Skip to main content

प्रेम

लेखक पराग देशमुख यांनी मंगळवार, 14/02/2017 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे साला , अंधार झालाय अंधार . अब्रू वेशींवर टांगलेली नि, भावनांचा चाललेला व्यापार . नजर वखवखणारी असूनही येथे, कोवळ्या कळ्यांना धुमारे फुटू लागतात. अन प्रेमाचा पाऊस पडला तरी कुजण्याइतकी, नात्यांची बीजे भिकार असतात. पैशाच चामडं पांघरून इथ , वा
काव्यरस

१०० नंबरी प्रेम

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी मंगळवार, 14/02/2017 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
--------------------------------------------- बायकांच्या बडबडीने जेव्हा इच अँड एव्हरीजण कंटाळला 'रोज शंभरच शब्द बोलायचे' सरकारने नियम काढला मला फारसा त्रास नव्हता नेहमीच मी कमी बोलायचो गप्पा,भांडण,उपदेश मोजक्या शब्दांत मांडायचो नियम लागू व्हायच्या थोडं आधी मला भलताच नाद लागला एका गोग्गोड बडबड्या पोरीवर नकळंत जीव जडला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तिला प्रपोज करायचं ठरवलं शंभर शब्द काय बोलायचे गणित मांडायला घेतलं "हॅपी व्हॅलेंटाईन डे" ऐवजी "हॅपी व्हॅलेंटाईन" पण चालून जाईल "माझं तुझ्यावर प्रेम आहे" पेक्षा "आय लव्ह यू" त कमी शब्दहानी होईल "तुझं हसणं, रुसणं, सत्तत बडबडणं मला आव

कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे संपत्तीकडे

लेखक लीना कनाटा यांनी मंगळवार, 14/02/2017 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या निवडणुकांमुळे वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांचे उत्पन्नाचे आकडे वर्तमानपत्रांमध्ये वाचायला मिळत आहेत. त्यात देखील जे आधी पासूनच मान्यवर (?) आहेत त्यांच्या संपत्तीमध्ये गेल्या कार्यकाळात झालेली वाढ हि विशेषत्वाने नोंद घेण्यासारखी आहे. केवळ पाच वर्षातील हि प्रचंड वाढ बघता हि सगळी मंडळी कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊन वेगाने संपत्तीकडे झेपावत आहेत असे दिसून येते. जेव्हा तुमच्या आमच्या सारखी सामान्य जन मंडळी (संक्षींच्या भाषेत ईएमआयग्रस्त) जेमतेम उत्पन्न मिळवत असताना या मान्यवर मंडळींची संपत्ती मात्र वाढता वाढता वाढे भेदिलें टॅक्स मंडळा अशी कित्येक पटीनी कशी काय वाढत आहे?

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९२ - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 14/02/2017 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेला १९९१९ मधला वर्ल्ड्कप हा पूर्वीच्या चारही वर्ल्डकपपेक्षा अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण होता. या वर्ल्डकपमध्ये सर्वप्रथम पांढर्‍या रंगाच्या कपड्यांऐवजी रंगीत कपड्यांचा वापर करण्यात आला होता. पारंपारीक लाल बॉलची जागा पांढर्‍या बॉलने घेतली होती तर पांढरा बॉल स्पष्टपणे दिसावा म्हणून काळ्या रंगाचा साईटस्क्रीनही या वर्ल्डकपमध्येच प्रथम वापरण्यात आला.

मसूरदाल हलवा - एकभान्डी झटपट पाककृती!

लेखक आषाढ_दर्द_गाणे यांनी मंगळवार, 14/02/2017 02:09 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस मूगडाळ हलवा खायची इच्छा होत होती . पण घरातली मुगाची डाळ संपली होती आणि नेमकी तेव्हाच मित्राला 'भारतीय वाण्याकडून मसूर आण' सांगितल्यावर त्याने अख्ख्या मसूराच्या जागी (उसळ करायला. हो, फार छान लागते) चुकून ढीगभर मसुरीची डाळ आणून गळ्यात मारली. मग तिची विल्हेवाट लावायला 'मूग मसूर भाई भाई' म्हणत मसूरडाळीचा हलवा करायचे ठरवले.

मोबियस प्रकरणे ९-१०

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 13/02/2017 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
सावलीतून एकदम उन्हात आल्यावर तो पायापासून वर वितळू लागल्याचा त्याला भास झाला. पण त्याच्या गाभ्यामधे बर्फाची एखादी लादी असल्यासारखा तो अजून पूर्ण वितळत नव्हता. त्याला एकंदरीत परिस्थितीची लाज वाटली. एक जनावरासारखी बाई, जी फक्त आजचा विचार करतेय, कालचा नाही उद्याचा नाही.जणू काही तिच्या ह्रदयाच्या जागी फक्त एक बिंदू आहे.

तीन हटके रेसिपी (सांजा, अंडाकरी आणि सोयाबीनची भजी)

लेखक वसंत वडाळकर_मालेगांव यांनी सोमवार, 13/02/2017 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळा सांजा आणि वेगळी अंडाकरी तसेच सोयाबीनची भजी यांची रेसिपी आज मी तुम्हाला सांगतो. रेसिपी १ - अफलातून सांजा आपण सांजा (जाड कणिक किंवा रवा भाजून केलेला उपमा) किंवा उक्कड पेंडी (बारीक कणिक भाजून केलेला उपमा) करतांना प्रथम रवा किंवा कणिक भाजून घेतो. त्यानंतर काजलेले रवा किंवा कणिक बाजूला काढून कढईत प्रथम तेल किंवा फोडणीसाठी मोहरी किंवा जीरे वापरतो. त्यानंतर मिरची, कांदा आणि टमाटे टाकून व्यवस्थित शिजवून घेतो. मग तिखट, मीठ, मसाला टाकून शेवटी पाणी टाकतो. पाणी उकळल्यावर त्यामध्ये भाजलेला रवा किंवा कणिक टाकून शिजवून घेतो.

माझी एक गोची होते

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 13/02/2017 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
वृत्तबद्ध लिहिताना माझी एक गोची होते यमक जुळवू जावे तर अलगद काही निसटून जाते माझी कविता "जुळत" नाही टोटलच बघा लागत नाही (अन जुळलीच बेटी चुकून तर..) कमावलेली कृत्रिमता हट्टीपणे हटत नाही कवितेचे झटपट वर्ग कुठे कोणी घेतं का? असल्यास जरा सांगा मला प्रतिभा विकत मिळते का? (एक कोडं सुटत नाही ...) भावना इतक्या तरल कशा? शब्द इतके रुक्ष कसे ? मग त्याची कविता वाचता वाचता डोळ्यात पाणी येतेच कसे?
काव्यरस

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - फायनल - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 13/02/2017 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
८ नोव्हेंबर १९८७ ईडन गार्डन्स, कलकत्ता कलकत्त्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्डकपची फायनल रंगणार होती. वास्तविक ही फायनल भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होईल असा अनेकांचा अंदाज होता पण 'बिली द किड' क्रेग मॅकटरमॉटने लाहोरला पाकिस्तानला धूळ चारली होती तर ग्रॅहॅम गूचच्या स्वीपने आणि चंद्रकांत पंडीतला एलबीडब्ल्यू देण्याच्या अंपायर टोनी क्राफ्टरच्या साफ चुकीच्या निर्णयामुळे भारताच्या वर्ल्डकपच्या आकांक्षांवर पाणी पडलं होतं!

औरंगाबाद - पुणे २४० किमी - सायकलप्रवास.

लेखक डॉ श्रीहास यांनी सोमवार, 13/02/2017 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
सायकलींग मी का करतो ? सायकलींग नी मला काय मिळालं ? हे प्रश्न मला कधीच पडले नाहीत. सायकल चालवणे हा माझा दिवसभरातील खूपच आनंदाचा भाग आहे. औरंगाबाद कट्ट्याच्या शेवटी शेवटी अचानकच "मी सायकलने पुण्याला येतो" असे बोलून गेलो आणि प्रशांत, मोदक, आनंदराव मंडळींनी ते उत्साहाने उचलून धरले. बस्स.. काहीही विचार न करता औरंगाबाद पुणे सायकलने पार करायचे ठरले. या आधी एक दीड वर्ष सायकलिंगच्या वेडेपणाची लागण झाली होती.