Skip to main content

मोबियस भाग -२ : प्रकरणे- २५-२६

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 01/03/2017 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
....हंऽऽऽऽ रेडिओ आणि आरसा, आरसा आणि रेडिओ. जणूकाही सारे आयुष्याचे सार फक्त या दोन शब्दात सामावले आहे. या दोन्ही वस्तूत एक साम्य आहे बरं का. या दोन्ही वस्तू दोन माणसातील दुवा हो़ऊ शकतात. कदाचित आपल्या अस्तित्वाच्या गाभ्यात असलेली लालसा या वस्तू परावर्तित करत असतील किंवा प्रक्षेपित करत असतील. ठीक आहे!

नवे नवे शोध

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 01/03/2017 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे मी आठवी नववीत असेल तेव्हा. एका लहानश्या विरगाव नावाच्या खेड्यातल्या मराठी माध्यमाच्या शाळेत ‍शिकत होतो. शाळेत आम्ही काही मित्र त्यावेळी स्वत:ला हुशार समजत होतो. पहिला नंबर मिळवण्यासाठी आमच्यात स्पर्धाही असे. विज्ञानाच्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र या तिन्ही शाखा तसेच भूगोल, खगोल, गणित अभ्यासताना आतापर्यंत लागलेल्या विविध शोधांवर आमचं एकमेकांमध्ये बोलणं व्हायचं. अशा प्रकारची एकदा शोधांची चर्चा सुरू असताना एक मित्र सहज बोलून गेला, ‘आपल्या जन्माआधीच शास्त्रज्ञांनी सर्व शोध लावून ठेवलेत.

उपकार (कथा)

लेखक श्वेता व्यास यांनी बुधवार, 01/03/2017 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
"काय गं श्वेता, काय झालं? अशी रडतेस काय?, काय म्हणाले सर? काही वेडंवाकडं बोलले का?" प्रीतीने प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली. आणि मी दाटलेल्या कंठाने काहीही बोलूच शकत नव्हते. शिकवणी ते बसस्टॊप पूर्ण दहा मिनिटांच्या रस्त्यात अखंड डोळे वाहत होते. आणि गोंधळलेली, घाबरलेली प्रीती, माझी जिवलग मैत्रीण मला सावरायचा प्रयत्न करत होती, तेही मी का रडतेय याची काहीच कल्पना नसताना! "बाबा, या विषयाला कॉलेजमध्ये शिकवायला चांगले शिक्षक नाहीत, तसे ते कोणत्याच विषयाला नाहीत. पण या विषयाचं जरा अवघड आहे.

वर्ल्डकप क्लासिक्स - २००७ - आयर्लंड विरुद्ध झिंबाब्वे

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 01/03/2017 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
२००७ चा वर्ल्डकप हा वेस्ट इंडीजमध्ये झालेला पहिला वर्ल्डकप. वेस्ट इंडीजमधल्या बार्बाडोस, जमेका, गयाना, त्रिनिदाद - टोबॅगो, अँटीगा - बर्बुडा, ग्रेनेडा, सेंट कीट्स - नेव्हीस आणि सेंट लुशिया या आठ देशांत वर्ल्डकपच्या मॅचेस खेळवण्यात आल्या होत्या. वर्ल्डकपच्या मॅचेससाठीच्या सुरक्षा नियमांमुळे आणि वेस्ट इंडीयन प्रेक्षकांच्या रसिकतेचं अविभाज्यं अंग असलेल्या ड्रम्स आणि इतर वाद्यांवर बंदी घालण्यात आल्याने वेस्ट इंडीजच्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच नाराजी होती. त्याचबरोबर मॅचच्या तिकीटांच्या किमतीही सामान्यांच्या आवाक्याबाहेर होत्या.

#मिपाफिटनेस - मी आज केलेला व्यायाम - मार्च २०१७ - कॅलरी चॅलेंज

लेखक पिलीयन रायडर यांनी बुधवार, 01/03/2017 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
1 नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८,०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९,६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ५४७ किमी.

मी बाई होते म्हणुनी - भाग १३

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 28/02/2017 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
मी तिथुन निघाले, मनांत काही विचार चालु होतेच, समोरुन काही दासी येताना दिसल्या त्यांना एका कामाला लावलं अन् माझ्या दालनात येउन माझी तयारी सुरु केली, काही मोठया पेटयात ठेवलेले सामान काढायला लावलं, तेवढ्यात मगाशी गेलेली दासी परत आली, तिनं येउन सांगितलं की त्या दोघी सुवर्णलंकाराच्या सहित निळ्या रंगांच्या वस्त्रांची तयारी करत आहेत, मी देखील माझी तयारी करायला सुरुवात केली, काही वेळानं आई दालनात आली, आणि त्याचवेळी मी मागवलेल्या वस्तु घेउन दासी सुद्धा येत होत्या, त्यांच्याकडं पाहुन आईनं विचारलं, हे काय आहे, उर्मिले, हे सर्व का मागवलं आहे आज,.... ...

#हॅशटॅग#

लेखक चिनार यांनी मंगळवार, 28/02/2017 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
"भाऊ..तुले एक विचारू का?" "विचार ना बे." "तू फेसबुक वर हायस नं?" "हो मंग..माया पोस्टा नं फोटो दिसत नाय का तुले?" "अन टिवटर वर?" "टिवटर नाय बे ट्विटर." "हा तेच ते" "बरं मंग?' "ते फेसबुक नं टिवटरवर, दोन आडव्या अन दोन तिरप्या रेषा काय असतेत?" "काय?" "अरं ते असते ना..दोन आडव्या अन दोन तिरप्या रेषा काढून त्याच्यासमोर लिहितेत सारे?" "काय बोलून ऱ्हायला बे?" हातावर आकृती काढून…..# "हे पाय असं असते ते?" "हा...ह्याला हॅशटॅग म्हन्तेत?" "काय म्हन्तेत?" "हॅशटॅग..हॅशटॅग." "म्हंजे काय पन?" "मले काय मालूम बे?" "अबे मंग त्वां कायले लिहितं?

दुसरी बाजू (कथा)

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 28/02/2017 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
"मनस्वीचा फोन आला होता आज" आई अंजलीला म्हणाली, "तिचे फोटो बघितले का विचारत होती. मलासुद्धा म्हणाली की काकू तू फेसबुक , इंस्टाग्राम जॉईन कर" "मग करायचा का अकाउंट ओपन?"अंजलीने सिरियसली विचारलं. "वेडी आहेस की काय! मला काय गरज? मला कोणाशी बोलायचं असलं, की मी सरळ जाऊन भेटते, किंवा फोन करते. इंटरनेट वगैरेची गरजच नाही लागली आमच्या पिढीला." "पण तुझ्या अगदी लहानपणच्या शाळेतल्या मैत्रिणी भेटल्या फेसबुकवर तर छान नाही वाटणार तुला?" अंजलीने विचारलं. "कुणास ठाऊक कसं वाटेल....... फुलपाखरं क्षणभर दिसतात नि उडून जातात म्हणून छान वाटतात. त्यांना तसं उडूनच जाऊ दिलं पाहिजे.