Skip to main content

व्हेज कुर्मा

लेखक सविता००१ यांनी मंगळवार, 21/03/2017 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस हॉटेल मध्ये मिळतो तसा व्हेज कुर्मा करून पहायचा असं चाललं होतं. काल लागला मुहूर्त. तुम्हीही पहा कसा वाटतोय ते. साहित्यः १. प्रत्येकी एक वाटी फ्रेंच बीन्स - तिरके शंकरपाळ्याच्या आकारात कापून, गाजर आणि बटाटे सालं काढून, १ सेंमी च्या चौकोनी आकारात चिरून, फ्लॉवर- मध्यम आकाराचे तुरे काढून, मटार.- हे सारं गरम पाण्यात ४ मिनिटे ब्लांच करून लगेच थंड पाण्यात घालून चाळणीवर उपसून ठेवले. २. पाककृती करायच्या आधी तासभर एक कप गरम पाण्यात ६-६ काजू, बदाम आणि १ चमचा खसखस भिजत घातली होती. ३. मध्यम आकाराचे दोन कांदे पातळ चिरून फ्राय पॅन मध्ये चमचाभर तेल घालून कुरकुरीत होईतो परतून घेतले. ४.

ग़ज़ल - म्हटलेच होते

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 21/03/2017 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
२१ मार्च हा जागतिक कविता दिन आहे. म्हणून एखादी ताजी कविता आपणही टाकू म्हटलं. म्हटलेच होते... होय दगडाला ह्रदय म्हटलेच होते नाइलाजाला सवय म्हटलेच होते धीर देती ते जणु हरलो पुरा मी मीहि हरण्याला विजय म्हटलेच होते एक मिटते वाट अन खुलतेही एक प्रीतिच्या अस्ता उदय म्हटलेच होते वाटली होतीच भीती या क्षणाची मी मनाला 'हो अभय' म्हटलेच होते वाहुनी गेलो कधी नकळे अपूर्व आसवांना मी प्रलय म्हटलेच होते - अपूर्व ओक २०-३-१७
काव्यरस

या कातरवेळी, पाहिजेस तू जवळी

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 21/03/2017 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
नेहेमीप्रमाणे आज कट्टयावर सगळे जमले होते खरे पण आज रोजच्या सारखं बिलकुल वाटत नव्हतं. खामकरांची उणीव सर्वांनाच जाणवत होती. शेवटी रेगे म्हणाले, "खामकर नाही तर एकदम चुकल्या चुकल्या सारखं वाटतंय" "हो ना, बिचाऱ्यांची मुलाशी शेवटची भेट झाली असती तर बरं झालं असतं." एक निश्वास सोडून कर्वे म्हणाले. "हे  तुम्हाला वाटतंय हो. त्यांच्या मुलाला काही आहे का त्याचं! म्हातार्या आईवडलांना सोडून खुशाल अमेरिकेला जाऊन बसायचं. इकडे म्हातारा म्हातारी असले काय आणि नसले काय, यांचे राजाराणीचे संसार चालू!" देशपांडे संतापून म्हणाले. "पण तसे खामकर मुलाबद्दल नेहेमी चांगलंच बोलायचे हो!

अंगारा - भाग २ (अंतिम भाग)

लेखक शब्दानुज यांनी मंगळवार, 21/03/2017 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
अंगारा - भाग १ http://www.misalpav.com/node/38784 अंगारा - भाग २ (अंतिम भाग) मी त्याच्याकडे पहातच राहिलो. आधी आमची भेट होण्याचा काही संबंधच नव्हता. तरीही त्याच्या पाणीदार डोळ्यातील नजर मला आश्वासक वाटली. डोक्यावरचे ब-यापैकी केस पिकलेले.अंगात भगवे कपडे. खांद्यावर एक शबनमची पिशवी लटकत होती. खांद्यावरुन सारख्या घसरणा-या पिशवीला सांभाळत तो घोग-या आवाजात बोलू लागला. "म्या निलकंठेश्वर. ह्यो लोकांचा तू मला डाक्टर म्हणू शकतो.

मी (चुकून) संपादक झालो तर !

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 21/03/2017 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
संपादक व्हावं अशी अजिबात इच्छा नाहीये. पण ओशो म्हणतात, इमॅजिनेशन इज अ टॉय, वन कॅन प्ले विथ इट. बट माइंड यू, ओन्ली योर डिझायर शूड नॉट टेकओवर इट ! तर मी संपादक होण्याची शक्यता शून्य . त्यामुळे हा फक्त मौजमजेचा खयाली पुलाव आहे. जे आयडी पॅन कार्डची कॉपी व्यवस्थापनाकडे पाठवणार नाहीत त्यांचे आयडी महिनाभरानंतर आपोआप ब्लॉक होतील. ही स्वच्छ मिपा अभियानांतर्गत माझी पहिली स्टेप असेल.

खिडकी पलीकडचं जग भाग 6

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 21/03/2017 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ : http://www.misalpav.com/node/39159 भाग 2: http://www.misalpav.com/node/39179 भाग 3: http://www.misalpav.com/node/39196 भाग 4 : http://www.misalpav.com/node/39212 भाग 5: http://www.misalpav.com/node/39222 खिडकी पलीकडचं जग भाग 6 गौरी पार गोंधळून गेली होती. हे सगळ तिच्या समजुतीच्या बाहेर होत.

गौराक्का!!!

लेखक विद्या चिकणे मांढरे यांनी सोमवार, 20/03/2017 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
''गौराक्का, गौराक्का", राजूच्या हाकेकडे दुर्लक्ष करत, तिने हातातल्या दगडावरची पकड घट्ट केली आणि सर्वात उंच असलेल्या चिंचेवर नेम धरला. एक, दोन, तीन....म्हणत दगड भिरकावणार, इतक्यात आतापर्यंत अंगणात उभा राहून हाका मारणारा राजू जवळ आला होता. तिच्या हाताला धरून ओढंतच घराकडे नेऊ लागला. 'गौराक्का चल, काकूने बोलावलंय तुला लगेच.' 'थांब रे! ती चिंच पाडू दे, काय कटकट लावलीस, येते सांग आईला.' 'नाही काकूने लगेच बोलवलंय, चल.' राजूने धोशाच लावला. 'काकूचा चमचा कुठला, चल.' असे म्हणत नाईलाजाने तिने हातातला दगड खाली टाकला आणि राजूच्या खांद्यावर हात टाकून चालू लागली.

नवप्रवर्तनाचा सोहळा

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 20/03/2017 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
४ ते १० मार्च राष्ट्रपती भवनाच्या आवारात ’नवप्रवर्तन उत्सव’ साजरा झाला. २०१५पासून हा उपक्रम सुरू आहे आणि यंदाचे तिसरे वर्ष होते. मला मात्र याची अजिबात कल्पना नव्हती. मुघल गार्डन पहायला म्हणून गेलो आणि बाहेर पडताना हे दिसले तर आत घुसलो. सुखद धक्का बसला. सर्वसामान्य माणसांच्या कल्पकतेला व्यासपीठ दिले होते. एक वैद्यकीय इनोवेशन्सना दिलेला विभाग सोडला तर उर्वरित सगळे संशोधक तुमच्याआमच्यासारखे सर्वसामान्य भारतीय होते. जवळपास सगळेच ग्रामीण भागातील रहिवासी. त्यांचे संशोधनसुद्धा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे.

[खो कथा] पोस्ट क्र. ३

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 20/03/2017 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
[खो कथा] पोस्ट क्र. १ [खो कथा] पोस्ट क्र. २ पॉक पॉक करून गाडी बंद केली आणि किल्ली खिशात टाकली . मी आत्ता बाहेर पडलो ती इमारत हवेत तरंगत होती!!!.......... नक्की काय चाललंय? आरशात शशिकांत का दिसला? मी आणि शालूमध्ये काय घडलंय? काही कळेना. परवा तो दाढीवाला म्हातारा बुवा कसल्यातरी शापाबद्दल बरळत होता. हीच तर त्या शापाची सुरुवात नाही ना??? पुढं काहीतरी फार अभद्र घडेल असं वाटू लागलं.