स्मरणचित्रं - गाण्यांमधला देव आनंद!
देव आनंद हा आपला अत्यंत आवडता हिरो!( आपला म्हणजे माझा …हल्लीच्या पिढीमध्ये (म्हणजे सुद्धा माझ्याच पिढीमध्ये …मी काही ७० वर्षांचा म्हातारा नाहीये) देव आनंद काही फारसा कुणाला आवडत नाही …एक तर तो चेष्टेचा विषय आहे किंवा अगदी त्याच्याबद्दल काही मत असावं इतका तो हल्लीच्या पिढीतल्या लोकांना महत्वाचा वाटत नाही … तो अगदी विस्मृतीत गेला नाही एवढंच …तर ते एक असो ) …म्हणजे मला त्याचा एकदम fan म्हणा हवं तर.आता देव आनंद काही फार ग्रेट अभिनेता वगैरे नव्हता. त्याच्या संपूर्ण करिअर मध्ये त्याने फार चांगला अभिनय केला आहे असं काही कुठे आपल्याला फारसं दिसलेलं नाही.
दिनान्क पाच मार्च दोन हज्जार बारा (बापूस नावाचा हापूस)
दिनान्क पाच मार्च दोन हज्जार बारा (बापूस नावाचा हापूस)
चि शरण्या (उर्फ पिन्नीस)
उद्या तुला पाच वर्ष होतील. तुला म्हणून हे असम्बद्ध पत्र लिहीतो आहे. खरतर स्वतालाच उद्देशून आहे हे. शब्द तोकडे असतील पण भावना मात्र खर्या आहेत.
पाच मार्चची तारीख माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी तारीख आहे. देवाने मला दिलेला स्पेशल डे आहे म्हण ना. आता मी लिहीलेल तुला कदाचित वाचता येणार नाही पण थोडी मोठी झाल्यावर तुला कळेल मला नक्की काय म्हणायचे आहे ते.
मला तो दिवस अगदी कालच्या सारखा आठवतो. सन्ध्याकाळी ४ पासून मी अस्वस्थ येरझार्या घालतो होतो. डॉक्टरीण बाई मध्ये मध्ये येऊन काय काय सान्गून जात होत्या.
पुडाची वडी
डिस्क्लेमरः १.खरं तर फेसबुक वर ही पा़कृ. पोस्ट करून हा .... जमाना लोटला. पण इथे आपण काही लिहूया असं स्वप्न सुद्धा पडत नव्हतं हो. जाम घाबरते मी इथल्या सुगरणींना आणि बल्लवाचार्यांना. तेव्हा त्यांना सगळ्यांना नमन करून आणि पिराताईंचं स्मरण करून इथे धिंगाणा घालायचं ठरवलंय आज. बघा राव... छळायचं नाय उगा... ;)
२. आमचा कॅमेरा कम मोबल्या लैच बेसिक हाय. तेव्हा फोटोकडे फक्त पाकृची कल्पना येण्यासाठी असलेलं माध्यम अशा दयार्द्र दृष्टीने पहावे.
३. नाही हो.. संपलं सगळं सांगून.
राधिका स्पेशल (माझ्या नवर्याची बायको वाली) पुडाची वडी आज पहिल्यांदाच करून पाहिली आणि मस्त झाली.
Taxonomy upgrade extras
गैरसमज
माझ्या विषयी सगळ्यांना
गैरसमज मोठा आहे
प्रत्येकाला असे वाटते
की मी खूप शहाणा आहे
वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - भारत विरुद्ध इंग्लंड
२०११ चा वर्ल्डकप हा १९८७ आणि १९९६ च्या वर्ल्डकपनंतर भारतीय उपखंडात झालेल्या तिसरा वर्ल्डकप. या वर्ल्डकपचं यजमानपद भारत - पाकिस्तान - श्रीलंका आणि प्रथमच बांग्लादेशला बहाल करण्यात आलं होतं, पण २००९ मध्ये श्रीलंकन क्रिकेट संघावर लाहोरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे यजमान म्हणून पाकिस्तानची हकालपट्टी करण्यात आली आणि पाकिस्तानमध्ये होणार्या मॅचेस उरलेल्या ३ देशांत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. अपेक्षेप्रमाणेच पाकिस्तानने बराच थयथयाट करुन पाहिला, अगदी आयसीसीला कोर्टाची नोटीसही पाठवली, पण आयसीसीने त्याला अजिबात भीक घातली नाही.
अंबरनाथ ते चौक सायकल सवारी
१३/०२ ला ८०+ कीमी ची राईड केल्यावर सेंच्युरी राईड एकट्याने करण्याचा संकल्प केला होता .
सुट्यांची उपलब्धता पाहता आजचा दिवस नक्की केला .. पण ,हा सर्व आठवडा वाढदिवस व त्यात लग्नाचा ही वाढदिवस कालच झाला .
घरी २२ तारखेच पिल्लू सोडताच , मला एक दिवस डोंबिवलीत जायचय तूझी सूटी असेल तेव्हाच हे शक्य होइल त्यामुळे २२ ला जर सायकलिंग ला जायच असेल तर ९:३० पर्यंत परत ये . तू आलास कि मी निघेन असा वटहुकुम निघाला. ( वट हुकुम ची व्युत्पत्ती अशी असावी : वटवृक्षाला फेरे घालून , ज्याच्यावर हुकुमत गाजवता येते अशा प्राण्याला जो हुकुम सोडतात तो ) असो .
एक तर वाढदिवस आठवडा म्हणजे सौ जन्य सप्ताह ..
आबा (अद्भुतिका)
आबांची बुलेट धाडधाड आवाज करत अनाथाश्रमासमोर येऊन थांबली. हा आवाज सर्वाँच्याच, विशेषत: मॅनेजर बाईंच्या परिचयाचा होता. त्यांचं स्वागत करायला ती धावत बाहेर आली. एककाष्ठी धोतर नेसलेले अन खानदानी फेटा घातलेले आबा आकडेबाज मिशीआडून हसले. गाडीच्या एका अंगाला दूध वाटायला वापरतात तशी मोठी प्लास्टिकची कॅन लटकवलेली होती. आबांनी कॅनचं झाकण उघडलं अन आत हात घालून शंभरीच्या पाच गड्ड्या बाहेर काढल्या. सवयीप्रमाणे बाईंनी पुढे होऊन पैशांचा स्विकार केला. आभार मानणं आबाला आवडत नाही अन आग्रह केला तरी ते थांबणार नाही हे माहीत असल्याने बाई आत निघून गेल्या.
मी ....अब्जशीर्ष
मी ....अब्जशीर्ष मानवता
मीच फुलविते विझू पाहणारी पहिली ठिणगी
जिला क्रान्तीच्या सहस्र धगधगत्या जिभा फुटतात
मीच गुणगुणते बदलांची बीजाक्षरे
जी दुमदुमतात महामंत्र होऊन आसमंतात
ती मीच, जिच्या पायाशी चिरेबंद चिलखते
भुगा होण्याआधी लोळण घेतात
मीच मळते विश्व वेढून दशांगुळे उरणाऱ्या
अदम्य ज्ञानलालसेच्या पायवाटा
कैकदा मरून
प्रतिकूलांना पुरून
मीच उरते पुनःपुन्हा
अब्जशीर्ष.
अजिंक्य.
रंग,वंश,लिंग या पलीकडची म्हणून मला हिणवू नकोस
दिव्यत्वाच्या शोधात स्वतःला शिणवू नकोस.
काव्यरस
मिसळपाव
