Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: भेट समुद्रावरची

लेखक अंतु बर्वा यांनी शुक्रवार, 03/02/2017 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
aa खडकापाशी तो उदास बसला होता. इथेच ती महिन्याभरापुर्वी भेटली होती. तीनं जग पहिलेल नव्हतं पण गप्पांना अंत नव्हता, तासनतास बोलायचे दोघं. आमच्याकडे असं तुमच्याकडे कसं? प्रश्नांवर प्रश्न. तो म्हणायचा, चल माझ्याबरोबर. माझं जग आवडेल तुला. शेवटी कुणाला कळु द्यायचं नाही या अटीवर राजी झाली. पण गोष्टी लपत थोडीच असतात? कळलच शेवटी जगाला आणि तिलाही कळलं, सर्वच माणसं त्याच्यासारखी चांगली नसतात. असा परिकथेतला प्रकार लांबुनच पाहिल तो माणुस कसला?

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अपुर्ण इच्छा

लेखक वरुण मोहिते यांनी शुक्रवार, 03/02/2017 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaa आज जरा खुशीतच होतो.अनेक वर्षांनी माझी इच्छा पूर्ण होईल असे वाटत होते.माझ्या देशात नोटबंदी जाहीर झाली तेव्हापासून एकच विचार होता ह्या नवीन नोटांवरून तरी माझी प्रतिमा हटवावी. जितकी मानहानी माझी हयातीत झाली नाही तितकी मानहानी ह्या नोटांवरील प्रतिमेने केली. माझी मूल्य पायदळी तुडवली. काय काय पाहावं लागलं मला त्याआडून. हे जास्त क्लेशकारक आहे . तसही मी राष्ट्रदोही गुन्हेगार आहे तुमच्यासाठी . मला ह्या जबाबदारीतून मुक्त करा .

पळवाट - भाग १

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 03/02/2017 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
"अजून कशी आली नाही हो? जरा कोपऱ्यापर्यंत येता का जाऊन?" झोप लागल्याचं उगीच नाटक करणाऱ्या तात्यांना काकूंनी जरा घाबरतच विचारलं. "आता काय लहान आहे का ती? तीच तीला कळायला नको?" डोळे उघडून काकूंकडे पाहण्याचे कष्टही न घेता तात्या करवादले. "तरुण पोर आहे, माझ्या जीवाला घोर लागलाय फोन आल्यापासून.. कुठं काही बरंवाईट झालं तर कुणाला विचारता?" काकूंनी रडवेल्या सुरात विनवणी केली पण तात्यांवर काही परिणाम झाला नाही. दार उघडून काकू अंगणात चुळबुळ करीत उभ्या राहिल्या.

शेजाऱ्याचा डामाडुमा- सुगौली तह आणि सत्तेचा बदलता सारीपाट - नेपाळ भाग ५

लेखक अनिंद्य यांनी शुक्रवार, 03/02/2017 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
=========================================================================== शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४... नेपाळ-०५... नेपाळ-०६...

भेळ पुराण

लेखक सौरभ पारखे यांनी शुक्रवार, 03/02/2017 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
भेळ पुराण ... मुरमुरे ,त्यात चुरलेल्या शेवपुरीच्या कडक पुऱ्या आणि बारीक शेव त्यावर लाल तिखट आणि खजुराची चटणी एव्हडेच घालून मुंबईची भेळ तयार होते ..पण चविष्ट असते (च असे नाही पण ;) ) पुण्यातली भेळ मात्र साग्रसंगीत मुरमुरे ,पापडी .भावनागरी ,एक नंबर शेव ,पापडी ,गाठी शेव , खारेदाणे, तिखट बुंदी ,मिरीचीचा ठेचा ,काळे मीठ, चिंच खजुराची चटणी वर कांदा टोमाटो हे सगळे मिश्रण एका स्टीलच्या पातेल्यात मोठ्या चमच्याने एकजीव केले जाते आणि त्यावर पुन्हा भुरभूरलेली बारीक शेव,कोथिंबीर आणि कांदा...

वर्ल्डकप क्लासिक्स - १९७९ - फायनल - वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 03/02/2017 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
२३ जून १९७९ लॉर्डस्, लंडन ऐतिहासिक लॉर्डसच्या मैदानातच १९७५ च्या पहिल्या वर्ल्डकपप्रमाणे दुसर्‍या वर्ल्डकपचीही फायनल रंगणार होती. पहिल्या वर्ल्डकपच्या विजेत्या क्लाईव्ह लॉईडच्या वेस्ट इंडीयन संघ दुसर्‍या वर्ल्डकपच्याही फायनलमध्ये येऊन धडकला होता. लॉईडच्या संघात स्वतः लॉईड, गॉर्डन ग्रिनिज, डेसमंड हेन्स, व्हिव्हियन रिचर्डस्, अल्विन कालिचरण असे बॅट्समन होते.

(वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 03/02/2017 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
विशाल भौंची नेहेमीप्रमाणेच सुरेख गजल वाचली 'वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने' आणि आमच्या काही वंचनांचा बांध फुटला!
काव्यरस

लढाई इंग्रजीशी

लेखक यश पालकर यांनी शुक्रवार, 03/02/2017 04:57 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकदा इंग्लिश सुधारण्यासाठी काय करावं हा प्रश्न विचारला जातो. ह्याचा अर्थ इंग्लिश येत नाही असा नसतो ,आजकाल खूप साऱ्या लोकांना इंग्लिश लिहिता वाचता येत असत पण अडचण येते ती इंग्लिश बोलताना . काही प्रोफेशनल लोक सुद्धा त्यांच्या कामाच्या बाबतीत इंग्लिश बोलतात पण त्यांना सुद्धा दैनंदिन व्यवहारातील इंग्लिश बोलताना खूप अडचण येते . ह्याची दोन कारणे आहेत एक म्हणजे शब्द संग्रहाची कमी आणि रोजचा सवय नसणे . दोन्ही गोष्टी सहज साध्य करता येण्यासारख्या आहेत. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी वाचन करणे आणि अडलेला शब्दाचा अर्थ समजावून घेणे गरजेचे आहे.

गन्धाल्पबलरागीयम् | Gandalf and the Balrog.

लेखक बॅटमॅन यांनी शुक्रवार, 03/02/2017 02:23 या दिवशी प्रकाशित केले.
लॉर्ड ऑफ द रिंग्स पिच्चरची जी ट्रिलजी आहे त्यातील पहिला भाग. प्रसंग तोच आपला नेहमीचा: बुढ्ढा गँडाल्फ आणि समोर तो महाकाय बॅलरॉग. बुढ्ढ्याचे काय होणार या विवंचनेतच सगळे होते. पुढे काय झाले? काही शब्दार्थ अगोदरच दिलेले बरे. गंधाल्प- गँडाल्फ. सगळीकडे फिरूनही स्वतःच्या अफाट ताकदीचा परिचय न दिल्यामुळे अल्प आहे ज्याचा गंध असा तो. बलराग- बॅलरॉग. वामन- बुटका अर्थात ड्वार्फ. अनल्प - एल्फ.
काव्यरस

(२) अकाउंट्स कसे लिहावेत ( अकाउंट बुक्स आणि एन्ट्रीज )

लेखक कंजूस यांनी गुरुवार, 02/02/2017 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
२) अकाउंट्स कसे लिहावेत ( बुक्स आणि एन्ट्रीज ) मागच्या (१) अकाउंट्स ( सुरुवात आणि तयारी ) लेखामध्ये अकाउंट्सची जुजबी माहिती घेतली. आता त्यासाठी लागणारी बुक्स आणि त्यात नोंदी कशा करायच्या ते शिकुया. अकाउंट्स लिहिण्यासाठी लागणारी बुक्स आणि त्यांचे रुलिंग ( आखणी )- १ ) जर्नल अथवा नोंदवही यांमध्ये नोंदी करून रिसिट्स "सोर्स डॅाक्युमेंट रेकॅार्डस" फाइलमध्ये ठेवणार आहोत. एका मोठ्या वहीत पानावर उजवीकडे क्रेडिट,डेबिट रक्कम लिहिण्यासाठी दोन कॅालम, एक छोटा L.F.