Skip to main content

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - सेमीफायनल - भारत विरुद्ध इंग्लंड

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 06/02/2017 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - सेमीफायनल - भारत विरुद्ध इंग्लंड २२ जून १९८३ ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर लँकेशायरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल होती. बॉब विलीसचा इंग्लिश संघ ग्रूपमधल्या सहा पैकी पाच मॅचेस जिंकून सेमी फायनलमध्ये धडकला होता. उरलेली एकमेव मॅचही न्यूझीलंडने शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकली होती. इंग्लिश खेळाडूंचं सारं लक्षं केंद्रीत झालं होतं ते फायनलकडे!

शब्दच केवळ

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 06/02/2017 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
जोवर ना ती तेज दुधारी कट्यार दु:ख्खाची मज चिरते तोवर माझे शोकगीतही शब्दच केवळ, काव्य नव्हे ते जोवर ना ती रिमझिमणारी श्रावण सर मज चिंब भिजविते तोवर माझे पाऊसगाणे शब्दच केवळ, काव्य नव्हे ते जोवर ना मज दुमदुमणारी हाक अनाहत ऐकू येते तोवर रचिले सूक्त जरी मी शब्दच केवळ, काव्य नव्हे ते प्रतिभेचे लखलखते लेणे जोवर या झोळीत न येते तोवर स्फुरला मंत्र जरी मज शब्दच केवळ, काव्य नव्हे ते
काव्यरस

डस्टी ब्यूटी .........

लेखक किल्लेदार यांनी सोमवार, 06/02/2017 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
डस्टी ब्यूटी ......... एवरेस्टवर नाही तर किमान त्याच्या देशात तरी जाऊन यावे अशी माफक इच्छा ठेऊन एका भल्या पहाटे काठमांडू चे तिकीट बुक करून टाकले आणि दिवस मोजीत बसलो. मनाची आणि शरीराची तयारी करायला एक महिना जवळ होता. द्रव्याची तजवीज तेवढी नेहमीप्रमाणे शेवटच्या आठवड्यात करायची होती. नेपाळ मध्ये भारतीय चलन चालत असले तरी पाचशेच्या नोटा सहसा चालत नाहीत तेव्हा सर्व रोख शंभरीतच लागणार होती. आणि त्याच आठवड्यात ........... "मित्रो.... आज मध्यरात्री के बाद पाचसौ और हजार के नोट मात्र कागज के टुकडे बन के रह जायेंगे !!!" अशी घोषणा झाली...... मग काय .........

राजीव मल्होत्रा - हिंदूफोबिया

लेखक वडापाव यांनी सोमवार, 06/02/2017 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
मी निरीश्वरवादी माणूस आहे. माझा देवावर विश्वास नाही. देवावर विश्वास नसण्याचं कारण काही सिनेमांत दाखवलं जातं तसं (अष्टविनायक, देऊळ बंद) देवावरच्या रागापोटी नाही, तर देव असल्याचा, मला स्वत:ला पटेल असा शास्त्रसिद्ध पुरावा उपलब्ध नाही म्हणून. देवाचं अस्तित्व असू शकतं, या थिअरीला (सिंद्धांताला) मान द्यायला माझी ना नाही. उद्या मानवजातीला काही पुरावा गवसलाच, तर मी आनंदाने (म्हणजे नाईलाजानेच, पण पद्धत आहे बोलण्याची) माझी मतं बदलेन. पण निरीश्वरवाद्यांमध्ये सुद्धा एकवाच्यता नसते, हे मला जाणवायला काही काळ गेला. आज परिस्थिती अशी उद्भवली आहे, की बहुतेक निरीश्वरवादी माझ्या डोक्यात जाऊ लागले आहेत.

काय करावे!!! तिच्याशी नाते जोडावे की नको???

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी रविवार, 05/02/2017 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी या आधीच माझं वय व माझी पार्श्वभुमी आंतरजालावर सांगुन झालेली आहे.मी अविवाहीत आहे.सध्या एका to be or not to be प्रकरणात अडकलो आहे. जास्त फाटे न फोडता विषयाला हात घालतो.माझ्या घराजवळ एक विवाहीत तरुणी राहते.तिचे व माझे कुटुंब एकमेकांना ओळखते.ति साधारणतः माझ्या पुढे तीन चार वर्ष मोठी असेल .आधी कधी तिने माझ्याशी संपर्क ठेवला न्हवता.माझ्याकडे बघतही नसायची.पण अचानक गेल्या काही महीण्यात तिचा नूर बदलला व ति माझ्याकडे हेतुतः बघायला लागली.तशी ती दिसायला खूप सुंदर आहे.

(३) डेटा लॉस - ऑपरेटिंग सिस्टम ने हार्ड डिस्क डिटेक्टच केली नाही तर

लेखक केंट यांनी रविवार, 05/02/2017 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
"आता ऑपरेटिंग सिस्टम ने हार्ड डिस्क डिटेक्टच केली नाही तर ? " या पूर्वीच्या सॉफ्टवेअर प्रोसेस आपण घरच्या घरी करू शकतो. आता या पुढील प्रोसेस , महत्वाचा डेटा असलेल्या हार्डडिस्क वर करू नये. काही प्रश्न असल्यास इथे विचारावेत. ऑपरेटिंग सिस्टम ने हार्डडिस्क डिटेक्टच केली नाही तर सॉफ्टवेअर प्रोसेस निरूपयोगी आहे.अश्या वेळेस हार्ड डिस्क खालील सिंप्टम्स दाखवते का ते नोंद करावे 1. हार्ड डिस्क मधे आत प्लॅटर फिरत असल्याचा आवाज येत आहे का ? 2. हा आवाज काही वेळेत बंद होऊन डिस्क फिरण्याची बंद होते आहे का ? 3. फिरण्याच्या वेळेत क्लिकिंग चा आवाज येतो का ? 4.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - भारत विरुद्ध झिंबाब्वे

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 05/02/2017 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
१८ जून १९८३ नेव्हील ग्राऊंड, टनब्रिज वेल्स केंट काऊंटीतल्या टनब्रिज वेल्सच्या ग्राऊंडवर भारत आणि झिंबाब्वे यांच्यातली दुसर्‍या राऊंडची मॅच रंगणार होती. ग्रूपमधल्या पहिल्या राऊंडच्या मॅचेसमध्ये डंकन फ्लेचरच्या अननुभवी झिंबाब्वेने किम ह्यूजच्या ऑस्ट्रेलियाला चकवलं होतं! कपिल देवच्या भारतीय संघाने तर पहिल्याच मॅचमध्ये वेस्ट इंडीजला पराभवाचा अनपेक्षित धक्का दिला होता! १९७५ पासून वर्ल्डकपमधली एकही मॅच न गमावणार्‍या वेस्ट इंडीजचा हा पहिलाच पराभव होता! पहिल्या राऊंडमध्ये भारताने झिंबाब्वेचा आरामात पराभव केला असला तरी ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली होती.

!!...'मानवी भूकंप'...!!

लेखक बटाटा चिवडा यांनी रविवार, 05/02/2017 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट आहे ही एक ग्रासलेल्या मुलीची दरड कोसळली एके दिवशी तिच्यावर कृत्रिम आपत्तीची... असा काही झाला होता तिच्या मनावर आघात 'मानवी भूकंपा'चा घडला होता कृत्रिम अपघात... भूकंपाचे केंद्र होते जवळचेच एक घर राहात होता तिथेच तिचा तो 'प्रियकर'... प्रेमात असा काही दिला होता त्याने धोका एकाच फोन कॉल ने बसला होता तिला मोठा धक्का.. त्याच्या दूर जाण्याने तिच्या पायाखालची जमीनच हादरली होती मनाच्या भूकंपाची ती तीव्रता रिश्टर स्केलवर देखील मोजण्याजोगी नव्हती.. मनाचे तुकडे दिसत होते सर्वत्र विखुरलेले.. अन, आठवत होते जुने दिवस जेव्हा गीत
काव्यरस

आताशा.. असे हे.. मला काय होते

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 05/02/2017 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
संदीपची कविता रसग्रहणापलिकडे आहे कारण त्याला जे सांगायचंय ते सहज, सोपं आणि समोर आहे. प्रत्येक शब्द बोलका आणि प्रत्यकारी आहे. शब्द वाचताक्षणी आपण त्या अनुभवाशी एकरुप होतो, मग अजून रसग्रहण काय करणार ? तरीही त्याच्या या कवितेला एक दाद म्हणून हा रसास्वाद सादर केल्याशिवाय राहावत नाही. संदीप म्हणतो की त्याची कविता गाणं होऊनच प्रकटते. म्हणजे अनुभव व्यक्त होण्यापूर्वीच त्याचा मनात अनुरुप सांगितिक माहौल तयार झालेला असतो. ही गोष्ट केवळ दुर्लभ आहे. कारण त्याला शब्दांची जुळवाजुळव करायला लागत नाही. त्याचा संवेदनाशिल अनुभव प्रवाही होऊन प्रत्ययकारी शब्दांन्वये कविता होतो.