Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: स्पर्धकांची ओळख

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 28/03/2017 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व लेखकांची ओळख या धाग्यात जाहीर करत आहोत. अनुक्रमणिका 01. वर्तुळाचा एक कोन = मृत्युन्जय 02. नवी सुरुवात = आंबट गोड 03. ती आणि द्वारकाधीश = ज्योति अलवनि 04. ईश्वराचा शोधं = भृशुंडी 05. पाउलखुणा = श्वेता व्यास 06.

'नाते' म्हणून आहे!

लेखक सत्यजित... यांनी मंगळवार, 28/03/2017 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
तुटली सतार पण मी गाते म्हणून आहे या मैफलीत मीही,'नाते' म्हणून आहे! निर्व्याज सोबतीच्या भेटी गहाळ झाल्या नाते अता खरेतर 'खाते' म्हणून आहे! जेवण,चुडा नि साड्या,देतोच ना मला तो खात्यात नाव त्याचे,'दाते' म्हणून आहे! गजरा गुलाब अत्तर,निर्गंध होत गेले शृंगारही अताशा,'न्हाते' म्हणून आहे! स्मरते नि छिन्न करते,एकेक गीत त्याचे या काळजात फिरते पाते म्हणून आहे! या लेखणीस कितिदा,तोडून पाहते पण माझ्यासवेच तीही,'जाते' म्हणून आहे! —सत्यजित
काव्यरस

गँगस्टर - 3

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 28/03/2017 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
झोपडी ठिबक ठिबक. अंधारात हरवलेली. पुढे मोकळे मैदान. अन मोकाट जनावरे विसावलेली. कोपऱ्यातल्या त्या बिल्डींगमधले दिवे अजूनही जळत होते. सभोवताली थोडीशी झाडी. अन बाकीच्या इमारती. आम्ही पायऱ्यांवर बसलो. बोचऱ्या थंडीने अंग शहारत होते. करीमने बीडी पेटवली. "वही दिखी" कोपऱ्यातल्या बिल्डींगकडे इशारा करत त्याने झुरका घेतला. हे 'तिचं' कितवं ठिकाण? गिणती नाही. "आप उसे जाके बात क्यू नही करते?" त्याने विचारलं. च्युता साला. मी जरावेळ त्या मातीत लवंडलो. टप टप टप बारीश आती है. दिल बहलाती है. धूप खिलती है.

किमान दिड वर्षं ---- कथा (काल्पनीक)

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 27/03/2017 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
किमान दिड वर्षं ---- कथा (काल्पनीक) विकी , अन्या , रम्या आणी जग्या नुकतेच एका नवीन कंपनीत जॉइन झाले होते . काहि दिवसातच त्यांची एकमेकांशी चांगली ओळख झाली . हे चारहीजण आता एकाच प्रोजेक्टमध्ये काम करणार असले तरी त्यांची कामाची आणी तंत्रज्ञानाची पार्श्वभुमी वेगवेगळी होती . त्यांच्या टिम्सही वेगवेगळ्या असणार होत्या . चौघांनीही याआधी दोन तीन ठिकाणी काम केले होते . त्यामुळे आपापल्या तंत्रज्ञानामध्ये त्यांना मध्यम स्वरुपाचा अनुभव होता . प्रोजेक्टचे मुख्य काम चालु होण्याला अजुन दोन आठवडे अवकाश होता . त्यामुळे सध्या तरी ते निवांत होते .

मिस्टर डब्लो

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी सोमवार, 27/03/2017 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
संशोधन गुप्त होतं म्हणून तो गप्प बसला नाहीतर ‘युरेका युरेका’ असं ओरडत नागडं पळाला असता. पण ज्याच्यामुळे या शोधाची प्रेरणा मिळाली त्या जैवशास्त्रज्ञ मित्राला बातमी देणं आवश्यक होतं. डॉक्टर नाकतोडेने शंकुपात्रात पडून असलेला मोबाईल उचलला अन लंबेला कॉल केला “बुट्ट्या, लगेच प्रयोगशाळेत ये.” “नंतर येतो, सध्या मी माकडांना डान्स शिकवतोय.” “त्यांचं सोड, इथे आल्यावर तूच डान्स करायला लागशील. बेट्या तू शापमुक्त होणार आज.” “काय सांगतोस नाकतोड्या.

हे बंध रेशमाचे...(मध्यरंग आणि पूर्वरंग)

लेखक बोलघेवडा यांनी सोमवार, 27/03/2017 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच शशक स्पर्धेचा निकाल लागला आहे. त्यातील विजेत्यांचे अभिनंदन आणि साहित्य संपादकमंडळाचे स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी आभार मानतो. या स्पर्धेसाठी मी हि एक शशक लिहिली होती. त्याच कथेचा पूर्वरंग (प्रीक्वेल) आणि मुळ कथा इथे सादर करत आहे.
------------------------------------------------------------------------------------------------- हे बंध रेशमाचे (मध्यरंग) (शशक स्पर्धेसाठी लिहिलेली कथा) "अरे नुसती मजा. तुला सांगतो...हि अशी...उंssच लाट यायची..." नातू ‘आ’ वासून ऐकतोय. “पाण्याची?” "मग!!! इथल्यासारखं नाही... शंख, शिंपले, खेकडे, मऊ, मऊ वाळू...

शेजाऱ्याचा डामाडुमा - नेपाळ-७

लेखक अनिंद्य यांनी सोमवार, 27/03/2017 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
शेजाऱ्याचा डामाडुमा -नेपाळमध्ये राणा राजवट - बहर - भाग ७ थरारक 'कोट' पर्वानंतर पंतप्रधानपदी आरूढ झालेल्या जंगबहादूर कुंवरने शौर्यदर्शक राजसी 'राणा' हे उपनाम धारण केले आणि स्वतःची सत्तेवरील पकड बळकट करण्यासाठी जे जे करता येईल ते करायचा सपाटा लावला. सर्वप्रथम नेपाळच्या जवळपास सर्व महत्वाच्या राजकीय, न्यायालयीन, मुलकी आणि सैनिकी पदांवर त्याच्या भावांची-मेव्हण्यांची-कुटुंबकबिल्याची नियुक्त्ती घडवून आणली. त्याला आता राजे राजेंद्र किंवा कांचामहारानी राजलक्ष्मीचा काही उपयोग नव्हता.

विहार...भाग ४ (अंतिम)

लेखक चिनार यांनी सोमवार, 27/03/2017 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या तीन भागांची लिंक http://www.misalpav.com/node/39239 http://www.misalpav.com/node/39266 http://www.misalpav.com/node/39271 वॉर्डमधल्या डॉक्टरांनी अहमदला सांगितले, "उद्या सकाळी इरफानला डिस्चार्ज मिळणार." एकीकडे मुलगा बरा झाल्याचा आनंदामुळे अहमदच्या चेहऱ्यावर हसू होते. पण मनात कुठेतरी तो अस्वस्थ होता. गेले कित्येक दिवस एक प्रश्न स्वत:ला विचारण्यापासून त्याने अडवून धरला असला तरी आता ती वेळ आली होती.

अगोंद-पाळोळें (दक्षिण गोवा) भटकंती

लेखक गॅरी ट्रुमन यांनी सोमवार, 27/03/2017 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात दक्षिण गोव्यात अगोंडा आणि पालोलेम या ठिकाणी जाणे झाले. आम्हाला दोघांनाही गोवा हे राज्य अगदी प्रचंड आवडते. त्यामुळे गेल्या ६ वर्षातील ही गोव्याची पाचवी भेट झाली. प्रत्येकवेळी नव्या कुठल्यातरी समुद्रकिनार्‍याच्या जवळ एखाद्या रिझॉर्टमध्ये राहून थोडीफार भटकंती करूत निसर्गाचा आनंद लुटायला आम्हाला दोघांनाही फारच आवडते. यापूर्वी कोलवा, वारका, बाणावली (बेनॉलिम) आणि वेताळभाटी (बेतालबातीम) हे चार समुद्रकिनारे झाले होते. यावेळी राहिलो होतो काणकोणजवळ असलेल्या अगोंद (अगोंडा) या समुद्रकिनार्‍याजवळील एका रिझॉर्टमध्ये.