Skip to main content

कुणीतरी असावे, कवि:समाधान कदम

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 24/02/2017 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
,,,, ,,, संबंधीत विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळे पर्यंत या धाग्यातील मजकुर वगळला आहे. तसदी बद्दल क्षमस्व. कवि: समाधान कदम कर्मविर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर कर्मविर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील नवकवि समाधान कदम यांनी त्यांची कविता २२/२/२०१७ च्या मराठी विकिपीडीया कार्यशाळे दरम्याने त्यांची कविता मराठी विकिपीडियावर प्रकाशित केली होती, मराठी विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय परिघात कविता लेखन बसत नसल्यामुळे ती मराठीतून वगळली गेली. ती इथे प्रकाशित केली मराठी विकिपीडियावर जशी आली तशी प्रकाशित केली (उत्तरदायकत्वास नकार लागू)

मला ती आवडायची...... - कवि: राजू पवार

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 24/02/2017 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
,,,, ,,, संबंधीत विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळे पर्यंत या धाग्यातील मजकुर वगळला आहे. तसदी बद्दल क्षमस्व. कवि: राजू पवार विद्यार्थी, कर्मविर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर कर्मविर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील विद्यार्थी नवकवि राजू पवार यांनी त्यांची कविता २२/२/२०१७ च्या मराठी विकिपीडीया कार्यशाळे दरम्याने त्यांची कविता मराठी विकिपीडियावर प्रकाशित केली होती, मराठी विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय परिघात कविता लेखन बसत नसल्यामुळे ती मराठीतून वगळली गेली. ती इथे प्रकाशित केली मराठी विकिपीडियावर जशी आली तशी प्रकाशित केली (उत्तरदायकत्वास नकार लागू)

मोबियस भाग -२ : प्रकरणे १९-२०

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 24/02/2017 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
सामान्यत: सामान्य स्त्रियांना असे वाटते की त्यांच्या सौंदर्यामुळेच पुरुषांना त्यांची किंमत कळू शकते. हा दुर्दैवी व भाबडा भास आहे. या भ्रामक समजुतीनेच त्या पुरुषाच्या अध्यात्मिक बलात्काराला बळी पडत असाव्यात.
मोबियस १९ घोड्याला टाच मारुन त्याला पिटाळता येते पण काळाला टाच मारता येत नाही.

वर्ल्डकप क्लासिक्स - २००३ - दक्षिण आफ्रीका विरुद्ध वेस्ट इंडीज

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 24/02/2017 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
२००३ चा वर्ल्डकप हा आफ्रीका खंडातला पहिला वर्ल्ड्कप! अपार्थाईड व्यवस्था मोडीत निघाल्यावर १९९१ मध्ये क्रिकेटजगतात परतलेल्या दक्षिण आफ्रीकेला झिंबाब्वे आणि केनिया यांच्याबरोबर या वर्ल्डकपचं यजमानपद देण्यात आलं होतं. हा वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडच्या संघाने रॉबर्ट मुगाबेच्या हुकूमशाही सरकारच्या निषेधार्थ हरारे इथे झिंबाबवेविरुद्धच्या मॅचमध्ये खेळण्यास नकार दिला. इंग्लंडप्रमाणेच न्यूझीलंडच्या संघाने सुरक्षिततेच्या कारणावरुन केनियाविरुद्ध नैरोबी इथे खेळण्यास नकार दिला.

मराठी दिन २०१७: हरसाल (झाडीबोली)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 24/02/2017 07:06 या दिवशी प्रकाशित केले.
1 . मंग असी गरमी वाहाडत जाते मंग असा संध्याकाडी पाऊस पडते मंग असे बत्तर बायेर पडतेत मंग असे कावरल्यावानी करतेत मंग असे सकारवरी मरून जातेत मी तई घिवाऱ्या खात रायतो मी तई आमरस पीत रायतो मंग असा धुव्वाधार पानी पडते मंग असा नाल्याइले लगीत पूर येते मंग असा जगासीन संपर्क तुटते मंग असे सबइचे बाप वसुदेव बनतेत मंग असे सब पोट्टे किसन बनतेत मी तई घरी कानोबा मांडत रायतो मी तई लोकाइले बुजली वाटत रायतो मंग असी फसल तयार होते मंग असी एकाखट्टे विकाले जाते मंग असा बाजारभाव धपकन पडते मंग असा जबरदस्ती धान विका लागते मंग असा

मराठी भाषा दिन २०१७: इमान (विमान) - (मालवणी)

लेखक चुकलामाकला यांनी शुक्रवार, 24/02/2017 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
1

इमान (विमान)

"रे मायझया, हय इमान उतारला बघ." कानातली काडी भायर काढत पांडगो बोललो. "खय ता?" म्हणून बाबल्यान वळान बगल्यान आणि बगीतच रवलो. "इमान नाय हवाइसुंद्री म्हण." मसूरकरांचा शुभला पार्लरातसून भायर पडत होता. केसांची बट बोटात खेळवत खेळवत, पांडगो आणि बाबल्याकडे न बगता, ता निघान गेला. नेहमी उलटा होय. गावातल्या समस्त भगिनी वर्गाकडे कावळ्यासारखे वळून वळून बगणारी ती दोगा शुभल्याकडे कधी ढुंकूनही बगत नसत. तसा त्येच्याकडे कोणच बगी नाय . शुभला होताच तसा. अजागळ, बावळट.

उत्तर (कथा)

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 23/02/2017 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
"आता निघालं पाहिजे म्हणजे थोडा वेळ फ्रेश होऊन नाईटसाठी येता येईल" मनगटावरच्या घड्याळाकडे पाहून तिच्या मनात विचार आला. नेहेमीप्रमाणे वॉर्डमधल्या नर्सला सगळ्या सूचना देऊन ती निघाली. गाडी तिने ए ऐवजी बी विंगकडे वळवली. आशिषचं असं झाल्यानंतर अंजलीचे आईवडील तिच्याच सोसायटीमध्ये राहायला आले होते. अंजलीच्या मुलीची, रियाची सगळी काळजी ते घेत होते. रियालाही आजी आजोबांबरोबर राहायला आवडत होतं. सगळं सोयीचं असलं तरीही मुलीकडे आपण पुरेसं लक्ष देत नाही आहोत या विचाराने अंजलीला फार अपराधी वाटत असे. आशिषचं दुःख विसरण्यासाठी तिने स्वतःला कामात झोकून दिलं होतं. आणि तिचा पेशाही तसाच होता.

माझे पहिले पर्यटन (शैक्षणिक सहल )

लेखक योगेश आलेकरी यांनी गुरुवार, 23/02/2017 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
माझे पहिले पर्यटन (शैक्षणिक सहल ) आजमितीस जी काही फिरण्याची माझी आवड जोपासलीय त्याची पाळे मुळे अगदी थेट शालेय जीवनात जातात, प्रवासाचं भाग्य तस खूप लहानपणापासूनच लाभलेलं मला. कारण हि तसच, आपले लाड जिथे सर्वाधीक पुरवले जातात असे नातेवाईक मामा व आत्यांची गावे ७० किमी च्या परिघाच्या बाहेर. त्यामुळे लांबचा (त्यावेळी हा लांबचाच ) प्रवास पप्पांसोबत घडायचाच. पाहत गेलो. शिकत गेलो. खेडे गावातील पार्श्वभूमी असली तरी आमच्या गावाला डोंगराचं भाग्य लाभला नव्हतं ती कसूर भरून काढली ती जवळीलच ३ किमी वरील तुकाई देवी डोंगराने.

वेदना..

लेखक राघव यांनी गुरुवार, 23/02/2017 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
फुकाचे भरवसे मिळतात सारे, हवे ते नेहमीच हुलकावते.. मागावयाचे कुणाला-कशाला.. वेदना मनातील वदू लागते! जगातील घडणे - जगाचे बिघडणे.. जगाचीच सारी दोषांतरे.. विवेकात शक्ती किती ती असावी.. डोळ्यात दिसती जुनी जळमटे! कधी दिव्य काही मनातून उठते [की] स्वतःचीच झोळी खुजी भासते.. फुटक्या घड्याची ओंजळ कितीशी.. थेंबासही ती नको वाटते! आशा-निराशा.. पुन्हा तीच रेषा.. गिरवण्यात आयुष्य शिलगावते! असावी मनाची किती लक्तरे ती.. वेचावयाला उलटती युगे! राघव

शेजाऱ्याचा डामाडुमा - श्री तीन राणाज्यूं को सरकार - नेपाळ भाग ६

लेखक अनिंद्य यांनी गुरुवार, 23/02/2017 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
=========================================================================== शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४... नेपाळ-०५... नेपाळ-०६...