Skip to main content

मोहीम - २ फलक

लेखक अभ्या.. यांनी रविवार, 02/04/2017 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मागच्या भागात आपण पॅम्प्लेटस इन्सर्शन ह्या जाहीरात मोहीमेचा एक भाग पाह्यला. जाहीरातीसाठी वापरला जाणारा आद्य प्रकार म्हणजे नाम फलक. ह्या फलकांचे विविध प्रकार आपण ह्या भागात जाणून घेऊ. विषयाची व्याप्ती बरीच असलेने सुरुवातीपासूनचे फलक ते विद्युत आकाश फलक (हो, अशा फलकांना परवानगी देणार्‍या विभागाचे अधिकृत नाव हेच आहे) असे प्रकार क्रमश: पाहुयात. ह्यासंदर्भात काही सूचना, दुरुस्ती असल्यास स्वागत आहे.

आमची बागलाण मोहीम

लेखक नमिता श्रीकांत दामले यांनी रविवार, 02/04/2017 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
आमची बागलाण मोहीम १६७१ मध्ये शिवाजी महाराजांनी बागलाण मोहीम काढली आणि साल्हेर किल्ला जिंकून घेतला. ही बातमी दिल्लीच्या बादशहाला समजताच त्यानी इखलास खान आणि बहलोल खानाला प्रचंड मोठे सैन्य घेऊन रवाना केले. ही गुप्त खबर शिवाजी महाराजांना मिळताच त्यांनी मोरोपंतांना कोकणातून वार घाटीतून निघण्यासाठी व प्रतापरावांना थेट बहलोल खानाला जाऊन भिडण्याविषयी गुप्त खलिते धाडले. आणि धुळीच्या प्रचंड लोटांनी सूर्य झाकोळून जाईल अशी घनघोर लढाई झाली. मराठ्यांनी खानाच्या सैन्याचा पराभव करुन भरपूर लूट मिळवली आणि शिवाजी महाराजांची पकड बागलाणावर पक्की झाली.

मनातल्या मनात !!

लेखक अर्धवटराव यांनी रविवार, 02/04/2017 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस मनाविषयी चार ओळी टंकायची इच्छा होती. पण मन मानत नव्हतं :) आता थोडं मनावर घेतोय. आजवर मनावर जितका विचार झालाय तेव्हढा कदाचीत कुठल्याच विषयावर झाला नसावा. तत्वज्ञ, कवि, साहित्यीक, वैज्ञानीक, दार्शनीक... किंबहुना अवघी मानवजात या एका विषयाचं गेली कित्येक शतकं चिंतन करतेय. पण मन बालकृष्णासारखं समस्त वैचारीक ब्रह्मांड व्यापुन दशांगुळे उरतच. मनच ते. साधारणपणे 'भावना' या विषयाला धरुन मनाचा अभ्यास सुरु होतो. 'विचार' आणि/किंवा भावना या दोन घटकांची संगती लावणं हा फार मजेदार विषय आहे. प्रचंड मोठं शास्त्र उभं आहे याचा अभ्यास करायला. अलीबाबाची गुहाच ति.

बर्फाळलेले आईसलँड - भाग ५ - आईसलँडचे सुवर्ण वर्तुळ

लेखक विहंग३००७ यांनी रविवार, 02/04/2017 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भागांच्या लिंक येथे देत आहे भाग १ मिपा पांथस्थ भाग २ मिपा पांथस्थ भाग ३ मिपा पांथस्थ भाग ४ मिपा पांथस्थ काल ठरलेल्या बेताप्रमाणे मी, फिलीप, क्लारा आणि मॅगी सकाळी बरोब्बर ७ वाजता हॉस्टेलमधून बाहेर पडलो. जवळच्याच एका कार रेंटल सेंटरवर गेलो आणि एक गाडी भाड्याने घेतली. मॅगीचे ड्रायव्हिंग उत्तमच होते. पण आम्ही मुख्य रस्त्यावर आलो आणि अचानक एक गाडी थेट समोरून मोठ्याने होर्न वाजवत येऊ लागली. आम्हाला काही कळेनाच! तेवढ्यात फिलीप ओरडला, “we are on the wrong side of the road!!” मॅगीचा ड्रायव्हिंग अनुभव ब्रिटनमधला असल्याने सवयीनुसार तिने गाडी रस्त्याचा डाव्या बाजूने चालवायला घेतली होती. पुढे बसलेली क्लाराही ब्रिटीश असल्याने तिलाही त्यात काही वावगे वाटले नव्हते. अखेरीस तिने पटकन गाडी थांबवली आणि रिवर्स घेऊन उजव्या बाजूला घेतली. आमचा तर अगदी जीवच भांड्यात पडला. त्या रस्त्यावर फार वर्दळ नव्हती म्हणून नशीब. नाहीतर आमची ट्रीप थेट पोलीस स्टेशनमध्ये संपवावी लागली असती! मॅगीने गाडी सुरु केली की तिला रस्त्याच्या उजव्या बाजूकडे नेण्याची सूचना करायची असा अघोषित नियमच मग बनून गेला.

बर्फाळलेले आईसलँड - भाग ४ - स्कोगाफोस आणि थोर्समोर्क नॅशनल पार्क

लेखक विहंग३००७ यांनी रविवार, 02/04/2017 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भागांच्या लिंक येथे देत आहे भाग १ मिपा पांथस्थ भाग २ मिपा पांथस्थ भाग ३ मिपा पांथस्थ आजचा दिवस ठरवला होता आईसलँडच्या दक्षिण भागातील प्रेक्षणीय स्थळांसाठी. कालच्यासारखीच सकाळी आठ वाजता रिकयाविकच्या मुख्य स्थानकातून सुटणारी बस पकडली. ही बस मार्गातल्या स्कोगाफोस धबधब्यापाशी काही वेळ थांबून पुढे थोर्समोर्कला जाणार होती. आईसलँडचा हा दक्षिण भाग तुलनेने सपाट मैदानी असून इथली जमीन उपजाऊ आहे. आईसलँडची बहुतांश लोकसंख्या याच भागात एकवटलेली आहे. समुद्राच्या सान्निध्यामुळे इथे हवामानही उबदार असते. बस रिकयाविकच्या बाहेर पडली आणि आजूबाजूला हिरवी कुरणे, त्यात धावणारे घोडे, ल्युपिनची जांभळी फुले असे मनोहारी दृश्य दिसू लागले. साधारण साडेदहाच्या आसपास बस स्कोगाफोसला पोहोचली.

मराठी कुटुंब

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 02/04/2017 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मराठी कुटुंबामधे... राजा मामा..बाळकाका..छबुआत्या,,निर्मला वन्स..नानी . मालु वन्स अश्या नावाच्या व्यक्ति हमखास आढळतात

जुनी व्यवस्था आणि नवी व्यवस्था

लेखक arunjoshi123 यांनी रविवार, 02/04/2017 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
द न्यू ऑर्डरः १. स्वातंत्र्य, समता, बंधुता २. पूर्वीच्या राज्यकर्त्यांपासून स्वातंत्र्य, इथून पुढे जे काही वाढीव आहे त्यात समता, बंधुता पूर्वीचा राज्यकर्ता कोण? धर्म! मागची असमानता? ती पुढे चालूच. मग , ३. धर्मापासून स्वातंत्र्य, फक्त संधींत समता, बंधुता जे धार्मिक आहेत त्यांचं काय? त्यांना त्यांचा मूर्खपणा सोडायचा नाही आणि जबरदस्ती सोडून घेता येता नाही. समतेचे निकष काय? तर जे नैसर्गिक आहे त्या पुढे काही करायची धमक नाही, मग ४.

एक कोडे

लेखक शरद यांनी रविवार, 02/04/2017 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
एक कोडे आकडेमोडीची कोडी मिसळपाव सारख्या साहित्याला वाहिलेल्या संस्थेच्या फलकावर द्यावीत का ? उत्तर अवघड आहे. पण मी आज जे कोडे देत आहे ते निराळ्या कारणामुळे. दिलेल्या कोड्याची दहा-पंधरा उत्तरे असतील तर ती सगळी (किंवा निदान बरीचशी) तर्काच्या सहा सात पायर्‍यात (steps) मिळवता येतील का ? वयोमानाने , आळशीपणाने व कित्येकवेळी तसा प्रयत्नच न केल्याने बुद्धीला गंज चढतो. ही गोष्ट तशी न परवडणारी. तेव्हा म्हटले देऊ तर खरे. प्रतिसाद बघून कळेलच की मला वाटते त्यात काही तथ्य आहे का. एका गवळ्याकडे २५ गायी आहेत.१, २, ३, ...२४, २५.अशा क्रमांकाच्या. प्रत्येक गाय आपला क्रमांक आहे तेवधे लिटर दूध देते.

एक बेवारस प्रेत - माझा बाप

लेखक परशु सोंडगे यांनी रविवार, 02/04/2017 08:08 या दिवशी प्रकाशित केले.
भर रस्त्यावर कुत्री तुटून पडली होती. एका बेवारस प्रेतावर कुत्री भुंकत होती. गुरगुरत होती त्यांच्यातली त्यांच्यात रस्ता निर्मनुष्य नव्हताचं पण ते कुत्री हाकलून लावावीत असं कुणालाचं वाटतं नव्हतं. एका ही माणसाला पुरून टाकण्यापेक्षा प्रेत जाळून टाकण्यापेक्षा अशी खाऊ दयावीत कुत्र्यांना असं वाटत असेल सर्वांना पण पुन्हा कुत्र्यांचं राज्य येईल असं वाटलं नव्हतं कुणाला. मी तरी काय करू ?
काव्यरस

मराठी स्टँडअप ऑन बॉलीवूड

लेखक रावसाहेब म्हणत्यात यांनी रविवार, 02/04/2017 06:42 या दिवशी प्रकाशित केले.
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, म्हणजे अर्थातच आपली फिल्मी दुनिया. बॉलीवूड विषयी मला विलक्षण आदर आहे. म्हणजे जी industry गेली शंभर हून अधिक वर्षे कोट्यावधी लोकांना बनवून ठेऊ शकते. काय बनवून ठेऊ शकते ह्याकरता मुंबईत एक खास शब्द आहे जो मी इथे उच्चारू शकत नाही. तर बनवून ठेऊ शकते त्या industry करता माझे कोटी कोटी प्रणाम. आता प्रणाम केलाय तर आता काशी करायला सुरुवात करूया. कारण तुम्ही काय इथे माझा प्रणाम बघायला नाही आला. मला सांगा इथे शाहरुख खानचे किती fans आहेत?