Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: नवी सुरुवात

लेखक आंबट गोड यांनी सोमवार, 30/01/2017 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
aaa कडाडकाड.!! आवाज ऐकून गाढ झोपेत असलेली रेश्मा उठून बसली...अंधारात तिला काय घडते आहे ते कळेचना. भूकंप!! सगळीकडे माती , कानठळ्या बसविणारे आवाज, सैरावैरा धावणारी माणसे यात तिचा आक्रोश हरवून गेला. घरातले सगळे ढिगार्‍याखाली जणू लुप्त झाले होते. आक्रोशत ती काठमांडूच्या रस्त्यांवरुन चालत राहिली. अचानक तिला एका ढिगार्‍याखालून बारीक रडण्याचा आवाज ऐकू आला. क्षीणपणे कुणीतरी मदतीची याचना करीत होतं.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: वर्तुळाचा एक कोन

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 30/01/2017 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
a "चवचाल आहे झालं" श्यामल काकू करवादल्या "खरेच सासरच्यांनी बळजबरी केली की हीच गेली होती मागे राम जाणे" शांता मावशी उद्गारली "देहाची भूक चुकत नाही श्यामल. तरुण आहे आपली कुसुम अजुन" दुर्गा आज्जी मुलीला समजावु लागल्या. "भोळी आहे गं कुसुम" वसंतराव कळवळुन म्हणाले. "भोळी कसली?

अश्वत्थामा

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 30/01/2017 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
था॑ब, आलोच आतले कढ आवरून सावरून ठसठसणार॑ मेमरी कार्ड फॉरमॅट करून शहाणा मुखवटा चपखल बसवून आलोच. येतो- झाकून तू दिलेल्या भळभळत्या जखमा येतो- क्षणभर विसरून की मी चिर॑जीव अश्वत्थामा
काव्यरस

पाचोळा

लेखक फिझा यांनी सोमवार, 30/01/2017 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
पाचोळा तुझी एखादी आठवण, जशी अलगद वाऱ्याची झुळूक यावी पसरलेल्या जुन्या पाचोळ्यावर एखादं अलगद हिरवंगार पान पडावं अगदी तस्संच ..... हुरहूर लागलेल्या मनातला पाचोळा उडू लागतो काय अन सैरभैर आठवणींना पुन्हा उजाळा मिळतो काय ..... कुणाची चाहूल लागावी ना अगदी तस्संच ..... पाचोळ्यातली जुनाट दुःखं , नवीन पडलेल्या पानाला पाहून सुखावतात काय अन टचकन आलेल्या पावसाने, परत भिजतात काय ..... एखाद्याला डोळे भरून पाहावं ना अगदी तस्संच ....... आता पाचोळा काय कि हिरवं झाड काय पावसात सगळंच ओलं चिंब ......

दंगल: असा का पिक्चर रायते भाऊ?

लेखक मित्रहो यांनी सोमवार, 30/01/2017 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
लय आयकून होतो दंगल दंगल. टिवी लावा के तेच चालू रायते हानिकारक बापू नाहीतर धाकड. जो तो सांगत होता लइ मस्त पिक्चर हाय. तवा म्हटल आपण बी दंगल पाहाले जाच. कापसाचा चुकारा उचलला आन बंद्या फॅमिलेले पिक्चर पाहाले घेउन गेलो, ते बी साध्यासुध्या टॉकीजमधे नाही तर नागपुरातल्या मॉलमंधी. असा पचतावा झाला ना. तुमाले सांगतो राजेहो लइ म्हणजे लइच भंगार पिक्चर हाय. असा का पिक्चर रायते भाऊ? लइ बेक्कार पिक्चर हाय. मी तुमाले येकयेक मुद्दा बराबर समजावून सांगतो. लवस्टोरी आता मले सांगा पिक्चरमंधी कमीत कमी येकतरी लवस्टोरी पायजेन का नाही. लवस्टोरी बिना पिक्चर रायते का कधी?

कधीतरी.....

लेखक पराग देशमुख यांनी रविवार, 29/01/2017 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
उकलत मनाची पाकळी सांज हळवी होते; कधीतरी..... भिजवून पापणी ओली रात्र हळवी होते; कधीतरी..... चुकवून पाहारे सारे नजरा-नजर होते; कधीतरी..... मोडून मनाची दारे, तिची आठवण उच ...! येते; ऊ...च...!!ऊ...च...!!! (इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?) कधीतरी..... -मुकुंद

जुन्या संदर्भ साहित्याचे डीजीटायझेशन व विकिस्रोत कार्यशाळा

लेखक माहितगार यांनी रविवार, 29/01/2017 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
आयोजक : महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, महाराष्ट्र ज्ञान मंडळ (MKCL), द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी - अॅक्सेस टू नॉलेज (CIS-A2K) यांच्या संयुक्त विद्यमाने कृतीतून प्रत्यक्ष अनुभव देत प्रशिक्षण देणारी कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. उल्लेखित कार्यशाळेचे नियोजन सुरु आहे.

मोहीम - १ पॅम्प्लेट्स इन्सर्शन

लेखक अभ्या.. यांनी रविवार, 29/01/2017 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्यासाठी ५.०० एएम म्हणजे लेट नाईट असते बर्‍याचदा पण अर्ली मॉर्निंग कधीच नाही. तरीही ह्या पंचपंचऊ:षकाले अ‍ॅक्टीव्हाला किका मारुन वैतागलोय. बटनस्टार्ट तर होतच नाहीये, किक अ‍ॅणि स्टॅन्डमधला फरकही कळत नाही. स्वतःची नेहमीची बाईक देऊन मागून घेतलीय मित्राची अ‍ॅक्टीव्हा. कारणही तसेच. धंदा हो. दुसरे काय. इन्सर्शन्स टाकायचेत एक लाखभर. ......................... इन्सर्शन्स म्हणजे आपले पॅम्पलेटस हो. फ्लायरपण म्हणतात बरेच क्लायंट. ते नसतात का शन्वार रविवारच्या पेपरच्या पानात. पेपरची घडी उलगडताना सुळ्ळकन सांडतात. एकदा बघितले की पुड्या बांधायला, विमान करायला नाहीतर काचा पुसायला उपयोगी येतात ते.

इस्रायल आणि मोसाद. भाग १

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 29/01/2017 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire (मध्यपुर्वेतले इस्रायलचे स्थान आणि उपग्रहातून दिसणारा इस्रायल) हा संक्षिप्त इतिहास आहे जन्मापासून सतत संघर्षरत असलेल्या एका चिमुकल्या देशाचा.

पुन्हा श्रावण आला

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 29/01/2017 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
चुलीत निखारा जळत राहतो. जवारीच्या ताटाचं शेंडं जळावं तसं. उलथलेला तवा हसत राहतो. तो खूप मजेदार हसतो. घराच्या सांधीवाश्यात दडलेलं दारिद्र्य तो शोधून काढतो. हा अपशकून आहे. बिऱ्हाडं येतात, जातात, जगतात, भुईला टेकतात. नव्या पायवाटांची गणितं मात्र मागे सोडतात. हे जंगल नाही. हे माजलेलं कुसळ आहे. हिरवा वारा इथेही वाहतो. वैशाखात इथं मृगजळांची भरमार असते. रौद्र भीषण उन्हाळ्यात जीव करपून जातो. कुण्या डोंगराच्या गावात गेलेला नवरदेव, नवरी घेऊन परत आला. चार दिवस नवरी नांदली आणि यानं हाकलून लावली. रत्नाबाईनं आयुष्यभर जीवाला जाच लावून घेतला. मग ती मरुन गेली बिचारी. वावटळींसारख्या वावटळी उठतात.