Skip to main content

छळ

लेखक संदीप-लेले यांनी शनिवार, 25/03/2017 02:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्र्नं छळतात ! आपल्याला पडलेले कमी, इतरांना न पडलेले जास्त छळतात !
उत्तरं छळतात ! न मिळालेली कमी, मिळालेली जास्त छळतात !
प्रश्र्नं नी उत्तरं, दोन्ही छळतात ! प्रश्र्नांची आलेली उत्तरं कमी, उत्तरातून आलेले प्रश्र्नं जास्त छळतात !

तहान

लेखक परशु सोंडगे यांनी शुक्रवार, 24/03/2017 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा ****************************** तहान त्यादिवशी दुपारी सहज मी खिडकीत उभा होतो. समोरच्या पटागंणात काही बि-हाड उतरली होती. ऊन मी म्हणत होतं. त्या पटांगणावर नावाला पण झाड नव्हतं. नुसतं याडपाट बाभळी होत्या.त्याला पानं नव्हती राहिली.लेकर बाळं सारी ऊन्हात तळत होती. गडी माणसं पालं ठोकत होती. सारे चार पाच पालं असतीलं.त्यात काही लेकरं वाळया ही होत्या.ती लहान लहान पिल्लं नुसती केकत होती. येडया बाभळीच्या झाडावर गोधडी टाकून सावली केली आणि त्या तिथचं बसून लेकरं पाजू लागल्या. बाकी पाच सहा लेकरं नुसती हुंदडत होती. उघडी नागडी पळत होती.

रावणमामा

लेखक चंद्रकांत यांनी शुक्रवार, 24/03/2017 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
रावणमामा रावण नावाभोवती अनुकूल प्रतिकूल अर्थाच्या वलयांनी एक अभेद्य भिंत शेकडोवर्षापासून उभी केली आहे. संदेहाच्या प्रतलावरून प्रवाहित असणारे हे नाव कधी होकाराचा, तर कधी नकाराचा आशय घेऊन संस्कृतीच्या पात्रातून वाहते आहे. काहींना या नावात नकाराच्या सुस्पष्ट रेषा दिसतात, तर काहींना विद्वत्तेची वलये. शेकडो वर्षे उलटूनही त्याभोवती असणारे संदेहाचे धुके काही विरळ होत नसल्याने नकार-होकाराच्या कृष्णधवल छटांमध्ये ते आपला चेहरा शोधते आहे. म्हणूनच असेल की काय, या नावाला आपलं अभिधान म्हणून मिरवणारे आसपास अपवादानेच आढळतात. राम नाव धारण करून अभिमानाने मिरवणारे लाखोने आहेत.

इंद्रजाल

लेखक चांदणशेला यांनी शुक्रवार, 24/03/2017 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
वेड लागे या लाजऱ्या कळीला ओघ प्रितीचा दिगंतर परिमळला सख्या अनुरागाचे इंद्रजाल तुझ्या नयनी निर्मल भाव फुलला उभ्या गगनी ह्रदयाची उमलूनी पाकळी मोगरा दरवळला आर्त गीतांचे झाले गोड सूर चांदण्यांची पैंजणे घाली साद मधुर मिठी घाली जीव सख्या तुझ्या काळजाला गूढ अबोल सावली डोळ्यांत दाटली वाट हसऱ्या फुलाची त्यांत दिसली ओढ अनिवार छळे सख्या या घडीला
काव्यरस

गँगस्टर

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 24/03/2017 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
गँगस्टर काल पक्याला पोलिसांनी ठोकला. विक्रोळी स्टेशनच्या बाहेर माचीस मागत असतानाच ठोकला. सोबतचे चारजण पण पकडले गेले आहेत म्हणे. आम्ही सध्या टेन्शनमध्ये आहोत. हा आमच्यासाठी फार मोठा धक्का आहे. सुलेमानभाईचा फोन बंद आहे. साहजिकच आहे म्हणा. आमची चौदा पोरांची गँग आहे. त्यातल्या प्रत्येकाला फोन करून मी मुंबई सोडण्याचे आदेश दिले आहेत. रात्री मी माझ्या खोलीऐवजी याकूबच्या खोलीत झोपलो. याकूब बायकापोरांसोबत राहत होता. कालची खबर मिळताच कोणालाही न सांगता त्याने इथून पोबारा केला. त्याच्या कुंद खोलीत मच्छर फार होते. साधारण तीन दिवस मी त्या खोलीत झोपून होतो.

[खो कथा] पोस्ट क्र. ६

लेखक चॅट्सवूड यांनी शुक्रवार, 24/03/2017 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
[खो कथा] पोस्ट क्र. १ [खो कथा] पोस्ट क्र. २ [खो कथा] पोस्ट क्र. ३ [खो कथा] पोस्ट क्र. ४ [खो कथा] पोस्ट क्र. ५ पोस्ट क्र. ६: या दोघांची भांडण बघून मला कंटाळा आला होता. मी एक जांभई दिली, मान, बोट, पाठ मोडली आणि उठलो.

दांडी मारणे - एक विलक्षण कला

लेखक किसन शिंदे यांनी शुक्रवार, 24/03/2017 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्‍याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.

विहार…भाग ३

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 24/03/2017 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या दोन भागांची लिंक, http://www.misalpav.com/node/39239 http://www.misalpav.com/node/39266 अहमद आता उठून बसला होता. आपल्यासमोर नियतीने काय वाढून ठेवले आहे ह्याची त्याला आता पूर्ण कल्पना आली होती !! रात्रभर अहमदला झोप लागली नाहीच. सकाळी उठल्यावर तो इरफानला भेटायला गेला. इरफानला रात्री थोडा त्रास झाला होता. तिथल्या डॉक्टरने पेनकिलर देऊन त्याला झोपविले. डॉक्टरने अहमदला काही औषधं लिहून दिली. हॉस्पिटलच्या आवारात संस्थेचेच एक औषधांचे दुकान होते जे चोवीस तास सुरु असायचे.

विहार…भाग ३

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 24/03/2017 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या दोन भागांची लिंक, http://www.misalpav.com/node/39239 http://www.misalpav.com/node/39266 अहमद आता उठून बसला होता. आपल्यासमोर नियतीने काय वाढून ठेवले आहे ह्याची त्याला आता पूर्ण कल्पना आली होती !! रात्रभर अहमदला झोप लागली नाहीच. सकाळी उठल्यावर तो इरफानला भेटायला गेला. इरफानला रात्री थोडा त्रास झाला होता. तिथल्या डॉक्टरने पेनकिलर देऊन त्याला झोपविले. डॉक्टरने अहमदला काही औषधं लिहून दिली. हॉस्पिटलच्या आवारात संस्थेचेच एक औषधांचे दुकान होते जे चोवीस तास सुरु असायचे.

'किनी'-'मिनी' चमचा 'धरा' (लघुत्तम कथा)

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 24/03/2017 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
एक आटपाट शहर होत, त्या आटपाट शहरात किनई एक 'किनी' रहात असे. त्याच्या जिवाभावाच्या मैत्रिणीचं नाव होत, 'धरा'. एक दिवस 'किनी' मोठा झाला, नौकरीसुद्धा करु लागला. तसं 'धरा'नी त्याला प्रोपोज केलं; पण त्यावेळी 'किनी'ला आवडली होती 'मिनी'. 'किनी'ने 'मिनी'ला प्रोपोज केले, 'मिनी' हो म्हणाली, पण त्या आधी 'मिनी'ने विचारलेच होते तुझ्या आधीच्या मैत्रिणी कोण ? 'किनी'ने 'मिनी'ची 'धरा'शी ओळख करुन दिली.