Skip to main content

पुणे भटकंती..............दि.21.01.2017

लेखक मॅक यांनी रविवार, 26/02/2017 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
खर तर ही भटकंती करून बरेच दिवस झाले पण वेळ मिळत नसल्यामुळे लिहायला जमल नाही. ऑफीस मधूले आमचे एक साहेब आहेत त्यांचे नाव आहे श्री.मोरे, खर पाहीले तर ते साहेबांच्यापेक्षा मित्रच जास्त वाटतात, एकदम मनमिळावू , शांत व्यक्तिमहत्व त्यांनी त्यांच्या स्व:खर्चाने आम्हाला सर्व कर्मचारी वर्गाला ही भटकंती घडवली. त्याबद्दल त्यांचे प्रथम आभार!!!!!! खर पाहीलं तर मी या भटकंतीमध्ये सहभागी होणे, अपेक्षित नव्हते कारण मी सध्या मोरे साहेबांच्या विभागामध्ये काम करत नाही, माझा विभाग वेगळा आहे.

...त्या वेळी कळले नाही

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 26/02/2017 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
त्या एक स्वराची बिजली स्पर्शून निसटती गेली..... ती मैफल मग जमलेली ती बंदिश मज सुचलेली ....मग माझी उरली नाही उघडता दार अज्ञात होऊन अनावर आत कोसळतो कुठुन प्रपात हे काय भिने रक्तात ...त्या वेळी कळले नाही ओथ॑बुन चिद्घन आला निष्पर्ण वृक्ष सळसळला डवरून फुलांनी गेला अवचित मग कळले मजला ..... मी देही असुन विदेही!!!
काव्यरस

तुझ्या ऊन्हाचं कौतुक..

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 26/02/2017 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या ऊन्हाचं कौतुक किती करावं करावं माप पदरी सुखाचं किती भरावं भरावं बघ तुळशीला आल्या मखमालीच्या मंजिर्या चिऊताईच्या दातांनी किती खुडावं खुडावं खिडकीच्या गजावर झुले डांगराचा वेल बोटभर आधारानं वर चढावं चढावं नंदी बसलेला दारी गळी लेणं घुंगराचं येताजाता भक्तीभावे तिथं नमावं नमावं झुल्यावर लेकरांची किलबिल चारीठाव सांज सरता सयेने पाय वळावं वळावं पुण्य कुठल्या जन्माचं आज फळुनिया आलं भरलेल्या गोकुळात दिस सरावं सरावं
काव्यरस

मराठी; समस्येची पाळंमुळं

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 26/02/2017 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
जुना, बराच चर्चिलेला विषय आहे, त्यामुळे संपादकांना वाटल्यास धागा अप्रकाशित करू शकता. मराठीदिनानिमित्त टाकावा वाटलं, म्हणून. सदर लेख लोकमत वृत्तपत्राच्या हॅलो ठाणे पुरवणीत २५-०२-२०१७ रोजी प्रकाशित झाला असून त्याची विस्तारित आवृत्ती या ब्लॉग पोस्ट मधे देत आहे. प्रकाशनाबद्दल #लोकमत चे आभार. लोकमत मधील लेख चेहरा, नाव यानंतर एखाद्या व्यक्तीची ओळख म्हणून जर कुठली तिसरी गोष्ट गणली जाऊ शकत असेल तर ती त्या व्यक्तीची भाषा असते.

वर्ल्डकप क्लासिक्स - २००३ - भारत विरुद्ध पाकिस्तान

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 26/02/2017 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
१ मार्च २००३ सुपर स्पोर्ट्स पार्क्स, सेंचुरीयन ग्वाटेंग प्रांतातल्या सेंचुरीयनच्या सुपर स्पोर्ट्स पार्क मैदानात भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधली पूल ए मधली मॅच रंगणार होती. २००३ च्या वर्ल्डकपमधली मॅच ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातली वर्ल्डकपमधली चौथी मॅच. १९९२, १९९६ आणि १९९९ मधल्या तीन्ही मॅचेसमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता त्यामुळे त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान निकराने प्रयत्नं करणार हे उघड होतं. पाकिस्तानच्या दृष्टीने ही मॅच आणखीन एका कारणाने महत्वाची होती ती म्हणजे या मॅचमध्ये विजय मिळवल्यास पाकिस्तानला सुपर सिक्समध्ये प्रवेश मिळवणं सुकर होणार होतं.

मराठी भाषा दिन २०१७: सोरो (चित्पावनी)

लेखक राजेंद्र बर्वे यांनी रविवार, 26/02/2017 06:24 या दिवशी प्रकाशित केले.
1 . . (फाईल १३.११ मिनिटे फाईल साईझः १३.७ एम्बी) काही कारणाने फाईलचा फक्त ऑडिओ सध्या उपलब्ध आहे. लवकरच लिखित कथा प्रकाशित करू शकू. . 1

मराठी भाषा दिन २०१७: मई (वर्‍हाडी)

लेखक ऊध्दव गावंडे यांनी रविवार, 26/02/2017 06:21 या दिवशी प्रकाशित केले.
1

मई

नाल्या काठचं साजरं असं वावरं मईचं वानं म्हनूनं पीकाची नाई पळतं कईचं नाई गरजं खताची बसे गायाचाचं थरं टाका पेरुनं बियानं वाढे पीकं भरं भरं पुरुस पुरुस धांडा छात्या यवढी पराटी मांड्या मांड्या वाढे मुंगं त्यातं तुरं करे दाटी जरी पुरातं वावरं गेलं सारचं वाहूनं नाई फरकं काईचं रब्बी पीके खन्नाऊनं रब्बी नाईतं खरीपं नाई हारतं काईचं नाई ठेवतं उपाशी असं वावरं मईचं . 1

मराठी भाषा दिन २०१७: येवां, कोंकण आपलांच आसां! (कोंकण रेल्वे)

लेखक नूतन सावंत यांनी रविवार, 26/02/2017 06:04 या दिवशी प्रकाशित केले.
1 कोकण रेल्वेतली मराठी ----------------------------------------------------- 'काही नवे करताना' बऱ्याच वेळा कोकण रेल्वेने प्रवास करावा लागला. अगदी सुरुवातीला पॅसेंजरनेच येणे-जाणे व्हायचे. अगोदर दादर-रत्नागिरी पॅसेंजरने आणि नंतर दिवा-सावंतवाडी पॅसेंजरने. प्रत्येक स्टेशनमध्ये चढणारे आणि उतरणारे लोक असत, त्याच्या बोलीभाषेत फरक होत जाई. त्यातच कामानिमित्त आलेले महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील लोकही असत.

विजयासाठी - रातीस खेळ चाले ....

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 25/02/2017 21:19 या दिवशी प्रकाशित केले.

रातीस खेळ चाले ...

निवडणुकीचा रणधुमाळीत जिल्हा सांगली, शिराळा तालुक्यातील नाटोली परिसरात विरोधकांच्या पाडावासाठी भानामती! हे शीर्षक असलेले बातमीपत्र दिगंबर शिंदे यांनी सांगलीहून पाठवले होते. (लोकसत्ता शनिवार. दि 25 फेब्रूवारी 2017, पुणे आवृत्ती, पान 8 - राज्यकारण) या बातमीत जणू काही किराणाभुसारी मालाच्या यादीची आठवण व्हावी अशी लांबलचक मागणी वाचून रंजन झाले... खिळे ( 6 इंची नग) ९, लिंबू (आकार मोठा नग) २१, टाचण्या (१इंची?) नग २१, रंगीत बाटल्या ७ (श्रमपरिहारासाठी?), बिनशेडीचे नारळ नग ६, साड़ी?

छोट्यांचं युद्ध (विचित्रकथा: Weird Fiction)

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 25/02/2017 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
“या फोटोकडे एकदा काळजीपूर्वक पहा. मुलांनो, तुमच्यापैकी दोघांना आतापर्यंत मिशा चिकटवता आल्या नाहीत. व्यवस्थित खेळा, रशियाचं भविष्य तुमच्या हातांत आहे.” रशियाच्या बर्फाळ भागातल्या त्या गुहेत काही मुलं हिटलरला स्टालिनच्या मिशा चिकटवण्याचा खेळ खेळत होती. त्यांच्या डोक्यावर रशिया अन जर्मनीच्या लष्करी विमानांचं घनघोर युद्ध सुरु होतं. रशियाचा फ्लाइट कमांडर इगॉर सर्वाँच्याच आवडीचा होता. आतपर्यंत शत्रुंची अनेक विमानं त्यानं हा हा म्हणता नेस्तनाबूत केली होती. आतासुद्धा तो प्रचंड वेगानं शत्रुच्या विमानाकडे झेपावला.