Skip to main content

इजाजत!

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 19/03/2017 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला गुलजारचे चित्रपट आवडतात बुवा. आता त्याचे सगळेच चित्रपट आवडतात, अशातला भाग नाही पण साधारण १९९५ च्या आधीचे म्हणजे माचिसच्या आधीचे चित्रपट मला आवडतात. इतर दिग्दर्शक आणि गुलझार यांच्या बाबत असं जाणवत कि इतर दिग्दर्शकांचे चित्रपट आवडले तरी त्याचित्रपटातले सगळे आवडतेच असे नाही. म्हणजे कदाचित गाणी आवडणार नाहीत किंवा climax आवडणार नाही पण गुलझार चा चित्रपट मलातरी एकतर सगळा च्या सगळा अवडतो किंवा अजिबात आवडत नाही उदा. हुतुतू हा मला अजिबात आवडला नाही अगदी गाण्यांसकट.

खिडकी पलीकडचं जग भाग 4

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 18/03/2017 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ : http://www.misalpav.com/node/39159 भाग 2: http://www.misalpav.com/node/39179 भाग 3: http://www.misalpav.com/node/39196 भाग 4 "ए बॉल तुझ्या खिड़कीत आला आहे. टाक ना...." त्या आवाजाने आणि समोर कंबरेवर हात ठेऊन उभ्या मुलाकडे बघुन मात्र गौरी पुरती गडबडली. "क...काय? कोण?..... मी? म्हणजे ... मला म्हणालास?" गौरीने अडखळत विचारल. ती पुरती गोंधळून गेली होती. तिच्या मनातला समज चुकीचा आहे हे तिच्या लक्षात येऊनही तिला पचत नव्हते. "हो... कमाल करतेस.

||कोहम्|| भाग 2

लेखक शैलेन्द्र यांनी शनिवार, 18/03/2017 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
1856 च्या ऑगस्ट महिन्यात, जर्मनीमधल्या निअंडरथल दरीत काही मजूर काम करत होते, एका चुन्याच्या खाणीत त्यांना काही हाडं सापडली. अशी हाडं सापडण्यात फार विशेष काही नव्हतं पण तरी त्यांनी ती एका स्थानिक अभ्यासकाला दिली.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७ : मतदान

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 18/03/2017 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, 'शतशब्दकथा' या मिपाच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. पहिल्या वर्षी शतशब्दकथा स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्कृष्ट कथा या निमित्ताने मिपावर वाचायला मिळाल्या. दुसर्‍या वर्षी या स्पर्धेला थोडीशी कलाटणी द्यावी म्हणून चित्रावरून शतशब्दकथा लिहायची स्पर्धा मिपावर आयोजित केली आणि त्यालाही अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. काही तांत्रिक अडचणी आल्या आणि तुमच्या या 'शशक स्पर्धेचा' निकाल लांबणीवर पडला. त्या अडचणी सोडवण्याच्या प्रयत्नात बराच वेळ गेला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

तू नभीचा चंद्रमा हो...

लेखक सत्यजित... यांनी शनिवार, 18/03/2017 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
लांबती हे श्वास हल्ली..सोबती घेवून जा... तू मला भेटायला ये..एकदा येवून जा! शेवटी आयुष्यही असते प्रवासासारखे... तू तुझ्या गावात थांबा तेवढा ठेवून जा! तो तसा आला नि गेला..वादळाच्या सारखा... पण मला सांगून गेला..दीप हो,तेवून जा! वाहते आहे अनावर,तू मला प्राशून घे... या नदीला सागराची वा दिशा देवून जा! सूर्य विझता रातही चालून येते नेमकी... तू नभीचा चंद्रमा हो..चांदणे लेवून जा! —सत्यजित

[खो कथा] पोस्ट क्र. १

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 18/03/2017 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
गणरायाला वंदन करून खो कथेची नांदी करतो. आधी लेखकांनी पाळावयाचे नियम स्पष्ट करतो ( याबाबत सर्वांनी सहमती दर्शवलेली आहे) १. प्रत्येक लेखकाने त्याची पोस्ट टाकून झाल्यावर दुसऱ्या लेखकाला खो द्यावा. कोणत्या क्रमाने कथा लिहायची हे ठरवल्या जाणार नाही. फक्त एका फेरीत एका लेखकाला दोनवेळा खो देऊ नये. २. प्रत्येक पोस्टमध्ये कमीत कमी ५०० शब्द असावेत. ३. खो दिल्यानंतर ७२ तासांच्या आत पुढची पोस्ट टाकावी लागेल. (अर्थात ही कमाल मर्यादा झाली.

समांतर

लेखक यांनी शनिवार, 18/03/2017 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
त्याची आणि तिची आज अचानक भेट झाली दोघांच्या हि डोळ्यांना एकमेकांची ओळख पटली त्याची आणि तिची कधी काळची घट्ट मैत्री होती एकमेकांना एकमेकांची हवीहवीशी सलगी होती पण आज मात्र ते होते एकमेकांसाठी जसे अनोळखी होती त्यांच्यात जवळ जवळ एका तपाची खोल दरी कधी काळी त्यांनी ही एकमेकांसाठी स्वप्न पहिली होती कधी काळी त्यांची ही राधा कृष्णा सारखी निखळ मैत्री होती पण आज राधा होती अनय ची आणि तो होता रुख्मिणीचा तरीही आज त्यांच्या नात्यातला एक रेशमी धागा तसाच होता आता त्यांच्या संवादात वैखरी ला देखील जागा नव्हती कारण डोळ्यांनी त्यांच्या कधीचीच परा वाणी साधली होती कि मैत्री पेक्षा हि पुढे अजून काही होते त्यां

उत्तुंगतेचा प्रवास ||3||

लेखक यांनी शनिवार, 18/03/2017 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
तुंगनाथाचा आशीर्वाद घेऊन आमचा प्रवास आता चंद्रशिलेच्या दिशेने सुरु झाला,जणू काही बापाचा आशीर्वाद घेऊन मुल गड जिंकायकला चालली आहेत की काय असा विचार माझ्या मनात येऊन गेला असो माझ्या मनात असं काय काय चालूच असत आता रस्ता हिमालयानी स्वतः तयार केला होता,तुंगनाथ पर्यंतचा सरकारी छोटा पण सिमेंट चा रस्ता आता संपला होता आम्ही आपल्या काठया टेकवून एक म्हाताऱ्या माणसा प्रमाणे ते शिखर चढू लागलो,कुठे पुढचा रस्ता कळत नव्हता तर कुठे थोडासा घसरडा रस्ता होता,पण थोडं चढल्या वर मन खिन्न झालं आम्हाला प्लास्टिक च्या बाटल्यांचा ढीग दिसला लोकांना चार शिव्या घातल्या निसर्गाची कशी विभत्सना करतात हे पाहून मन दुःखी झाल

चलती का नाम गाडी...

लेखक शब्दबम्बाळ यांनी शुक्रवार, 17/03/2017 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
car हल्ली आपल्या आजूबाजूला बऱ्याच प्रकारच्या आणि बऱ्याच श्रेणी मधल्या अनेक चार चाकी गाड्या पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांच्याविषयी फारसे अप्रूप राहिलेले नाही. पण आपल्या पैकी बऱ्याच जणांना गाडी नक्की कशी चालते किंवा त्यामध्ये येत राहणाऱ्या नवनवीन सुविधा कशा काम करतात याविषयी पूर्ण माहिती असेल असे नाही.

इंस्टंट पिठाची इडली

लेखक सही रे सई यांनी शुक्रवार, 17/03/2017 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
इडली किंवा डोसा करणं म्हणजे किमान २-३ दिवसाच काम आणि नियोजन. पण त्यामुळे आत्ता लगेच कोणाला इडली खायची इच्छा झाली तर काय? तसं बाजारात इंस्टंट इडली मिक्स मिळत. पण दर वेळी ते विकत आणण्यापेक्षा जर तसंच घरीच करता आल तर.. तर चला ती रेसिपी बघूच आपण