Skip to main content

ग म भ न ....

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 09/03/2017 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
सकालधरन॓ माय लय आटवत हुती उनात बसून बिडी वडताना तिची कूस याद आली बिडीच्या धुरानं बी आसल, डोल्यात पानी पानी आलं आन येकदम म्होरं हुबी दिसली गोरी-चिट्टी मास्तरीन सूध भाशेत म्हनली ,” बारा वर्षांचा ना रे तू? आजपास्न॓ बाराखड़ी शिकायला रोज दुपारी भंगार-डेपोच्या समोर येत जा. आणि बर॓ का, रोज तास झाल्यावर दूध-पाव मिळेल” मी सिकाया गेलो.

चंद्र नको , तारे नको

लेखक अभिषेक पांचाळ यांनी गुरुवार, 09/03/2017 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्र नको , तारे नको , नको खोटी भेट शब्द हवे , शब्दांसारखे , ओठांमधले थेट भारी नको , साधी नको , नको पुरी गोड भाषा हवी , प्रेमाची , त्याला प्रेमाचीच जोड आज नको , उद्या नको , नको काही क्षणांची साथ हवी , जन्मासाठी , उरल्या साऱ्या जन्मांची हसू नको , रुसू नको , नको आशा सुखाच्या बस हात हवा , हातामध्ये , तुफानी त्या दुःखाच्या अश्रू नको , दुःख नको , नको भाव ते रोशाचे एक हवे बस , रोज मला , दर्शन तुझ्या हास्याचे सुख नको , ऐवज नको , नको आस कुणा गंधाची छंद हवा बस , तुझाच जीवा , ओढ असो या छंदाची - अभिषेक पांचाळ
काव्यरस

आदिप्रश्न

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 09/03/2017 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
धगधगे कोटी सूर्यांचे स्थंडिल अहर्निश जेथे का अनादि ब्रह्माण्डाचे लघुरूप जन्मते तेथे ? अणुगर्भ कोरुनी बघता जी अवघड कोडी सुटती त्या पल्याड पाहू जाता का शून्य येतसे हाती ? का अंत असे ज्ञेयाला की ज्ञान तोकडे ठरते की सीमा अज्ञेयाची अज्ञात प्रदेशी वसते ?
काव्यरस

स्त्रीयांचे निवडस्वातंत्र्य आणि भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 09/03/2017 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
या लेख शिर्षकात प्रयूक्त पारिभाषिक संज्ञा : स्त्री म्हणजे woman, निवडस्वातंत्र्य म्हणजे right to make ... choices, भारतीय राज्यघटना म्हणजे Constitution of India, अनुच्छेद २१ म्हणजे article 21. इथे प्रत्येक शब्द एवढ्या साठी दिला की कायदे विषयक वाचन करताना प्रत्येक शब्द सुटा आणि एकत्र वाचण्याची सवय असलेले चांगले. आणि दुसरे ज्या शब्दाच्या अर्था बाबत द्विधा स्थिती असते तेथे मूळ इंग्रजी शब्द बघावयाचा -आणि न्यायालय त्याचा काय अर्थ काढते ते पहावयाचे - असते हे माहित रहावे म्हणूनही. स्वातंत्र्य या शब्दासोबत मला न टळता आठवणारे न.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०१५ - अफगाणिस्तान विरुद्ध स्कॉटलंड

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 09/03/2017 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
२०१५ चा वर्ल्डकप हा १९९२ च्या वर्ल्डकपनंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेला दुसरा वर्ल्डकप होता. २०११ च्या वर्ल्डकपप्रमाणेच ग्रूपमधल्या मॅचेसनंतर क्वार्टरफायनल, सेमीफायनल आणि फायनल अशा पद्धतीने मॅचेस खेळवण्यात येणार होत्या. २०११ च्या वर्ल्डकपप्रमाणेच १४ संघांचा या वर्ल्डकपमध्ये समावेश करण्यात आला होता. २०११ च्या वर्ल्डकपप्रमाणेच या वर्ल्डकपसाठीही ब्रँड अँबॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकरची नेमणूक करण्यात आली होती.

सामाजिक उपक्रम - २०१७

लेखक निशदे यांनी गुरुवार, 09/03/2017 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मित्रपरिवाराच्या साथीने गेली ७ वर्षे आम्ही स्वयंसेवक हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आलेलो आहोत. समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. उपक्रमाविषयी थोडेसे: माझ्यासह सुमारे ७-८ स्वयंसेवक दरवर्षी एक सामाजिक उपक्रम चालवितात. महाराष्ट्रातील ज्या सामाजिक संस्थांना सरकारकडून कमी मदत मिळते(अथवा मिळतच नाही) किंवा ज्या संस्था मुख्यत्वे देणगीदारांवरच चालतात अशा गरजू संस्थांना मदत मिळवून देण्याचा हा उपक्रम आहे. यावर्षी या उपक्रमाचे आठवे वर्ष आहे.

मिपालियन्स (विज्ञानचुंबीत कथिका)

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी गुरुवार, 09/03/2017 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
लेखकमहोदयांनी प्रकाशन कार्यालयात प्रवेश केला अन मनगटी घड्याळाकडे नजर टाकली. नियोजित वेळेच्या पाच मिनीटं आधीच ते पोहोचले होते. इथे आलं की त्यांना एकाचवेळी माहेरी आल्यासारखं अन चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आल्यासारखं असं संमिश्र काहीतरी वाटायचं. आताही तसंच वाटलं. बंद पडलेल्या फिल्टरमधलं पेलाभर पाणी घटाघट पिऊन त्यांनी संपादकांचं ऑफिस गाठलं. दरवाजाबाहेर जुनाट लाकडी पाटी ठोकलेली होती. त्यावर ‘वा. चा.महाशब्दे’ हे नाव स्टार वॉर्स चित्रपटाच्या फ़ॉन्टमध्ये पेंटलेलं होतं. “ठक ठक ठक” लेखकांनी केबिनचा दरवाजा जरा जोरातच ठोठावला. दरवाजा उघडल्यावर संपादक झोपलेले दिसू नये हा उद्देश्य.

मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो ..

लेखक drsunilahirrao यांनी बुधवार, 08/03/2017 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्यही दिवटीप्रमाणे फक्त मिणमिणतो मी स्वत:भवती अशी कोळिष्टके विणतो वेचतो माझेच मी अवशेष वाऱ्यावर नी स्वत:मध्ये स्वतःला आणुनी चिणतो वाटते आता भिती या चांदताऱ्यांची मी तमाचे गीत एकांतात गुणगुणतो शांततेवरची जरा रेषा हलत नाही मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो चेहरा अपुला इथे जो तो बघुन जातो आरशावर केवढा कल्लोळ घणघणतो डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

अष्टावधानी

लेखक भटकीभिंगरी यांनी बुधवार, 08/03/2017 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
लोण्याहुन मुलायम कठोर वज्राहुन ! स्त्री हे खरोखर अजब रसायन ! ! दुर राहिलेल्या आपल्या घरात! भुकेने रडणार्‍या पिलाची आठवण येउन , कड्यावरुन स्वत:ला झोकुन देते ! तीचे मातृप्रेम खरेच अनुपम !! स्वत:च्या बाळास बांधुन पाठीवर ! खंबीरपणे स्वार होते घोड्यावर !! पराक्रम करते युध्दभूमीवर !!! तीची विरश्री करते चकीत ! ! ! ! परदेशातील कडाक्याच्या थंडीत ! ज्ञानसाधनेची उपासना करीत ! ! भारतातील पहीली डॉक्टर होते ! ! ! तीचा निश्चय करतो अचंबित ! ! ! ! ! कधी ऑलिंपिक मेडल आणते! कधी अवकाशी भरारी घेते ! ! सायंटीस्ट, पोलिस ऑर्मीमध्धे, तीचा पराक्रम अचंबित करतो ! ! ! ! लोण्याहुन मुलायम कठोर वज्राहुन !
काव्यरस