Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: मैफल

लेखक सिरुसेरि यांनी शुक्रवार, 10/02/2017 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
a निळकंठबुवा बिदरकर ..संगीत क्षेत्रातील एक गुरुतुल्य व्यक्तीमत्व . बुवांचे नाव घेताच अनेक जाणकार गायक, वादक , रसिक श्रोते कानाची पाळी पकडत . एक निर्माता आपल्या शास्त्रीय संगीतावरील चित्रपटामध्ये बुवांनी गावे यासाठी इच्छुक होता . पण चित्रपटसंगीतातील बंधनांमुळे बुवा राजी नव्हते . अखेरीस आर्थीक गरजांमुळे ते तयार झाले .

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: आम्ही येतोय

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शुक्रवार, 10/02/2017 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
a तो संदेश सर्वात आधी नासाच्या उपग्रहांनी पकडला. “आम्ही येतोय.” फक्त दोनच शब्द होते संदेशात. “आपण शांततेच्या मार्गाने बोलणी करू.” संयुक्त राष्ट्रसंघ “सर्व देशांनी आपापले क्षेपणास्त्र अवकाशाच्या दिशेने वळवावेत.” अमेरिका “जगाचा अंत जवळ आलाय.” व्हॅटिकन “ते आपले मित्र असावेत.” भारत “ही भारताची चाल.” पाकिस्तान काही दिवसांनी परत एक संदेश मिळाला- “लढायला तयार रहा.” यावेळचा संदेश पृथ्वीच्या अगदी जवळून आलेला. जगभरातलं सैन्य अन शस्त्रास्त्रं खडबडून

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: इमारत,संदर्भ चित्र: भग्न इमारत आणि दोन मुली

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 10/02/2017 06:54 या दिवशी प्रकाशित केले.
aaa "चल ना वं बिगी बिगी..उशीर होऊ राह्यला शाळेले" "मले त याचंच नव्हतं..भेव लागते मले..दोन-चार त पोट्ट्या असतेत तिथं.." "येतीन अजून पाय तू" "कोन म्हन्ते?" "माय सांगे..लय इनंत्या केल्यावर हे जागा देल्ली सरपंचानं..देत नौता सरपंच..पोरीले कायले शाळा पाहिजे म्हने?" "मंग?" मास्तरीन बायनी पिछा नाय सोडला..मंग द्याच लागली त्याले...

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: साथ

लेखक विअर्ड विक्स यांनी शुक्रवार, 10/02/2017 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaaa ती आमच्यातली नव्हती पण अल्पावधीतच मी तिचा झालो होतो.आमच्यातील नाते तिच्या पोटी नवा आकार घेत होते. मायभूमीहून तीला निरोप आला कि तिची माय आजारी आहे. माईला नि मायभूमीतील अनेक सैनिकांना तिच्या कुशल हातांची गरज होती. ३० जानेवारी - विमानतळावर भरलेल्या मनाने सोडलेला हात;काहीतरी चुकतंय असे सतत सांगत होता. ती नि मी हेच माझे विश्व होते, पण जग बदलत होते ! एका अध्यादेशाने तिचे परतीचे दोर कापले गेले होते. साथ सुटली होती.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: पाऊलखुणा?

लेखक बरखा यांनी शुक्रवार, 10/02/2017 06:42 या दिवशी प्रकाशित केले.
aa 'आज महीना होऊन गेला आमच्या भेटीला'. तिचा फोनही बंद आहे. तिच्या मर्जी शिवाय तिच्या घरी जायचे नाही अशी ताकीद आहे. काय करावे कळत नाहीये ? मी मात्र रोज ठरल्यावेळी ईथे येतो, समुद्रकिनारी तासन तास तिची वाट बघतो. आज अचानक ती आली! बराच वेळ काहीच बोलत न्हवती. मी फक्त तिच्याकडे बघत होतो. मन एकदम गत आठवणीत गेल.

मराठी दिन २०१७ (बोलीभाषा सप्ताह) आवाहन

लेखक विशेषांक यांनी गुरुवार, 09/02/2017 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! दर वर्षी कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी, म्हणजे २७ फेब्रुवारीला जागतिक मराठी दिन साजरा होतो. मिपावरही कमी-अधिक प्रमाणात दर वर्षी काही उपक्रम केले जातात. गेल्या वर्षी आपण मराठी भाषा दिनानिमित्त बोलीभाषा सप्ताह साजरा केला होता आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. काही काही अगदी अपरिचित बोलींमधील लिखाणही प्रकाशित झाले होते. तसेच आंतरजालावर हा अभिनव उपक्रम असल्याने वृत्तपत्रातही त्याची दखल घेतली गेली होती. प्रमाणभाषेबरोबरच बोलीभाषा जगल्या पाहिजेत, फुलल्या पाहिजेत. त्यासाठी पुढच्या पिढ्यांना बोलीभाषेची ओळख असली पाहिजे.

Brevet des Randonneurs Mondiaux 300

लेखक देशपांडेमामा यांनी गुरुवार, 09/02/2017 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षक थोडे विचित्र आहे कारण १) हे फ्रेंच भाषेतले आहे आणि २) हा प्रकार जो पर्यंत सायकलींगची आवड लागत नाही तोपर्यंत काही कळत नाही :-) BRM च्या अधिक माहीतीकरता मोदकभाऊंच्या ह्या धाग्याला भेट द्या डिसेंबर २०१६ मध्ये २०० ची BRM म्हणजेच long distance cycling चा २०० किमी चा प्रकार पुर्ण केला होता. त्यानंतर काही ना काही कारणाने पुढचा ३०० चा प्रकार करता आला नाही. पण फेब्रुवारी २०१७ चा करायचाच असे ठरवले कारण पुढला थेट जुन मध्ये होता/आहे. नोंदणी वगरे सगळे सोपस्कार करुन तयारीला लागलो आणि नेमक तेव्हा काम वाढलं !

वांग्याचे दह्यातील झटपट भरीत

लेखक अस्मी यांनी गुरुवार, 09/02/2017 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ मोठं भरताचं वांग मिरच्या - ४ कांदा - १ मध्यम कोथिंबीर मीठ साखर तेल मोहरी, जिरे, हिंग, उडीद डाळ सायीचं दही - २ चमचे कृती: १. वांग तेल लावून भाजून, गर काढून घेणे. २. कांदा, कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावा; मिरच्या मध्ये चिरून तुकडे करून घ्यावेत. ३. तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, उडीद डाळ घालावे; मिरच्या परतून घ्याव्यात. ४. त्यामध्ये भाजलेल्या वांग्याचा गर घालावा; मीठ, साखर घालून परतून घ्यावे. ५. गॅस बंद करून मिश्रण थंड होउ द्यावे. ६.

त्या आतल्या द्युतीला

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 09/02/2017 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
त्या आतल्या द्युतीला उमजू कसे? न कळते -जी सर्वव्यापी ऐसे स्थलकाल भरुनी उरते चक्षूस ना दिसे ती पाळी न नियम कोते क्षणमात्र लुप्त होते क्षणि झगमगून उठते ही तीच का मिती, जी- -स्पर्शात रंग भरते -ध्वनितून नव-रसांना -उधळीत गंध होते
काव्यरस

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - न्यूझीलंड विरुद्ध झिंबाब्वे

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 09/02/2017 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
१० ऑक्टोबर १९८७ लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम, हैद्राबाद हैद्राबादच्या मैदानात न्यूझीलंड आणि झिंबाब्वे यांच्यातली ग्रूप ए मधली मॅच रंगणार होती. अद्यापही टेस्ट स्टॅटस न मिळालेल्या झिंबाब्वेच्या संघाचा १९८३ नंतर हा दुसराच वर्ल्डकप होता. १९८३ मध्ये झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवून सगळ्यांनाच चकीत केलं होतं. भारताचीही त्यांनी १७ / ५ अशी अवस्था केली होती, पण कपिलदेवच्या अफलातून इनिंग्जने भारताला तारलं होतं. १९८३ च्या वर्ल्डकपबरोबरच कॅप्टन डंकन फ्लेचरचं करीअरही संपुष्टात आलं होतं.