शंकरकाका
तशी शंकरकाकांची आठवण हल्ली क्वचीतच निघते. पण पितळी समई दिसली की हटकून शंकरकाका आठवतात.
शंकरकाका आजोबांचे मित्र. रंगानं सावळे.अंगात भोका भोकांचं फाटकं गंजीफ्रॉक, गुडघ्याच्या वर गुंडाळलेलं मळकट पांढर धोतर, कानापाशी तेव्हढे पांढरे तुरळक केस. बाकी गुळगुळीत टक्कल. पांढऱ्या मिशीखाली जाड काळे ओठ, मान खाली झुकलेली. ते कधीच चपला वापरत नसत. अनवाणी फिरत. घरी आले की "तात्यानु" अशी घशात काहीतरी अडकल्यासारखी हाक मारत. ती ऐकल्यावर हे खाकरून का नाही घेत असं सारखं वाटत राही. पण त्यांचा आवाजच तसा होता. त्यांना खरूज होती. त्यामुळं ते घरात आलेले आज्जीला फारसं आवडत नसे.
मिसळपाव
१. भास्करगड
भंडारदरा, घोटी परिसर म्हणजे किल्ल्यांचे, माहेरघर. पाबरगड, रतनगड, औंढा, पट्टा, कळसूबाई, अलंग- मदन-कुलंग पण त्र्यंबकेश्वर डोंगररांगेतल्या अनेक दिवस खुणावणा-या हरिहरवर जाण्याचा योग आला नव्हता. मी, डॉक्टर आणि फॉरेस्ट अॉफिसर असे तिघेच जण शनिवारी रात्री साडे दहाला कळव्याहून निघालो.