Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: संवाद

लेखक तिमा यांनी बुधवार, 01/02/2017 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaa फोन वाजला. अरे, टीव्ही लावलास का ? मोदीनी तुमच्या कपाळात घातल्यात. तुझ्याकडचे लाखो रुपये आता कागद झाले कागद. पण तुला का एवढा आनंद होतोय ? वाईट रे! आता तुमची पूर्ण नाकेबंदी झालीये, हरामाचा पैसा कधी पचत नाही. बरं, बरं, बघू या. भक्त म्हणून हिणवतोस काय? आता कळेल त्याची ताकद! डिसेंबरचा शेवटचा आठवडा. काय, मग जाळल्या का नोटा ? मी मजेत आहे. तू किती वेळा लायनीत उभा राहिलास ? आम्ही मोजत नाही.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ऑक्टोबर- मार्च

लेखक मराठी कथालेखक यांनी बुधवार, 01/02/2017 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaa ३० मार्च २०१७: हॉस्पिटलच्या स्पेशल वॉर्डमध्ये विशेष लगबग होती. अ‍ॅन्टी करप्शनच्या मोहिते साहेबांना घरी सोडण्यात येणार होतं. ऑक्टोबर महिन्यात जीवघेण्या अपघातानंतर ते कोमात होते ते काल शुद्धीवर आले. त्यांची अर्धशिक्षित बायको, आई आणि अ॑ठरा वर्षांचा मुलगा किशोर आनंदात होते. साहेबांच्या अपघातानंतर किशोरने मोठं होत घर सांभाळल होतं. काउंटरवर जाण्यापुर्वी रुममध्येच किशोर खिशातून पैसे काढून मोजू लागला. "हे काय आहे ?

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: पैसा पहावा खाउन

लेखक विनीत संखे यांनी बुधवार, 01/02/2017 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaa "खा खा पैसे ... लुबाडा आम्हाला", बाई भलतीच तोंडाला आली होती. मंत्रीमहोदय मात्र चैनीत बसले होते. कातडीचं लेदर झालं होतं. हिनं लाख दिले. दुसऱ्या बिल्डरने त्यादिवशीच आणखीन कोट्यानकोटी चारले. हुश्शार बाईने सुद्धा माणसं पेरली होती. मंत्री निघाले त्यांच्या गाडीतून पण तिच्या गाडीवानाने गाडी नेली थेट कबरस्तानात. मंत्रीसाहेबांनी पैसे देऊन पाहिलं, रडून पडून पाहिलं, राजीनामा देण्यास राजी झाले पण पठ्ठा बाईशी प्रामाणिक होता.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: वेट अ मिनिट!

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 01/02/2017 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
aaa "पूरा शहर खंडर हो चुका है. कई बिल्डिंगोंमे आग सुलग रही है. धुवा धुवासा है यहा. सब बरबाद हो गया जनाब.. ओव्हर" "हिम्मतसे काम लो. खूदा है अपना.. ओव्हर" "जनाब, शहरकी दक्षिणी हिस्सेमे हलचल नजर आ रही है. हुकूम करो..ओव्हर" "आगे बढो. मै बॅकअप ट्रूप भेज रहा हू.. ओव्हर" "ठिक सामने दो छोकरीया दिख रही है. चलती जा रही है रस्तेसे.. ओव्हर" "बचाओ उन्हे. कहिसे भी गोली आ सकती है.. कहीसे बंम्ब गिर सकता है.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: प्रवास

लेखक राघवेंद्र यांनी बुधवार, 01/02/2017 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
aa बाबा म्हणायचे, उत्तरेकडे हिम असतो. त्यांच्या तरुण वयात तिकडे काम करत. सध्या इथे ना हाताला काम, प्यायला साधे पाणीपण नाही. रोज जिवंत परत येऊ की नाही याची शाश्वती नाही. एक दिवस घरी न सांगता निघालो, मिळेल ते वाहन पकडून आणि पोहचलो समुद्रकिनारी. इथून एका मोठया जमावामध्ये सामील झालो. आणि सुरु झाला जीवघेणा प्रवास. एक जुनाट जहाजवर, ना खायला पदार्थ, ना प्यायला पाणी.

रंगपंचमी

लेखक पराग देशमुख यांनी बुधवार, 01/02/2017 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
रंग मनाचा,रंग क्षणाचा, क्षणाक्षणाला विरघळणारा. क्षणात हसरा,क्षणात हळवा, डाव्या गाली ओघळणारा. पुसता अश्रू आवेगाने, रंग काजळी विस्कटणारा. अंमळ उसासे स्फुंदत असता, रंग बोचरा गहिवरणारा. मित्रांची ती चौकट जमता, रंग खुशीचा खळखळणारा. कातरवेळी काहुरणारा, पिंग गुलाबी रंग बावरा. रंग कोणता शौर्येन्द्राचा, निधड्या छाती वार झेलता? रंग कांतीचा गौर वेगळा, चाहुलीसरशी थरथरणारा. अवखळ,चंचल,शुद्ध-कांचनी

चिलापाटीचा खेळ

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 01/02/2017 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे चिलापाटी नावाचा एक खेळ असतो. आम्ही तो लहानपणी खेळायचो. हा खेळ कबड्डीसारखाच परंतु थोडा वेगळा असतो. दोन्ही बाजूला दोन पाट्या आणि दोन्हींच्या मध्ये पाट्यांना जोडेल अशी एक पाटी. या पाट्या म्हणजे जमिनीवर तात्पुरत्या तयार केलेल्या रेषा. या रेषा तळपायाने ओढत आखल्या जातात वा एखाद्या काठीने जमिनीवर ओरखडल्या जातात. अशा पध्दतीने चिलापाटी खेळाच्या पाट्या पाडाव्या लागतात. चिलापाटीच्या पाट्यांचा आकार इंग्रजी आय ह्या अक्षरासारखा असतो. रेषा कायमस्वरूपीच हव्यात असे नाही. या खेळासाठी कबड्डीसारखे दोन्ही गटांमध्ये अकराच खेळाडू हवेत असेही नाही.

मी आज केलेला व्यायाम - फेब्रुवारी २०१७ - सायकलिंग / रनिंग चॅलेंज

लेखक मोदक यांनी बुधवार, 01/02/2017 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८,०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९,६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ५४७ किमी.

कॅरोलीन

लेखक अत्रन्गि पाउस यांनी बुधवार, 01/02/2017 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
८-एप्रिल-२००४ आयुष्यातल्या पहिल्या वहिल्या परदेश प्रवासाचे मोजून ८५ दिवस संपलेले. मी आणि कल्याण (माझा बॉस जो कधी बॉस सारखा वाग्लाच नाही) सगळे काम कष्टपूर्वक अतिशय निगुतीने संपवलेले त्यामुळे अतिशय समाधानाने आम्ही मोरेपा ह्या paris जवळच्या एका लहानश्या गावात कामाची आवरा आवर करत होतो .. आज आणि उद्या क्लायंट ऑफिस मध्ये बसून काही फुटकळ मिटींग्स आणि काय करावे असे बोलत असतांना अचानक गाणी ऐकायला लागलो, माझी आणि कल्याणची कुंडली पुल, लता, आशा, भीमसेन सगळ्याच बाबतीत जुळलेली ..

'मुर्ग तंगडी छाल-के-साथ'. अर्थात - चिकन आळशी!

लेखक आषाढ_दर्द_गाणे यांनी बुधवार, 01/02/2017 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
विनम्र सूचना: कृपया वेळ कमी असल्यास नमनाचे घडाभर तेल गाळून थेट पाककृती वाचणे. जर गरज हि शोधाची जननी असली तर आळस हि आजी आहे. एकट्याचा स्वयंपाक करताना भाज्या सोलणे, त्या छान बारीक बारीक चिरणे असल्या गोष्टींचा मला भयंकर आळस. कारण सोपे आहे - 'रांधा, वाढा नी उष्टी काढा' हे सगळे स्वतःच करायचे असल्याने (संजीव कपूर बनायची विच्छा असूनही) 'मिनिमम कष्ट, मॅक्सिमम उदरभरण' ह्या तत्वावर चालणे क्रमप्राप्त असते. तर अश्याच आळशीपणाच्या गरजेतून जन्माला आलेला हा एक नवा प्रकार.