मराठी भाषा दिन २०१७: पुणेरी कसे बनाल? (पुणेरी)
प्राकृत...
कोसाकोसावर बदलणारी बोली भाषा सोडल्यास या जगाच्या पाठीवर अंदाजे दोन हजार भाषा बोलल्या जातात, असा अंदाज आहे. यातील बहुतेक भाषांचा अभ्यास झालेला आहे किंवा सुरू आहे. पण आफ्रिकेतील काही दुर्गम विभाग व ॲमेझॉनमधील काही घनदाट जंगलातील भाग जेथे अजूनही पुढारलेल्या (?) जगातील माणसे पोहोचली नाहीत, तेथील भाषांचा उगम कसा झाला किंवा भाषा ही संवादाचे साधन म्हणून कशी विकसित झाली, याचा अभ्यास अजूनही सुरू आहे. उदा. डॅनियल एव्हरेट याने एका जमातीच्या भाषेचा अभ्यास केला.
हरनी
नख्खी नख्खीतुन बोंड
कापसाचं फुललं
पराटीच्या वावरातं
जसं चांदनं सांडलं
हे बावरली हरनी
कोनं ऊभी वावरातं
टाके चान्नी वानी बोंड
पाठीवरं खंदाळीतं
बोंडा बोंडाच्या मंधात
गोलं मुखळा खुलला
आजूबाजूनं चांदन्या
मंदी चंद्र उजीळला
मोठ मोठाल्या डोयानं
कायं ईकळे पायते
जीवघेनी ते नजरं
घोरं जीवाले लावते
ठुलं बांधूनं गाठोळं
तुया येचल्या बोंडाचं
सांगं कुठीसा ठेवलं
बोंड माया हुर्दयाचं?
-ऊद्धव गावंडे

*************************
१.
माड्यां-सुपार्यांनी खेळटे धन,
माडये तेकल्ल्या ज्या खांदये हालोवन पडटात वोवळां,
त्या एका खांदयेर माझें भुरगेंपण
२.
वोवळीण मारली,
तेधवां थोडी मुळां मज देवन् गेली,
थोडी, थोडी करून मनांत पातळत र्हायली
३.
वाटेर थांबून
तुवेन् वोवळां विकती घेतली,
तेधवां मनातलीं वोवळीण परतून राशींनी फुलली
४.
तूं गेला, वोवळां गेली,
वास सोपलां नाय, रासय नाय सोपली,
तुज राशींनी फुलतना, मीच वोवळीण जाली
***************************
पूर्वी आदिमानव अप्रगत होता, त्या काळात हातवारे, खुणा करून त्याचं मनोगत व्यक्त करत असे. नंतरच्या काळात तो जसजसा प्रगत होत गेला, शेती करू लागला, गटागटाने राहू लागला, तसतसा हातवारे व खाणाखुणा यापेक्षाही जास्त तोंडाने विविध आवाज काढून व्यक्त होऊ लागला. समान आवाज व चेहऱ्यावरील हावभाव यातूनच पुढे भाषेचा उगम होत गेला.
भाषा ही परस्पर संवादाचं, अभिव्यक्तीचं माध्यम आहे. 'जी बोलली जाते ती भाषा' अन् खरं तर हीच भाषेची मूळ व्याख्या आहे.
मारुतराव आज लय कावला होता. आलटुनपालटुन कधी तो पंजावर मुठ आपटत ओसरीवर अस्वथपणे येरझार्या घालत होता, तर कधी उंबर्यावर बसुन तांबारलेल्या डोळ्यानी आढयाकडे पहात होता. शिरपतरावानी आज त्याच्या शेपटावर पाय दिला होता. छबुरावनी रस्त्यावरुन जाताना डोकवलं आणि नेहमीप्रमाणे मारुतरावला रामराम केला. मारुतराव फक्त तोंडातल्यातोंडात पुटपुटला. छबुरावने ओळखलं की काही तरी बिनसलंय. छबुराव डायरेक्ट घरात घुसला.
“ओ आप्पा!! ही काय पद्धत म्हणावा का काय माणसानी? बॉलणं नाय, रामराम नाय.