Skip to main content

आम्ही जियो घेतलंय

लेखक रावसाहेब म्हणत्यात यांनी शनिवार, 01/04/2017 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
(हे स्क्रिप्ट standup करण्याच्या उद्देशाने लिहिलेलं आहे त्यामुळे वाचताना बरेचशे जोक पट्कन लक्षात येणार नाहीत कदाचित. तरीही). भारतात मुकेश अंबानीच्या जियोने अक्षरशः वेड लावलंय. बघावं तो “आम्ही जियो घेतलंय आम्ही जियो घेतलंय” करून मिरवत असतो. गम्मत अशी कि जियो घेतलेल्या ९९% लोकांना स्वतःचे जियो नंबर माहित नाहीयत. खरी पंचाईत dual सीम वाल्यांची झालीय. Already दोन सीम सांभाळताना तारांबळ उडायची आता त्यात हे जियो कार्ड घालायचं कुठे. लोकं कानाच्या मागे सीम कार्ड लावायला लागलेत असं ऐकण्यात आलंय. हा काढायचा तो घालायचा, तो काढायचा हा घालायचा.

अनवट किल्ले: गंभीरगडाची सफर

लेखक दुर्गविहारी यांनी शनिवार, 01/04/2017 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
बहुतेक ट्रेकर किल्ले फिरायचे ठरविले कि पुणे, रायगड, नगर , नाशिक, सातारा किंवा कोल्हापुर या जिल्ह्यातले किल्ले फिरतात. पण प्रंचड आडव्या तिडव्या पसरलेल्या या महाराष्ट्रात बाकीच्या जिल्ह्यातही तितकेच प्रेक्षणीय किल्ले आहेत, त्यांची ओळख या लेखमालेतून आपण करुन घेउ. आजचा पहिला किल्ला जो आपण पाहणार आहोत तो आहे, ठाणे जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातिल गंभीरगड. तसा महाराष्ट्राच्या एका कोपर्‍यात असलेला हा गड, आपल्याला भेटीत अतिशय आनंद देउन जातो. गंभीरगड, कोहोज आणि अशेरी अशी दुर्ग त्रिकुटाची यात्रा करण्यासठी मी व माझा मामे भाउ संकेत डहाणू गावात दाखल झालो.

परदु:ख शितल

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 01/04/2017 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे माझा एक तरूण अभ्यासू मित्र... दहशतवादी आणि नक्षलवाद्यांबद्दल तो सुप्त सहानुभूती बाळगून होता. (ही सहानुभूती त्याला तथाकथित अभ्यासांतीच आलेली.) ज्याच्यावर अन्याय होतो तो दहशतवादी होतो असे त्याचे तत्वज्ञान. (अन्याय तर संत ज्ञानेश्वरांवर झाला होता. संत तुकारामांवर झाला होता. महात्मा गांधींवर झाला होता. बाबासाहेब आंबेडकरांवरही झाला होता.) मुंबईतले बाँम्बस्फोट त्याला खूप मोठे वाटले नाहीत (मृतांची आणि जखमींची संख्या सर्वश्रुत.). मुंबई दहशतवादी हल्ला त्याला खूप मोठा वाटला नाही. (मृतांची आणि जखमींची संख्या सर्वश्रुत.). अमेरिकेतला हल्ला त्याला मोठा वाटला नाही.

मध्यरात्री

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 01/04/2017 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यरात्री गजबजावे नभ वितळत्या चा॑दण्याने भरुनी जावा ओ॑जळीचा चषक त्या फेनिल प्रभेने मध्यरात्री सळसळावे बेट पिवळे केतकीचे भरुनी जावे आसम॑ती ग॑ध थरथरत्या तृणांचे मध्यरात्री कुजबुजावा मेघ बिलगुनी पर्वता त्या ध्वनीने विरत जावी दाट गहिरी शा॑तता
काव्यरस

डान्स बार २

लेखक वरुण मोहिते यांनी शनिवार, 01/04/2017 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
६०% -४०% असा हिशोब असायचा .म्हणजे ६०% त्या मुलीला जिच्यावर उडवणार आणि उरलेले ४०% बार मालकाचे .त्या ६०% मधून पण मुलींना ५०% मिळायचे कारण बाकी वेटर ,छोटे मोठे काम करणारे लोक ह्यावर १०% निघून जायचे .म्हणजे मी ५० हजार उडवले कि मुलीकडे २५ हजार .तर काही लाख एकाच दिवशी उडवल्याने बाईसाहेब आम्हाला पटलेल्या . बाकी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून आम्ही आघाडी घेतलेली .ती जरा डिसेंट वागण्याने .कारण माझ्या हाताने पैसे उडव वैगरे प्रकार मी केला नाही मी वेटर ला सांगायचो . काही मोठी लोकं यायची नुसती उडवून जायची .

#मिपाफिटनेस - मी आज केलेला व्यायाम - एप्रिल २०१७

लेखक इरसाल कार्टं यांनी शनिवार, 01/04/2017 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. या उपक्रमाद्वारे दर महिन्याला एक नवीन मिपाकर आपली 'व्यायामगाथा' घेऊन आपल्याला भेटायला येत राहील. या महिन्यात व्यायामाचा अनुभव सांगत आहे "इरसाल कार्ट" वाडा सारख्या एका अर्थाने दुर्गम भागात राहून धावण्याला सुरूवात करून आणि एकट्यानेच परंतु कमालीच्या सातत्याने धावत राहून व नितांतसुंदर फोटो टाकून इरसाल कार्ट्याने ग्रुपवरच्या सर्व सायकलवीरांना रोज इनो घ्यायला लावले आहे.

खो कथा (२)- कथा पुर्ण करा आणी शिर्षक सुचवा.

लेखक औरंगजेब यांनी शनिवार, 01/04/2017 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
साल-१९३७-मे महिना सकाळ नुकतीच झाली होती. मे महिना असल्याने आंब्याने झाडे लहडली होती. रामभाउ खोत नुकतेच प्रातर्विधी उरकुन ओसरीवर चहा भुरकत बसले होते. येवढ्यात गणप्या गड्याने गाडी लावल्याची वर्दी दिली. रेशमी बंडी, जरीकाठी धोतर कपाळी पुणेरी पगडी वरती कानात अत्तराचा फाया असा वेश करुन रामभाऊ गाडीत बसले. यथावकाश गाडी गावाबाहेर पडली. जंगल सुरु झाले. तालुक्याला जायचे म्हणजे वाट जंगलातुनच असायची. खोत आपले मजेत तक्याला टेकुन पान जमवत बसले होते. जंगलातल्या भैरोबा देवापाशी गाडी थांबली. खोतांनी नारळ वाढवला. तशी ही गावची परंपराच होती.

चेटकीण

लेखक यांनी शनिवार, 01/04/2017 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या लहान पणी म्हणे एक चेटकीण असायची जी मुलं मस्ती करतात त्यांना ती पकडून न्यायची गावाबाहेर नदीच्या पल्याड तिची झोपडी असायची नाही म्हटलं तरी आम्हाला तिची मनापासून भीती वाटायची मोठे लोक म्हणायचे मुकाट्याने जेवा नाही तर ती येईल वेदना असह्य होतील अशा गरम तेलाच्या कढईत ती टाकील हि चेटकीण आम्हाला विविध रूपात भेटायची कधी हडळ बनून तर कधी बुआ बनून यायची मस्तीखोर मुलांना पकडून नेणच जणूं तीच काम होत आमच्या आयुष्यात मात्र तिला बागुलबुवा च स्थान होत आमच्या बालपणाच्या गोष्टीत तिला एक खास जागा होती अगदी आई बाबांच्या लहान पणी सुद्धा ती अशीच म्हातारी होती तिच्या भीतीने का होई ना आमचे बालपण घडले चांगल

खरा भक्त आणि भोंदूबाबा

लेखक परशु सोंडगे यांनी शनिवार, 01/04/2017 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा *************** भक्ती त्या दिवशी मी निवांत चहाच्या टपरीवर बसलो होतो. कामचं नव्हतं काही. टाईम पास चाल्ला होता. टाईम पास करणं ही वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही.काय करावं हेचं कळतं नाही मुळी .डोकचं बंद पडतं. तेवढयात माने गुरूजी आला.माने म्हणजे सज्जन माणूस...खोट बोलायचं ते ठरवून ही तो बोलू शकत नाही. का तर ? त्याला पाप लागेल. देवाधर्माचा लयं नाद. नाद म्हणजे निव्वळ याडचं त्याला. सकाळ संध्याकाळ पूजा करायची. नुसता देवदेव करायचं याड. पूजा अर्चा करणं .वा-या करणं. फक्त दिंडीत जाण्यासाठी त्यांनी अख्या अर्जीत रजा खर्च करणारे ते सर. महान आहेतं. कसा वेळ घालवायचा हा सुध्दा मोठा प्रश्न असतो?