उल्फत
रस्ता काळोखाचा. मध्यरात्रीचा. रिकामा भयाण भेसूर.
कानात इयरफोन. सुपरबास. पाठीवर सॅक आणि बोचरी थंडी.
हे वातावरण किती गूढ आहे. मला नेहमी वाटायचं, एखाद्या झाडामागे एखादं भूत आपली वाट बघत थांबलं असेल तर..
पावले झपाझप. शक्यतो मी झाडाकडे बघतंच नाही. शहरातला हा भाग एखाद्या स्मशानासारखा शांत आहे. फार दूरवर उंच इमारती रात्रभर चकाकत राहतात. हा रस्ताही चकाकतोय. पण माणूस इथं औषधाला नाही.
उड्डाणपुलाखालून जाणारा खुश्कीचा मार्ग मी नेहमी स्विकारतो. पण फक्त दिवसा. झोपडपट्टीतून जाऊन रेल्वेरुळ ओलांडायचा, मग छोट्याश्या पायवाटेवरुन झाडंझुडपे तुडवत बसस्टॉप गाठायचा.
मिसळपाव

धनुष्कोडीचा नयनमनोहर समुद्रसंंगम आणि रामसेतूचंं दर्शन फार प्रसिद्ध. ते अनुभवण्यासाठी दोघेजण उत्साहात रामेश्वरला बसमध्ये बसले. बस थांंबली. समोर समुद्र आणि अफाट वाळू. त्या वाळूतून शेवटपर्यंंत नेण्यासाठी खास गाड्या उभ्या होत्या. अवाजवी भाव व अडवणूक खटकल्यानं त्या गाड्यांंनी जायला अजिबात मन होईना. दुसर्या बाजूला इथेपर्यंंत येऊनही धनुष्कोडी पहाण्याचंं नीलसुंंदर स्वप्न अपुरंं रहाणंं पण रुचेना.!!
तिच्या बोलक्या चेहेर्यावर सगळंंसगळंं लिहिलेलंं होतंं.
घरात तीन हजाराच्या आसपास कॅश असेल,खरेदीसाठी राजेश, तेजसकडे उधारी करता येईल. माझ्याकडे आणि हिच्याकडे कार्डस तर आहेतच, त्यावरचे पॉईंटस बघून घ्यायला हवेत.
माझ्या मनातली आर्थिक गणिते अव्याहतपणे चालूच होती.
"डॅडा"
माझ्या छकूलीच्या आवाजाने मी एकदम भानावर आलो.
"या नोटा कॅन्सल झाल्याने किती छान झालयं ना ? "
नोटबंदीचा या छोट्याश्या मुलीवर कसा काय परिणाम झाला असेल?