Skip to main content

प्राणी पुराण - १ (मार्जारआख्यान)

लेखक औरंगजेब यांनी शुक्रवार, 17/03/2017 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
टीप :-हा धागा एका बोक्याची गोष्ट ह्या धाग्यांवरून स्फूर्ती घेऊन लिहिला आहे. तस मार्जार कुळाशी माझ काही वैर नाही. मार्जार मुळाशी माझा पहिला संबंध माझ्या बालपणीच आला. आमच्या बिल्डिंग मध्ये खाली राहणाऱ्या एकांनी घरी मांजरे पाळली होती. सोनू आणि मोनू मांजर ह्यांनी माझ्या लहानपणीच्या आठवणींचा बराच मोठा भाग व्यापला आहे. शाळेतून आल्यावर त्यांना दूध देणे हा मी आणि माझ्या चुलत भावाचा एक-कलमी कार्यक्रम असायचा. ते पायात पायात घोटाळणं, म्याव म्याव अशी लाडिक आर्जव करणं , जिन्यावरून थेट घरापर्यंत येणं अशी लाडीगोडी तर रोजचीच होती.

पण, लक्षात कोण घेतो!!!

लेखक विद्या चिकणे मांढरे यांनी शुक्रवार, 17/03/2017 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
परवा ऑफिसला जाताना बालगंधर्वच्या चौकात आले अन सिग्नल लाल झाला, म्हणून मग गाडी बंद करून सिग्नल पुन्हा हिरवा होण्याची वाट बघत उभी राहिले. तेव्हढ्यात साधारण अठरा-एकोणीस वर्षांची मुलगी गर्दीतून वाट काढत, सिग्नलवर थांबलेल्या काही निवडक लोकांना भेटून त्यांच्याशी काहीतरी बोलून त्यांना हातातल्या पुड्यातून एक-एक चॉकलेट काढून देताना दिसली. माझ्यासकट सगळेच 'ती नक्की काय बोलतीये आणि चॉकलेट्स का वाटतीये' या उत्सुकतेने तिच्याकडे बघत होते.

एकच अमृत घोट मिळावे

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 17/03/2017 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
चालता चालता जरा विसावे, दाट सावलीत जरा निजावे गंतव्यास अंतर बरेच बाकी, मागे वळून जरा पाहावे जे राहिले मागे ते विसरावे, जे आले सोबत ते घेत चालावे हरवले त्याची बेरीज कसली, मिळेल त्याचे आनंद असावे पडावे प्रश्न मनी अस्तित्वाचे, ह्या गूढाचे अर्थ कळावे अनंत आहे सागर बाकी, एकच अमृत घोट मिळावे निनाव १७.०३. २०१७

सुरंगी

लेखक जागु यांनी शुक्रवार, 17/03/2017 15:35 या दिवशी प्रकाशित केले.

बाजारात तुरी.....

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 17/03/2017 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
१. महाराष्ट्रात तुरीची उत्पादकता एकरी ४०० किलोसुद्धा नाही. यंदाच्या शासकीय आकडेवारीचा संदर्भ घेतला तर 37,80,712 एकरांवर ११ लाख ७० हजार मेट्रिक टन तुरीचे उत्पादन झाले, म्हणजे साधारण एकरी ३०९ किलो. पण आकडेवारी अचूक नसते म्हणून आपण आपल्या सोयीसाठी वाढीव आकडा म्हणजे एकरी ४०० किलो उत्पादन धरूया. हमीभाव ५०५० रुपये प्रति क्विंटल आहे. पण आवक प्रचंड वाढल्याने आणि आधारभूत खरेदी केंद्रात नंबर येण्याची वाट पाहणे परवडत नसल्याने काहींनी खासगी व्यापाऱ्यांकडे जेमतेम ३००० रुपये प्रति क्विंटल दरानेसुद्धा विकली आहे. पण आपण मिळालेला सरासरी दर ४००० रु./क्वि गृहीत धरूया.

अनबॉक्सिंग ऑडियो टेक्निका ATH-M20X

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 17/03/2017 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष भरा पूर्वी अनबॉक्सिंग सेनहायजर सी एक्स ३.० या धाग्यात इन In-Ear Canal Headphone बद्धल लिहले होते. सेनहायजर च्या एचडी २०२ आणि सी एक्स ३.० अनुभव घेउन झाल्यावर काही अनुभवलेल्या गोष्टी शेअर करतो. १} एचडी २०२ अजुनही उत्तम चालतोय, पण डोक्याला घट्ट बसणार्‍या स्पंजवर असलेले आवरण अगदी हलक्या दर्जाचे निघाले ! काही काळातच ते निघुन गेले.बाकी काही त्रास नाही. २} सी एक्स ३.० हा मी वापरलेला सगळ्यात कानात अगदी सुखदायक रित्या आरामात बसणारा In-Ear हेडफोन ठरला, पण काही काळापूर्वी त्याची सिलिकॉन टिप्स निघण्याचा त्रास जाणवु लागला !

खिडकी पलीकडचं जग भाग 3

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 17/03/2017 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ : http://www.misalpav.com/node/39159 भाग 2: http://www.misalpav.com/node/39179 खिडकी पलीकडचं जग भाग ३ मात्र खोल मनात गौरीला कुठेतरी खात्री वाटत होती की तिने त्या मैदानावर मुलांना बघितले होते. ती दुस-या दिवशीच्या संध्याकाळची वाट पाहात होती. साधारण पाचची वेळ झाली आणि तिची आई आणि ती खिडकीतून त्या मैदानाकड़े डोळे लावून बसल्या. पाचचे साडे पाच झाले... साडे पाचचे सहा. पण त्या मैदानावर चिटपाखरुही दिसले नाही. गौरी खूपच हिरमुसली.

Tokyo – A visit to remember

लेखक हृषिकेश पांडकर यांनी शुक्रवार, 17/03/2017 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
शरीराचे एखादे अंग निकामी असेल किव्वा त्याला व्यंगत्व असेल तर त्या व्यक्तीची बाकीची इंद्रिय इतरांपेक्षा जास्त सक्षम असतात हा निरीक्षणातून आलेला निष्कर्ष आहे.आणि या निष्कर्षाला पूर्णत्वाची पावती मिळते ती जपानला भेट दिल्यावर. काठोकाठ भरलेल्या बशीत बिस्कीट सोडावे तसे चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला निमुळता भूप्रदेश,आपल्याकडे लाईट जावी त्या सहजतेने होणारे भूकंप.हिरोशिमा,नागासाकी येथील हल्ल्यानंतर उध्वस्त झालेले जपान.

प्रासंगिक भटकंती वार्ता

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 17/03/2017 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
ढाक बय्राचजणांनी ट्रेकमध्ये उत्सुकता दाखवल्याने एक ट्रेक ठरवला आहे. एक दिवसाच्या ट्रेकला जाण्याचे ठरत आहे. रविवार दि १९ कर्जत-वदप-ढाक गाव-कर्जत सकाळी सहा ते संध्याकाळी आठला परत. वाट सोपी ,दरी नसलेली, अवघड चढाई नसलेली, ढाकचे गाववाले वापरत असलेली आहे. आपण ढाक बहिरीला जात नाही. ढाक गावाकडे जाणार आहोत. थोडी भटकंती आणि वनभोजन. ट्रेन + ओटोरिक्षा ( अंदाजे प्रवास खर्च रु ८० अथवा कमी ) ( ढाक बहिरी गुफा अथवा ढाक गड नाही) उन्हाळ्यातला दिवसा ट्रेक जमत असेल त्यांनी यावे. ( cst karjat fast train.