Skip to main content

तूच तू...

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 13/02/2017 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
तोच चांद नभी अन् रात आज तीच ती सागराच्या लाटेवरची गाज देखील तीच ती तोच वारा... तीच नशा तेच धूसर क्षितिजही..... त्याच त्या नभामधुनी चांद किरणे तीच ती.... मात्र आज नको मज हे आठव तुझी दाटते..... साय-ओल्या वाळूमधली पाऊल खुण बोलावते.... तू असशी जर इथे तर.... सर्वकाही हवेसे! तूच नाही जर इथे तर.... जीणे अर्थहीन... नकोसे!!!
काव्यरस

अल्पसंख्यांकांचा प्रश्न! भाग१

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 12/02/2017 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
(संदर्भ ग्रथ- अखंड भारत का नाकारला?-शेषराव मोरे, छायाप्रकाश,अन्वय, आकलन- नरहर कुरुंदकर, महात्मा गांधी- धनंजय कीर, अब्राहम लिंकन- फाळणी टाळणारा महापुरुष- वि. ग. कानिटकर, अल्पसंख्यांक वाद – मुझफ्फर हुसेन ) कोणतीही लोकशाही शासनव्यवस्था ज्या लोकांचे ती प्रतिनिधित्व करते. त्यांच्या विकासासाठी, त्यांना विकासासाठी समान संधी आणि त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी तत्वत: तरी बांधील असते . पण त्याच बरोबर ज्या देशात ती आहे त्या देशाचे सार्वभौमत्व, अखंडत्व ह्याला हि तितकीच किंवा कांकणभर अधिकच बांधील असते.

मोबियस प्रकरणे ७-८

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 12/02/2017 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
ती पूर्णनग्नावस्थेत झोपली होती. डोळ्यातील पाण्यामुळे तिची ती आकृती त्याला अंधुकशी दिसत होती. ती एका चटईवर पाठीवर झोपली होती. फक्त डोके सोडून तिचे सर्व शरीर पूर्णपणे नग्न होते. तिने तिचा डावा हात तिच्या पोटावर ठेवला होता. जे अवयव सर्वसाधारणत: झाकले जातात ते पूर्णपणे नग्न होते आणि जे उघडे टाकले जातात ते झाकलेले होते.

क्रिकेट रेकॉर्ड - माझी ही एक जिलबी - भाग १ ...

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 12/02/2017 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत जे जे दारूण पराभव झाले त्यात एक निकष असा धरला की १ डाव व दोनशे धावा अशा किंवा यापेक्षा जास्त दारूण पराभव स्वीकारण्याचे पातक कोणी किती केले आहे ? तर खालील प्रमाणे माहिती मिळते... ऑस्ट्रेलिया - ५ वेळा भारत - ७ वेळा विण्डीज ५ वेळा इंग्लन्ड ४ वेळा बांगला देश ७ वेळा द आफिका २ वेळा पाकिस्तान १ वेळा न्युझीलण्ड ३ वेळा झिम्बाब्वे ६ वेळा श्रीलंका ३ वेळा यात भारताचा जास्तीत जास्त वेळा असा पराभव कोणी करावा ? परम्परागत शत्रू पाकिस्तानने की एके कालच्या बलाढ्य विन्डीजने की सदा सामर्थ्यवादी ऑसीसने .... ?

परसाकडून पॉटीकडे

लेखक स्वामी संकेतानंद यांनी रविवार, 12/02/2017 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
मल, मलविसर्जन ही संकल्पना आपल्याकडे एकंदर थेट उल्लेख न करण्याजोगी मानली जात असावी. त्यामुळे विष्ठा किंवा मल या शब्दांशी संबंधित जे बोलींतले शब्द आहेत त्यांचा प्रयोग असभ्य मानला जाऊन सभ्य लोकांत, चारचौघांत, भद्र भाषेत त्यासंदर्भात सांगायचे झाले तर ती क्रिया जिथे केली जाते त्या स्थानाचा उल्लेख करण्याची पद्धत पडली असावी. कालांतराने त्या जागेला दिलेले नावच विष्ठेला समानार्थी म्हणून रूढ झाले. पण गंमत अशी की एकदा तो शब्द जनमानसात रूढ झाला की त्याला अशिष्ट समजले जाऊन त्या जागी नवा शब्द वापरण्यात येऊ लागला. परसाकडं हा शब्द ग्रामीण भागात भरपूर वापरण्यात येतो.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - सेमीफायनल - ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 12/02/2017 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
४ नोव्हेंबर १९८७ गद्दाफी, लाहोर लाहोरच्या गद्दाफी स्टेडीयमवर यजमान पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल खेळली जाणार होती. न्यूझीलंडविरुद्धच्या ग्रूपमधल्या शेवटच्या मॅचमध्ये गावस्कर - श्रीकांत यांच्या आतषबाजीने ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या स्थानावर ढकललं होतं. ग्रूपमधल्या आपल्या सगळ्या मॅचेस भारतात खेळणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने पाकिस्तानविरुद्ध आणि ते देखिल पाकिस्तानमध्ये खेळणं निश्चितच कठीण आव्हान होतं. या वर्ल्डकपनंतर आपण क्रिकेटमधून रिटायर होत असल्याची आणि लाहोरची मॅच ही पाकिस्तानमधली आपली अखेरची मॅच असल्याचं इमरान खानने जाहीर केलेलं होतं.

मोबियस प्रकरण - ६

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 11/02/2017 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
“शक्य आहे बाबा!” तो म्हणाला आणि खरोखरीच ते चक्र रात्रभर चालू राहिले. वाळू पडायची काही थांबत नव्हती. ते बघून तो गोंधळून गेला. बावचळला.

. चुंबन

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 11/02/2017 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
व्ह्यालेंटाईन दिवस येत आहे.. चुंबन ही प्रणयातली आनंददायी क्रिया आहे.. चुंबनाचे सुंदर प्रकार आपल्या पुढे सादर करत आहे चुंबनाचे प्रकार. चुंबनाचे खालील प्रमाणे नीर निराळे प्रकार आहेत. जर आपणा पैकी कुणास यातला प्रकार आवडला तर आपण त्याचा प्रयोग करू शकता.आपल्या जोडीदार बरोबर * फुलपाख्ररु चुंबन-ह्या चुंबन प्रकारामध्ये प्रेयसीने तिचा चेहरा प्रियकराच्या चेहऱ्याचा एक श्वासांच्या अंतरावर आणावा. आणी त्याच्या नजरेत नजर मिसळून आपल्या डोंळ्यांच्या पापण्या फुलपाखराच्या पंखा प्रमाणे फडफडाव्यात. डोंळ्यांच्या पापण्यांचि फडफड ह्रदयांची फडफड वाढवण्यास समर्थ असते.. * मान चुंबन- हे एक मैत्रिपुर्ण.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - भारत विरुद्ध न्यूझीलंड

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 11/02/2017 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
३१ ऑक्टोबर १९८७ व्हीसीए, नागपूर नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ग्रूप ए मधली दुसर्‍या राऊंडची मॅच रंगणार होती. वर्ल्डकपमधलं आव्हान संपुष्टात आल्याने त्यांच्या दृष्टीने या मॅचला काहीच अर्थ नव्हता. भारत आणि ऑस्ट्रेलियाने ग्रूप ए मधून सेमीफायनल गाठली होती तर ग्रूप बी मधून पाकिस्तान आणि इंग्लंडने. पाकिस्तानने ग्रूप बी मध्ये पहिला क्रमांक मिळवला असल्याने ग्रूप ए मध्ये दुसर्‍या स्थानावर राहणार्‍या टीमला लाहोरच्या मैदानात पाकिस्तानशी सेमीफायनलमध्ये मुकाबला करावा लागणार होता.

आस

लेखक एक एकटा एकटाच यांनी शुक्रवार, 10/02/2017 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्या रात्री, अंधारात त्या घरात कधीपासून त्या दोघांत नुसती झटापट सुरु होती. अचानक विजेच्या लखलखाटात त्याच्या हातातली त्याने उगारलेली लोखंडाची सळई चमकली आणि पुढच्याच क्षणाला त्या बंगल्यात एक आर्त किंचाळी घुमली. आता सगळं शांत झालं होतं. त्याच्या हातातली सळई जमिनीवर गळुन पडली. तो बधीरपणे तिच्या निश्चल कलेवराकडे पहात होता. बाहेर पावसाची रिपरिप सुरु होती. तो मटकन गुडघ्यावर बसला आणि तिच्याकडे पहात रडायला लागला. ****************************************************************************** डिलाईड रोडच्या चाळीत चिराग आणि निलाक्षी लगबगीने जीना चढत होते. आज त्यांना ज़रा जास्तच उशीर झाला होता.