Skip to main content

जीवात्मा

लेखक संदीप-लेले यांनी शनिवार, 01/04/2017 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
कधी ह्या देहात, कधी त्या देहात आणि फिरतसे, अनेक योनीत असे कुठे वास, मधल्या वेळेत? आणि करे काय, नसता कशात? ओळख तयाची, कोणत्या खात्यात? तोच हा अमुक, कोण ठरवत? आहे तो खरेच, कसे हे ठरत? नसती भावना, प्राण्याच्या योनीत अचानक येती, मानवी देहात आज जारे बाबा, अमुक देहात आणि कर मजा, तमुक योनीत सांगा असे सारे, कोण त्यां सांगत? आणि गुपचूप, कोण शिकवत? जातो का शाळेत, मधल्या सुट्टीत? वेदना जखम, काया ही झेलत स्वत्वाची जाणीव, कायम सोबत सतत कर्मात, असे हीच रत तरी म्हणे भोग, असे हा भोगत फळाची आसक्ती, नसावी कायेत ह्यास मात्र फळ, मुक्तीच्या रुपात ऐकावे नवल, गंमत जंमत नाही रंग रूप, आकार बंधात तरी लागे गुण, किंव

I Love You

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 01/04/2017 06:56 या दिवशी प्रकाशित केले.
" यार आज १ एप्रिल आज कुणालातरी मस्त april fool बनवूया . " " अरे आज बघू कोण कुणाला सगळ्यात भारी fool बनवतंय . " " अरे कोण काय काय करतंय ते बघू तर . " " चल कोण कुणाला सगळ्यात भारी बनवतय त्यावर winner ठरवू काय. जिंकेल त्याला मानलं . " " अरे हर जगह सुमित भाई हि आगे रहेगा आज भी और कल भी . " " ए सुम्या बस कर हा तुझी पोपटपंछी अरे इथं सगळ्याला माहित असत " " तरीपण आपणच winner होणार सुमित पाटील is the winner . " " ए बस झालं हा तुझं . " " अरे त्याच काय घेऊन बसलाय ते नुसतंच मोठमोठ्या बाता मारत असत चल जाऊ आपण . यार राहुल चल ना . आर लक्ष कुठं आहे राव तुझं .

( वरपरीक्षा )

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 31/03/2017 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे

वधूपरीक्षा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 31/03/2017 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
वधूपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही,कसे अघटित घडले त्या चित्त चोरट्याला,आपले म्हणून बसले * होते पुढे शिकायचे,आईचे ऐकून फसले वधू परीक्षेस मी,का सजून बसले? * त्या हस~या छबीत,मीच हरवून बसले. त्या एका कटाक्षाने,घायाळ होऊन गेले.. * बोलणे असे आर्जवी,का मनास गुंतवावे.?. ठेवले जे सांभाळून,का वाटे उधळावे? * असेल मी आवडली?,कितीदा मना पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार त्यांचा,मन पाखरू व्हावे. वाटे हे जीवन,त्या चरणी अर्पावे.. * नव्हते मनात माझ्या,मग का असे घडावे? या गारुडास सांगा,काय नाव द्यावे?

||कोहम्|| भाग 6

लेखक शैलेन्द्र यांनी शुक्रवार, 31/03/2017 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
||कोहम्|| भाग 6 मागच्या भागात आपण विविध प्राणी आणि त्यांचे वेगवेगळे समुदाय यांच्या विषयी थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, उत्क्रांतीत नेहमी तेच प्राणी यशस्वी ठरलेत जे सामुदायिक आयुष्य जगू शकले.

मदत - रामरक्षा स्तोत्र..

लेखक चिगो यांनी शुक्रवार, 31/03/2017 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
एक मदत हवीय.. प्राचीन मिपात, २०१२ च्या सुरवातीच्या काळात, कुणीतरी एका धाग्यात एका भरपूर स्तोत्र असलेल्या वेबपेजची लिंक दिली होती. त्यात एक कुठल्यातरी दाक्षिणात्य (उच्चारांवरुन) गायकानी पठण केलेलं रामरक्षा-स्तोत्र ही होतं. अत्यंत भारावून टाकणारी लय होती त्या पठणात. उच्चारदेखील खणखणीत आणि स्पष्ट होते. मी त्यावेळी ते डाऊनलोड केलं होतं, आणि ऑलमोस्ट रोज रात्री ऐकायचो त्यावेळी.. पण आता ते मला सापडत नाहीये. डाऊनलोड केलेली फाईलदेखील हरवली आहे, आणि मी त्याकाळातल्या माझ्या मिपा भटकंतीचा धुंडाळा घेतला, त्यातही ती लिंक सापडत नाहीये.

दवंडी

लेखक ज्ञानदेव पोळ यांनी शुक्रवार, 31/03/2017 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका हो ऐका SSSS...... ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक होSSS…. असा हालगीचा आवाज काढीत दवंड्या बोळात शिरून दवंडी द्यायचा. त्याच्या आवाजाची चाहूल लागताच घराघरातली डोकी कान देऊन आणि श्वासाला थांबवून दवंडीचा अंदाज घ्यायची. अरुंद बोळातल्या अंधारातून वाट काढत दवंड्या दुसऱ्या बोळात पुढे निघून जायचा. सोबत मागे फिरणाऱ्या चिलीपिलीना घेवूनच. दवंड्या एखांद्या खिंडाराजळ पाचट पेटवून हलगीला गरम करायचा. मग हलगी पुन्हा घुमू लागायची. सोबत ऐका हो ऐका SSSS.. ही त्याची आरोळी घेऊनच. जाहीर माहिती देण्यासाठी दवंडीची आरोळी सोडली जाई.

तापतो उन्हाळा, निसर्ग देई गारवा

लेखक ऋतु हिरवा यांनी शुक्रवार, 31/03/2017 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
हंगामी भाज्या आणि फळे यांनी बाजार नुसता फुलला आहे. द्राक्षांचे घडच्या घड टोपल्या भरून दिसत आहेत. हिरवी आणि काळी ... आता द्राक्षे स्वस्त ही झाली आहेत. कलिंगडं, टरबूज, खरबूज यांचे ठिकठिकाणी स्टॉल लागले आहेत. हातगाड्यांवर केरळी लोक हे एवढे मोठाले फणस घेऊन बसले आहेत. कैऱ्या , करवंदे बघून तोंडाला पाणी सुटत आहे. ताडगोळे खरेदी करायला लोकांची गर्दी उसळत आहे. चिक्कूच्या टोपल्या भरल्या आहेत. काजूची पिवळी केशरी बोन्डे किंवा काजूची फळे कलात्मक रित्या टोपल्यात बायांनी लावून ठेवली आहेत. त्यांचे रंग लोकांना आकर्षित करून घेत आहेत. जवळच काजूबियांच्या टोपल्याही भरल्या आहेत.

अस्पृश्य

लेखक यांनी गुरुवार, 30/03/2017 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या शरीराच्या गरजा भागवण्या साठी वेगवेगळी सोंग नाचवतो,ह्या संसाराच्या शर्यतीत ,आपली लाईफ स्टाईल मेनटेन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो,पण ह्या शर्यतीत पळत असताना आपल्या आत असलेल्या परब्रम्हाला मात्र विसरून जातो,आणि आणि आपला इग्नोरन्स त्या आत्म्याला कायम अस्पृश्य ठेवतो,देहाला नटवताना आणि रंगवताना,अंतरीचा वेगळा रंग पाहायला मात्र आपण कधी कधी विसरतो.....त्या आत्म्याने जर स्वतः बद्दल काही सांगितले तर तो काय सांगेल बर ? अंतरीच्या गूढ गर्भात मी अस्पर्शित च राहिलो संसाराच्या शर्यतीत मी दुर्लक्षितच राहिलो पंचकोशांचे लेणे लेऊन मी आत बंधिस्त जाहलो पंचे

BS - III गाड्यांवर भरपूर सवलती!

लेखक शब्दबम्बाळ यांनी गुरुवार, 30/03/2017 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
आत्तापर्यंत सगळ्यांना माहिती झालंच असेल कि BS - III असणाऱ्या सगळ्या गाड्यांच्या विक्रीवर आणि नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिल पासून बंदी घातली आहे. त्यामुळे वाहन क्षेत्राला भरपूर तोटा होण्याचे दिसत आहे पण हा तोटा सामान्य ग्राहकाला फायदा मिळवून देऊ शकतो. आता बऱ्याच वाहन विक्रेत्यांनी आपल्या गाड्या लवकरात लवकर विकल्या जाव्यात म्हणून अगदी १५ हजारांपासून ते २५ हजारांपर्यंत सवलत दिलेली आहे!! होंडा नवी सारखी गाडी जिचा खप आधीच कमी आहे तिच्यावर २५हजारापर्यंत सूट आहे!