म्हणून तु काही दिवस माझ्या समुद्रकिनारी असलेल्या कॉटेज वर जाऊन राहुन ये. तिला सोबत म्हणून एका तरुण नर्स सिस्टर "अल्मा" ला तिच्या बरोबर पाठवते.

शांत समय अन्...

लेखक Pradip kale यांनी रविवार, 19/03/2017 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
शांत समय अन् एकांत किनारा, हेच माझे सोबती न लगे मग दुजे कुणी, न प्रेयसी न कुठली नाती धीर गंभीर स्वरांमधुनी तो, गुज सांगे मज कानी अन् प्रत्युत्तरामधे घेऊन जाई, माझ्या कविता आणिक गाणी शांततेच्या गुढ उदरी दिसे, निशब्द मनाची वाट उलगडी ती मज समोरी, गत आठवणींचा पट ध्यानस्त बैसले मन, ध्यानस्त तो काळ पण कळले नाही मजला, कशी गेली अत्तरासम वेळ दिस सरला, वेळ सरली ; सुर्य अस्तासी निघाला अस्त त्याचा तो इथला, पण जन्म असे तो पलिकडला असेच सारे विचार छळती, आज का हे मज एकांती बुडुन जातो सुर्यासह मी, पुन्हा उगवण्या नवीन जगती -प्रदिप काळे. माझा ब्लॉग:
काव्यरस

दश्त-ए-तनहाई में - तृप्ती आणि हुरहूर

लेखक पिशी अबोली यांनी रविवार, 19/03/2017 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
दुराव्याच्या दु:खाला सौंदर्याची किनार देण्याची ताकद उर्दू भाषेत जबरदस्तच आहे. दु:ख बुडवून ठेवलेल्या खोल डोहाला न डुचमळता हळूच स्पर्श करावा, आणि विरत जाणार्‍या तरंगांना नि:शब्दपणे पाहत रहावं, असं काहीसं काव्य या उर्दू कवींचं.

[खो कथा] पोस्ट क्र. २

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 19/03/2017 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
[खो कथा] पोस्ट क्र. १ ---------------------------------- भाग पहिला रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ रंगात आला होता. बाजारतळावर ही गर्दी. लिंबाच्या झाडाखाली बरीच म्हातारी कोतारी बसलेली. तमाशाचा फडावर एक उफाड्याची बाई गल्ल्यावर बसलेली दिसली आणि आजचा मुक्काम सार्थकी लागणार याची मला खात्रीच पटली. येताळबाबाचा बुटका डोंगर चढायला बराच वेळ लागला. धापा टाकत तिथला लिंबू सोडा पिल्यावर नवचैतन्यात न्हाऊन निघालो. उंच टेकडीवर जांभळाची आणि चिंचेची मुबलक झाडे होती. बघावं तिकडे त्यांच्यावर चिरगुटे बांधलेली आढळली.

अल्पसंख्यांकांचा प्रश्न! भाग २

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 19/03/2017 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
अल्पसंख्यांकांचा प्रश्न! भाग 3 (संदर्भ ग्रथ- अखंड भारत का नाकारला?-शेषराव मोरे, छायाप्रकाश,अन्वय, आकलन- नरहर कुरुंदकर, अल्पसंख्यांक वाद – मुझफ्फर हुसेन, अब्दुल कादर मुकादम, तारिक फतेह, अयान हिरसी आली इ. मुस्लीम सुधारक/ विचारवंतांचे वेळोवेळी आलेले लेख.) काही दिवसांपुर्वी ह्या लेखाचा पहिला व दुसरा भाग मी मिसळपाव वर टाकला. पण एकंदरीत मलाच तो फार त्रोटक वाटला म्हणून दुसरा भाग मी थोडी अधिकची भर घालून परत इथे टाकत आहे. पुनरुक्ती बद्दल खामास्व... मागील आठवड्यामध्ये ह्या लेखाचा पहिला भाग मराठी पिझ्झा वर प्रसिद्ध झाला. त्याचीच लिंक मी WhatsApp आणि फेस बुक वर प्रसिद्ध केली.

टपली अन टिचकी

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 19/03/2017 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण १ वर्षापूर्वी(१७ मार्च२०१६) कुबेर गुर्जींनी मदर तेरेसांवर लेख लिहून एकाच दिवसात तो मागे घेण्याची किमया केली होती. आज परत त्यांनी एक लेख लिहिला आहे. लिंक बघा http://www.loksatta.com/…/singer-nahid-afrin-is-not-afrai…/… म्हणजे तसा लेख बरा आहे पण त्यातले हे वाक्य वाचून उगाच भ्या वाटतंय. बाबाला परत लेख मागे घेणे, दिलगिरी व्यक्त करणे अशी कसरत करावी लागते का काय कुणास ठावूक! पण तसे करावे लागले तरी तो त्यांचा सभ्यपणा बरका! लगेच असहिष्णुता, अभिव्यक्तिस्वतान्त्र्यावर घाला म्हणून बोंब मारायची नाय...