Skip to main content

(नेक्स्ट) गॉन गर्ल

लेखक एमी यांनी शुक्रवार, 24/03/2017 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
चांगली-वाईट, सुष्ट-दुष्ट, काळ्या-पांढर्या अशा एकाच रंगातल्या व्यक्तिरेखांच्या गर्दीत अचानक कधीतरी करड्या व्यक्तिरेखा सापडतात आणि मी चौकस होते. त्या जर स्त्रिया असतील तर अपील जरा जास्तच. अॅना केरनीना, स्कार्लेट-ओ-हारा, लिजबेथ सेलँडर... यांना ननायिका म्हणतात. यांच्यात काही सद्गुण सहजपणे सापडतात म्हणून त्या नायिका. पण तेवढेच दुर्गुणदेखील असतात त्यामुळे ननायिका. अँटीहिरोइन. पण कधीकधीमात्र अश्श्या बायका भेटतात की बस्स! धक्काच बसतो! काय चांगलं काय वाईट याची जाण यांच्यात भीषणपणे गंडलेली असते. या बायका स्वतःहून कुठल्याही चांगल्या व्यक्तीला त्रास देत नाहीत.

कथाकथी

लेखक पुंबा यांनी गुरुवार, 23/03/2017 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, आजच अस्मादिकांना मिपागावाचे रहीवासी झाल्याला एक वर्ष पूर्ण झाले. इतके दिवस धागा लिहिण्याला धीर होत नव्हता पण आज आदूबाळ म्हटले धागा काढा. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून, हा धागा काढून मिपावाढदिवस साजरा करत आहे. आपल्यापैकी बहुतेक प्रत्येकाच्या वाचनाची सुरूवात कथांपासूनच झाली असेल. याला कारण म्हणजे, मराठी, हिंदी, इंग्रजीच्या पुस्तकांतील धडे. या धड्यांमध्ये मातब्बर लेखकांच्या छोट्या कथा असत/असतात. पुस्तक घरी आलं की सगळ्यात आधी पुस्तकाचा वास घ्यायचा आणि वेष्टणं पण घालायच्या आधी सगळे धडे वाचून टाकायचे असं केल्याचे कित्येकांना आठवत असेल. आपल्यापैकी कित्येकांची प्रेमचंद, दि. बा.

विहार...भाग २

लेखक चिनार यांनी गुरुवार, 23/03/2017 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागाची लिंक http://www.misalpav.com/node/39239 चोवीस तास इरफानच्या शरीरात त्याची एक किडनी स्वछंद विहार करत होती !! हे सगळं आठवल्यावर अहमदच्या अंगावर शहारे आले. भानावर येताच आपण होडीवर असल्याचे त्याच्या ध्यानात आले. अहमदने त्याच्या बायकोला जास्त तपशील न सांगता फक्त नडियाडला जावे लागेल एवढेच सांगितले. तिला त्याचे गांभीर्य पूर्णतः: कळले नसले तरी ती चिंतातुर झालीच. नाडियाडला तिचा लांबच्या नात्यातला एक भाऊ राहायचा. त्याच्याकडे उतरता येईल असे तिने अहमदला सांगितलं. अहमदला या गोष्टीची काळजी नव्हतीच.

प्रमोशन

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 23/03/2017 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
माॅर्निंग ब्रेकची वेळ. ब्रेकफास्ट काऊंटरवर मार्निंग शिफ्टच्या एम्प्लाॅईजची तुरळक गर्दी होती. बेनमेरीमधल्या स्टीलच्या ट्रेमधून अनेक पदार्थांचा संमिश्र असा वास दरवळत होता, पण त्यातूनही रस्समचा वास ब-यापैकी नाकाला ठसका देत होता. मधूनच बाजूला टांगलेल्या निळ्या रंगाच्या फ्लाय किलरमध्ये माश्या चिकटल्याबरोबरचा 'चट..चट' आवाज काही नवख्या एम्प्लाॅईजचे लक्ष वेधत होता. लॉगईन करून दोन चार कामाचे मेल चेक केल्यानंतर रोहन आणि मिंजल कॅन्टीनमध्ये ब्रेकफास्टसाठी आले होते.

मनाचा प्रवास

लेखक ऋतु हिरवा यांनी गुरुवार, 23/03/2017 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी मी कल्याणला ट्रेन पकडते. एकदा आपल्या आसनावर स्थिरस्थावर झालं की बरोबर वाचण्यासाठी घेतलेलं पुस्तक मी काढते. मन एकाग्र व्हायला थोडा वेळ लागतोच कारण तोपर्यंत लोकांची उठ बस , ये जा चालू असते. पण पुस्तकात लक्ष घालून मी वाचण्याचा प्रयत्न करू लागते. अंबरनाथ सोडले की माथेरान डोंगर रांग सुरु होते. मग पुस्तक बाजूला ठेवून ते डोंगर निरखण्यात मन गुंग होऊन जातं. ज्या डोंगरांवर गेले आहे ते पाहून मन हर्षभरित होते तर जिथे नाही गेले तिथे कधी जायला मिळेल या विचारात हरवून जातं. मधून मधून पुस्तक वाचन चालूच असतं. कर्जत सोडले की पुन्हा बोगदे आणि लुभावणाऱ्या डोंगर रांगा दिसू लागतात.

राधा

लेखक शैलेन्द्र यांनी गुरुवार, 23/03/2017 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्ण जाणून घेण्यासाठी, तुला राधा व्हावं लागेल, रुक्मिणीच्या महाली त्याच, येणं जाणं पाहावं लागेल.. पण एकदा तू हे जाणलस कि, सदैव सचैल भिजत राहशील या महालांच्या कोलाहलात पावा होऊन वाजत राहशील.. -शैलेंद्र
काव्यरस

तो खुला बाजार होता!

लेखक सत्यजित... यांनी गुरुवार, 23/03/2017 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
चोरटा व्यापार कसला?तो खुला बाजार होता वासना अन् भूक यांचा..रोजचा व्यवहार होता! चार फांद्या वाकलेल्या दोन खिडक्या झाकलेल्या सांधले काही कवडसे..फाकला अंधार होता! मनचले भुंगे उगाचच,फूल गोंजारुन बघती पाकळ्या चुरगाळलेल्या..स्पर्श थंडा-गार होता! देह विझलेले जगाची वासना जाळीत होते चालला रस्त्याकडेने भोंगळा यल्गार होता! हासताना जिंदगीची राख ती उधळीत होती... हो,तिच्या देहात नक्की शायरी अंगार होता! —सत्यजित

||कोहम्|| भाग 4

लेखक शैलेन्द्र यांनी गुरुवार, 23/03/2017 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
कोहम् भाग 4 जर आपल्याकडे आज (किंवा भविष्यात) टाइम मशीन असेल आणि त्यात बसून जर आपण लाखभर वर्षांपूर्वीच्या पूर्व आफ्रिकेत गेलो तर आपल्याला आपल्यासारख्या दिसणाऱ्या मानवांचे अनेक समूह दिसतील, लहान लहान मुलं आईच्या कडेवर बसलेली असतील, काही मागे फिरत असतील, पुरुष शेकोटीभोवती किंवा नुकत्याच मारलेल्या शिकारीभोवती बसून तिचे वाटे करत असतील, काही तरुण तरुणी स्वतःत मश्गुल असतील तर काही वृद्ध शांतपणे हे सगळं बघत, आपलं दुखर शरीर घेऊन बाजूला बसले असतील.. पण मग अगदी असंच चित्र तुम्हांला लांडग्यांच्या, म्हशींच्या, हत्तीच्या आणि माकडांच्या कळपातही दिसेल.

[खो कथा] पोस्ट क्र. ५

लेखक दीपक११७७ यांनी बुधवार, 22/03/2017 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
[खो कथा] पोस्ट क्र. १ [खो कथा] पोस्ट क्र. २ [खो कथा] पोस्ट क्र. ३ [खो कथा] पोस्ट क्र. ४

[खो कथा भाग १ ते ४ - आतापर्यंत... आणि भाग ५]

शालू आणि शशिकांत हे नवरा बायको आहेत. नाशिकमध्ये राहतात. अशोक हा शशिकांतचा लहानपणीचा मित्र आणि अगदी घरातला मेँबर असल्यासारखा आहे. तो मुंबईला राहतो. खुदीराम नावाचा गुढ इसम पांडव लेण्यांच्या परिसरात राहत असतो.