Skip to main content

न्यू यॉर्क : २७ : रॉकंफेलर सेंटर

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 31/01/2017 23:04 या दिवशी प्रकाशित केले.

अश्वत्थामा एक सुरेख कविता

लेखक शरद यांनी मंगळवार, 31/01/2017 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
अश्वत्थामा एक सुरेख कविता अनन्त यात्री यांची एक सुरेख कविता वाचनात आली आणि महाभारतातील एका अभागी व्यक्तीमत्वाची चालू काळातील फरपट डोळ्यासमोर आली. कवितेकडे वळण्याआधी जरा अश्वत्थाम्याची ओळख करून घेऊ. अश्वत्थामा द्रोणांचा मुलगा. परशुरामाकडून मिळवलेली अस्त्रे द्रोणांनी अश्वत्थामाला शिकवली होती. द्रुपद व द्रोण गुरूबंधू. त्या वेळी द्रुपदाने मोठेपणी,राजा झाल्यावर, बरोबरीने वागविण्यचे वचन दिले पण जेव्हा द्रोण त्याच्या दरब्वारी आला तेव्हा त्याचा अपमान केला. रागावलेल्या द्रोणांनी त्याचा सूड घेण्याचे ठरविले.

भेट

लेखक चांदणशेला यांनी मंगळवार, 31/01/2017 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
आज अशी ती भेटली श्रावणी ओढ मुकी झाली ममं ह्रदयी वैफल्य जळे कुणा सौभाग्याची तू ना कळे ती जुनी वाट पुन्हा थरथरे पाहूनी दोन हळवे चेहरे व्याकूळ दिस तसाच ढळतो उदास रातीचा स्वर असाच सलतो काळजाच्या शिवारात भिजते एक लहर मुक्या पानांतूनी जागा ओला प्रहर मंद हुंदक्यातूनी हाक आली का अशी तू दूरस्थ गेली जा सौख्याने आल्या पाऊली युगायुगांची ही कथा अर्धीच राहीली.
काव्यरस

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: मृगजळ

लेखक अविनाश लोंढे. यांनी सोमवार, 30/01/2017 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
aa ‘राणी……! ' तिने फक्त आपल्या ओल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहिलं . ‘मला ना तुझ्या पायाचे हे ठसे बुजवायचे नाहीत! 'ये ना यार’ 'हो, येते! अन ती त्याच्या पायाच्या ठश्यावर पाय देत चालू लागली . तिच्या पायांना जणू स्वर्गसुख लाभत होत , तिला त्याच्या पायाचे ठसे तोडायचे नव्हते ! अन ती शेवटी त्याच्याजवळ पोहोचली . ‘बघ, जात वेगळी असली तरी आपण असंच एकत्र राहू - अन तिच्या डोळ्यात एक हसू उमललं! क्षणातच , त्यांच्या पायाला मोठ्या लाटेचा झटका बसला !

शतशब्दकथा स्पर्धा: २०१७: पाउलखुणा

लेखक श्वेता व्यास यांनी सोमवार, 30/01/2017 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
aa तू गेल्यावर रोज येते मी ठरलेल्या ठिकाणी. आपल्यातली अंतरं विसरून जाते! समोर दिसतं ते सगळंच भव्य! अथांग समुद्र, नजरेत न सामावणारं क्षितिज, अस्ताला जाऊनही अफाट रक्तिमा पसरवणारा सूर्य, बेभान सुटणारा वारा! या सगळ्यापुढे आपण कोण य:किंश्चित प्राणी? पण तुझ्यात सगळं झुगारण्याची हिंमत नाही, कळून चुकलंय मला! रोज पाहते तू गेल्यावर मागे उरलेल्या पाऊलखुणा.

शतशब्दकथा स्पर्धा-२०१७: ती आणि द्वारकाधीश

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 30/01/2017 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
aa तो निघाला आणि 'ती' वेडीपीशी झाली. तिने आतुर नजरेने त्याच्या नेत्रात स्वतःला गुंतवले. पण तो बधला नाही; तेव्हा मात्र ती शांतपणे म्हणाली,"जातोस? जा! तुला अडवणार नाही. हे अर्थहीन... प्राणहीन....जीवन तुझ्या आठवणींवर कंठेन आणि तुझ्यातच विलीन होईन. मात्र तुला मी आठवेन..मग मात्र......" तिने त्याच्याकडे पाठ केली. यमुनेच्या काळ्या मऊशार वाळूतून तिची सुकुमार पावलं आपली ओळख उमटवत राहिली...... द्वारका वसली आणि तो विसावला.