Skip to main content

थरारक लिंगाणा..

लेखक हेम यांनी शुक्रवार, 10/02/2017 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
रायलिंगवरुन लिंगाणारायलिंग पठारावरुन दिसणारा लिंगाणा (उंची २९६९ फ़ूट) खिंडीतून माथ्यापर्यंतची उंची अंदाजे ७५० ते ८०० फ़ूट १६ वर्षांपुर्वी २००१ मध्ये चक्रम हायकर्स संस्थेच्या आपटेकाकांसोबत सिंहगड- राजगड- तोरणा- रायगड असा ट्रेक केला, त्यावेळी मोहरीतून बोराट्याच्या नाळेने उतरलो होतो. नाळेत आदल्या वर्षीच बोल्डर पडल्यामुळे वाट थोडी साहसी झाली होती.

उल्फत 2

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 10/02/2017 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
एक _______________________________________________________________ "तुझ्यासारखा भंगार माणूस एमबीए कसा करु शकतो?" हा प्रश्न होता भालचंद्रला. नेहमीच ऐकू येणारा. यावेळेस तुकारामने विचारला. त्याचं धाडस भलतंच वाढलेलं दिसतंय. मी अर्धवट झोपेत होतो. आणि या दोघांचीही कुरबूर माझ्या कानावर पडत होती. मी उठून घड्याळ बघितले. अकरा वाजले होते. ते नेहमीच वाजतात. आजही वाजले. "आणि तू डिप्लोमा करुन लय उपाxली का?" भालचंद्र बहुतेक चिडला होता. त्याच्या बोलण्यात एकप्रकारचा दम होता. 'uthlas ki nahi?' हा एसएमेस होता. माझ्यासाठी.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अडनड

लेखक बबन ताम्बे यांनी शुक्रवार, 10/02/2017 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaa आये , सरकारनी हजार पाचशेच्या नोटा बंद केल्यात.नाय बदलल्यातं त्याला किंमत ऱ्हाणार नाय", किसना म्हातारीला म्हणाला. "माह्याकं काह्याचा पैका." म्हातारी फणकारली. "हां ! माजघरात ठिवलेत गठुड्यात. पण अडनडीला म्हून रुपया द्याची वासना झाली नाही" सून आतून कडाडली. "तू माह्या पैशावंच टपून बस. औशादपाण्याला कवा धीला मोकळ्या मनानी पैका?

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ब्रेन स्टॉर्मिंग

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 10/02/2017 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
a फॆकॆन्जी कन्सल्टंट्च्या थंडगार कचॆरीतील पॆस कॉन्फरन्स हॉलमध्यॆ टॆबलाभॊवती कॊंडाळॆ. एक नंबरवरुन पदच्युत झाल्यामुळॆ दुखावलॆल्या आणि हादरलॆल्या एमजी फूड्स्च्या अपयशाचा पंचनामा आणि गर्तॆतून बाहॆर पडायची उपाययॊजना यावर ब्रॆन स्टॉर्मिंग रंगात. मार्कॆट मॅपींग व्हाइट स्पॆस ग्रॆ स्पॆस सॆल्स निंजा पीआयपी टार्गॆट टिअर टू सप्लाय चॆन कॅश वॉर रूम रॅडिकल चॆंजॆस पी एम एस आर ऍण्ड डी प्लांट अपग्रॆड बॊल्ड अ‍ॅप्रॊच,.... दरवाजा उघडला, मार्लबोरोचा दर्प आणि सी ई

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: कर हा करी धरिल्यावरी

लेखक नूतन यांनी शुक्रवार, 10/02/2017 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaaa पदवीधर झाल्यावर मॊठ्या हौसॆनॆ विपणन विषयात व्यवस्थापनशास्त्राची पदवी घॆतली. आता लठठ पगाराची नॊकरी चालुन यॆईल या भ्रमात हॊता. पण काही अर्ज नकारघंटा घॆऊन तर कधी याचंच पटलं नाही म्हणून, शॆवटी बॆकारीचा शिक्काच माथी आला. एका पहाटॆ ‘खॆड्याकडॆ चला’ असं कुणीतरी कानात मंत्रून गॆलं. बहरलॆली फुलशॆती बघुन मन तृप्त हॊतं खरं, पण आपलॆ हॆ काळॆ, दणकट हात या पलिकडॆ काहीच करु शकत नाहीत.

हमने तो दिल को आपके कदमों पे रख दिया

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 10/02/2017 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
सूफी़जम जगातली एक अनोखी प्रणाली आहे. तिच्यात सारं व्यक्त जग प्रेयसी आहे आणि ज्या अव्यक्तानं सारं व्यक्त तोललंय, तो प्रितम आहे. जे व्यक्त आहे, मग तो पुरुष देह असो की स्त्री देह, सूफी़ंच्या दृष्टीनं ते सर्व स्त्रैण आहे. जे कधीही व्यक्त होऊ शकत नाही, तो पुरुष आहे. खरंतर जोपर्यंत अव्यक्ताशी मीलन होत नाही तोपर्यंत जेजे काही व्यक्त आहे ते स्त्रैण आहे. हा प्रकृती आणि पुरुषातला अनंगरंग सूफी़ जगण्याचा अंदाज़ आहे. सूफी़जम हा जगण्यातला रोमान्स आहे. सूफी़ साधनेची फलश्रुती व्यक्त आणि अव्यक्ताच्या मीलनात आहे. आणि मीलनानंतर प्रियकर- प्रेयसी एकच आहेत. भक्तीमार्ग सूफी़जमपेक्षा वेगळा आहे.

द मेन्स्ट्रुअल मॅन

लेखक इरसाल कार्टं यांनी शुक्रवार, 10/02/2017 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
द मेन्सट्रुअल मॅन, वाचून थोडे दचकलात ना? पण मी आज एका अश्या माणसाची गोष्ट सांगत आहे ज्याला अख्खं जग याच नावाने ओळखायला लागलंय त्याचं खरं नाव आहे अरुणाचलम मुरुगनाथम . आणि विशेष म्हणजे हा माणूस आपल्याच भारतातला आहे. चारचौघातला, पण त्याचं काम एवढं जबरदस्त आहे कि त अनेकांसाठी प्रेरणास्थान बनलाय. आमच्या क्लासमेट्स फाउन्डेशन ची मूळ प्रेरणाच तो आणि त्याचे कार्य आहे. माझी याच्याशी ओळख झाली इंटरनेट वरील या व्हिडिओ मुळे. साधारणत: ५-६ वर्षापूर्वी मी हा व्हिडिओ बघितला आणि डोक्यात पार झिणझिण्या आल्या.

पळवाट - भाग २

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 10/02/2017 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
पळवाट - भाग १ बेडवर पडल्या पडल्या शरूनं इतका वेळ आणलेला खंबीरपणाचा उसना आव गळून पडला. झोपायला म्हणून गेलेलं कुणीही झोपलं नव्हतं. सगळेच भूतकाळाची वर्तमानाशी सांगड घालायचा प्रयत्न करत होते. पण असं झालेल्या चुका दुरुस्त करून पुन्हा मनमोकळं जगता येत असतं तर आणखी काय हवं जगायला? "काकू, आज मी जरा एका मैत्रिणीकडे जाऊन येणार आहे. दुपारपर्यंत येईन. माझी वाट बघू नको जेवायला." दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरता आवरता शरुनं काकूला सांगितलं. आपण घर सोडून आलोय या गोष्टीचं शरूच्या चेहऱ्यावर जराही वैषम्य दिसत नाही.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - वेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 10/02/2017 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
१६ ऑक्टोबर १९८७ गद्दाफी, लाहोर लाहोरच्या गद्दाफी स्टेडीयममध्ये यजमान पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यात ग्रूप बी मधली मॅच खेळली जाणार होती. ग्रूपमधल्या आपल्या पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागल्यावर वेस्ट इंडीजने श्रीलंकेचा फडशा पाडला होता, पण सेमीफायनल गाठण्याच्या दृष्टीने ही मॅच जिंकणं वेस्ट इंडीजला अत्यावश्यक होतं. १९८४ - ८५ चा मोसमात क्लाईव्ह लॉईड रिटायर झाल्यावर वेस्ट इंडीजच्या संघाच्या कॅप्टनपदाची जबाबदारी आली होती व्हिव्हियन रिचर्ड्सकडे!

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: देवाची काठी

लेखक स्मिताके यांनी शुक्रवार, 10/02/2017 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
aaa "हा पाहिलास फोटो? पेपरात छापला होता म्हणे.. आजी आणि तिची मैत्रीण." "आणि हे मागे काय ग आई? " " भूकंप झाला होता ना त्यावेळी...” "मग?" "तुझी आजी हिमतीची. तिच्या घरचं कोणीच वाचलं नाही. या मैत्रिणीच्या आईला विचारलं तिने, तुमच्या बरोबर राहू का, म्हणून. त्यांचं घर तरी कुठे वाचलं होतं? कष्ट उपसले आणि निभावलं कसं तरी. गावची शाळाही कोसळली होती, पण दोघी दूरच्या शाळेत चालत जात.” "आणि हा फोटो?