स्वयंपाकघर
माणसांच्या आनंदाचा मार्ग पोटातून जातो त्या प्रमाणेच घराच्या आनंदाचा मार्ग स्वयंपाक घरातून जातो असे म्हणायला हरकत नाही. घरातील स्त्रीसाठी तर स्वयंपाक घराला घराच्या ऋदयच स्थान असत. ह्या स्वयंपाक घराच आणि तिच प्रेमळ नात निर्माण झालेलं असत. ती घरात जितका वेळ असते त्यातील तिचा ७०% तरी वेळ स्वयंपाकघरातच जातो. केवळ स्त्रीच नाही तर घरातील प्रत्येक व्यक्ती रोज ह्या स्वयंपाक मंदिरात हजेरी लावतोच. ह्याच स्वयंपाक घरात अग्नीदेवतेचा वास असतो. जीवन म्हणजेच पिण्याचे पाणी असणार्या पाण्याचा माठ म्हणा की फिल्टर हा अग्रस्थानी असतो. इथलं बेसिन म्हणजे नळातून येणार्या पाण्याचा चैतन्याचा झरा.
मिसळपाव
मिनार!
माझी आणि तिची ओळख प्राचार्यांच्या कक्षात झाली. "मिनार आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेते आहे. तिला राज्यशास्त्र विषय हवा आहे आणि तिला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. तिला तुमच्या वर्गात घ्या." प्राचार्यांनी ओळख करून दिली आणि मिनार माझी विद्यार्थिनी झाली. पण खरं तर तिनेच मला कितीतरी गोष्टी शिकवल्या आहेत.
चुणचुणीत, वर्गात शंका विचारणारी, "मिस, मला काय वाटतं..." म्हणत आपलं मत मांडणारी मिनार हळूहळू रुळत गेली, आमच्या वर्गाचा भाग बनली. तिचं दिव्यांग असणं कधी जाणवलं नाही.