Skip to main content

फुत्कार

लेखक संदीप-लेले यांनी बुधवार, 29/03/2017 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
हिशोब ठेवता येणार नाही इतकी घरं मागे टाकून ती अवघड व्यक्ती प्रवास करते आहे. आतापर्यंतच्या प्रवासात अनेक दो-या तिच्या नाळेला जोडल्या होत्या. अनेक दिशांनी त्या दोऱ्या तिची नाळ खेचत आणि विवशतेने ती व्यक्ती त्या अगम्य शक्तींच्या निर्हेतुक खेचाखेचीत, नाळ तुटणार नाही अशा दिशेने फरफटत जाई. ती धूर्त व्यक्ती, हळूहळू एकेक दोरी कापत, आता अशा स्थितीत आहे की आपण फरफटतो आहोत याचे भान सुटले आहे. काळसर्पावर विजय मिळवल्याचा सामान्य मानवी उन्माद, तीव्र प्रकाशाने अधू झालेल्या तिच्या नजरेत गर्वाने फडकतो आहे.

मी बाई होते म्हणुनी - भाग १५

लेखक ५० फक्त यांनी बुधवार, 29/03/2017 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी . . भाग - १४ - http://www.misalpav.com/node/39099 .. ‘लक्ष्मणाचा विवाह उर्मिलेशी, शत्रुघ्नाचा श्रुतकिर्तीशी आणि भरताचा मांडवीबरोबर होणं योग्य आहे असे मला वाटते.’ राजा दशरथांचा आवाज त्या ठिकाणी भरून राहिला आहे असा भास झाला.

गालबोट

लेखक भटकीभिंगरी यांनी बुधवार, 29/03/2017 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करुन प्रथम घरच्या देवांची पुजा केली. मग आवरुन शोभायात्रेसाठी निघाले . यावर्षी चित्ररथात सहभाग नव्हता .. पण यात्रा पहायला जाणार होते... यंदा खूप कमी रथ सहभागी झाल्याने मिरवणुकीचा रुट कमी टप्प्याचा होता . मी तेथे पोचेतो मिरवणुक खूप पुढे आली होती म्हणुन मी तशीच पुढे जाउन सुरवातीच्या रथापाशी थांबले. ज्यायोगे सर्व यात्रा पाहाता येईल ...

स्मरणदिवा

लेखक रायबा तानाजी मालुसरे यांनी बुधवार, 29/03/2017 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
आता शाळा सोडून कितीतरी वर्ष उलटली, पण अजूनही रंगपंचमीच्या आसपास हवा अशी काही बदलते की मला वार्षिक परिक्षेचे वेध लागतात. 'आभ्यास कर आभ्यास कर' म्हणून आईचं मागे लागणं, बाबांचं रोज संध्याकाळी घरी आल्यावर 'आज किती झाला आभ्यास?' म्हणून विचारणं असं सगळं सगळं आठवतं. परिक्षा काय, जाते तशीच जायची पण परिक्षा संपल्याच्या दुसर्‍या दिवशी माझं आजोळी जाणं मात्र ठरलेलं असायचं. आजोळचा जुना वाडा. या अशा भल्यामोठ्या खोल्या! पलीकडे स्वयंपाकघर. स्वयंपाकघरातच एका कोपर्‍यात मोरी. कोणी मोरीत गेलेलं असलं म्हंजे स्वयंपाकघराचं दार बंद. अशाच वेळी भावंडांपैकी कुणाला तरी काहीतरी खायला हवं असायचं. मग आजीला हाका.

वसंत आगमनाचे अवलोकन सायकल वरून २२/०३/१७

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी बुधवार, 29/03/2017 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांत कोकिळ गान कानी येउ लागलय .. आणि शहरातील वृक्ष ही वसंत आगमनाची चाहूल देताहेत .. आजची सायकल यात्रा याच उद्देशाने , वेग कमी ठेउन , वसंत आगमनाचे अवलोकन करण्याच्या उद्देशाने करायचे ठरवले होते . पहाटे सहा ला निघालो .. मार्ग ठरवला अंबरनाथ वेस्ट वरुन वन ट्री (अंबरनाथ मधील ) पॉइंट मार्गे टिटवाळा ते सोर गाव जेथे नाशिक हायवे लागतो तिथपर्यंत . अंबरनाथ वेस्ट वरुन वन ट्री हिल कडे वळलो कि थोड्याच वेळात छान चढ लागतो .. अनेक जण या रस्त्यावर मॉर्निग वॉक साठी जातात .. वन ट्री नंतर मात्र रस्ता मोकळा असतो .. सुरवातीला उक्षी ,कुडा बहरलेले दिसले .. थोड पूढे गेल्यावर एक जलस्त्रोत (नदी ) लागते ..

पांडू पाटील

लेखक ज्ञानदेव पोळ यांनी बुधवार, 29/03/2017 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
4 पोरं, 3 पोरी, 21 नातवंडे, 16 परतुंड आणि अजून काही दिवस जगला असता तर खापर परतुंड बघण्याचं भाग्य लाभलेला चालता फिरता माझा आज्जा पांडू पाटील रात्री साडे दहा वाजता मातीत मिसळून गेला. 98 वर्षे जगलेला आणि जुनी चवथी शाळा शिकलेला गावातला शेवटचा दणकट म्हातारा. पण या वयापर्यंत कधी दाताला कीड लागली नाही कि डोळ्याला चष्मा लागला नाही. स्वातंत्र मिळायच्या आधी जन्माला आला तेव्हा राबायला शेताचा एक तुकडा होता आणि राहायला खणभर घर. पण दिवस रात्र राबून पंचवीस एकर जमीन केली. दोन विहिरी पाडल्या. सगळया वावरांचा कोपरा न कोपरा भिजवून काढला, आणि शहरात नोकरी करणाऱ्या पोरांना गावात चार घरे सुद्धा बांधली.

बोललो नाही कधी पण...

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 29/03/2017 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द,शपथा,भाव,कविता..बेअसर झाले बोललो नाही कधी पण दुःख तर झाले! चेहऱ्यावरची न रेषा एकही ढळली वार काही काळजाच्या खोलवर झाले! लागला धक्का असा अन् सांडला पेला... पान दुष्काळी कथेचे ओलसर झाले! या इथे,खेळायची ती सूर-पारंब्या हेच अंगण..आज त्याचे माजघर झाले! तू दिलेली डायरी अन् पीसही जपले डायरी आकाश माझे..पीस पर झाले! व्हायचे असतेच ते होवून जाते पण नेमके कळले कुठे जे आजवर झाले? —सत्यजित
काव्यरस

ट्वीटव्याख्यान या उपक्रमातील सहभागाचा अनुभव

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 29/03/2017 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
३-६ फेब्रुवारी या काळात ट्विटरवरील @marathiword या हँडलने ट्विटर्संमेलन हा उपक्रम आयोजित केला होता. हे या उपक्रमाचं दुसरं वर्ष होतं. मराठी साहित्य संमेलनाच्या जोडीने आयोजित होणार्‍या या उपक्रमाला पहिल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही जबरदस्त प्रतिसाद मिळाला. सोशल मिडियावरील मराठीचं अस्तित्व भक्कमपणे समोर येणं, मराठी मंडळींना सोशल मिडियावर व्यक्त होण्यासाठीची एक विशेष संधी, अवसर मिळणं ही या उपक्रमाची निवडक उद्दिष्ट. उपक्रमाच्या आयोजकांतर्फे या वर्षी मला यातील 'ट्वीटव्याख्यान' सदरात सहभागी होण्याचं निमंत्रण आलं.

वर्षारंभाची सायकल राइड (अंबरनाथ ते वरदविनायक महड -अंबरनाथ)

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी बुधवार, 29/03/2017 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या रविवारी २६ ला कल्याण सायकलीस्ट बरोबर बारवी धरण ची छोटीशी राइड केली तेव्हा, २८ ला कोणती राइड करायची याची चर्चा झाली, पण सोमवार पर्यंत धड काही ठरत नव्हते, उल्हासनगर सायकलिंग क्लब मध्ये ही नुसती चर्चा सुरु होती, बर्याच जणांना सुटी नसल्याने वा सुटी असूनही जावे लागतंय ,या कारणाने सकाळी छोटी १५/२० ची राइड करू असाच सर्वांचा कल दिसत होता. इतक्यात “गोवा मुंबई सायकल २०१७” या ग्रुप वर समीर दातार ची एक पोस्ट दिसली, वाशी ते महड राइड टोटल १३० प्लस. गुगल बाबा कडे विचारणा केली अंबरनाथ ते महड कसे जायचे? चौक वरून १६ किमी असे उत्तर आले. तरी दोन मित्राना विचारले तेही असेच जावे लागेल असे म्हणाले.