Skip to main content

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ५१

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 02/02/2017 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः- वर्षभरापेक्षा जास्त कालावधी नंतर आज ह्या लेखमालेच्या पुढच्या भागाच्या लेखनाचा मुहुर्त लागला आहे . त्यामुळे अगदी नवीन वाचणार्‍यांना सगळे संदर्भ लागतीलच असे नाही.यासाठी क्षमस्व.परंतू सदर भागापासून या लेखमालेनीही मनातल्या मनात थोडा सांधेबदल केलेला आहे.त्यामुळे हे लेखन मागील संदर्भांशिवायंही सर्ववाचकांना आवडेल अशी आशा धरून पुनः एकवार सुरवात करतो आहे. चुकभूल द्यावी घ्यावी.

देवा तुला नक्की काय करायचं होतं ?

लेखक अभिषेक पांचाळ यांनी गुरुवार, 02/02/2017 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
भल्यामोठया तंट्यातून , तू जन्म मला दिला अगदी थोड्या क्षणात , तू पोरका याला केला आधार देतो म्हणून , तू थोडा पुढे आला पुढे येऊन माझा , आधारच घेऊन गेला तेव्हाच माझ्या मनी , एक कोडं उभं होतं देवा तुला नक्की काय करायचं होतं ? सुख म्हणून दिलस , ते झोळीत नाही पडलं किती सांगू तुला , नेमकं काय काय घडलं साठवण्या ते सुख , तू झोळी मला दिली माझंच नशीब खोटं , ती ही फाटकी निघाली सुख म्हणून नक्की , तुला काय द्यायचं होतं ? देवा तुला नक्की काय करायचं होतं ? वाटलं होतं चालतोय ती वाट आहे न्यारी अजून सुद्धा चालताना , ती काटेच फेकून मारी होईल पुढे काही , अशी आशाच गायब झालीय त्याच वाटेने माझी , हालत अशी केलीय
काव्यरस

रायरेश्वर आणि केंजळगड

लेखक पाटीलभाऊ यांनी गुरुवार, 02/02/2017 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
हा आठवडा जरा जास्तच वाईट जातोय...प्रचंड काम आणि त्यातही मॅनेजरकडून खाल्लेल्या शिव्या(नेहमीचंच झालं आहे म्हणा हे...) यामुळे डोकं जरा जास्तच सटकलं होतं. तेव्हाच मनात आलं कि या वीकांताला कुठेतरी ट्रेक झालाच पाहिजे. पुरंदर, रोहिडा, रायरेश्वर, केंजळगड, तिकोना असे नानाविध पर्याय समोर उठे राहिले. पण नक्की काय ते ठरत नव्हतं. आणि त्यात कोणीही मित्र ट्रेकसाठी तयार होतं नव्हता...! प्रत्येकाकडे आपापली कारणे तयार होतीच. :( शुक्रवार आला आणि गेला पण...मी एकटाच उरलो होतो...!

पुणे-मुंबई-पुणे - एक पुनर्नवानुभव

लेखक तिमा यांनी गुरुवार, 02/02/2017 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
फारा वर्षांपूर्वी आम्ही मुंबई पुणे रेल्वे प्रवास सातत्याने करायचो. ३ तासांच्या डेक्कन क्वीन प्रवासासाठी, दोन तास रिझर्व्हेशनच्या रांगेत उभे रहाण्याचाही आम्ही विक्रम नोंदवला आहे. त्या रिझर्व्हेशन केलेल्या डब्यांत तीन्-दोन अशी बसण्याची व्यवस्था असल्याने , आम्ही सेकंड क्लासमधेही , अगदी मांडी घालून प्रवास केलेला आहे. पुढे, रेल्वेला भिकेचे डोहाळे लागल्याने, त्यांनी आमचा विश्वासघात करुन तीन्-तीन अशी बसण्याची व्यवस्था आणली. त्याचा आम्ही भरपूर निषेध केला. कारण तोपर्यंत आमची बुडे भरपूर रुंदावल्यामुळे, आमची, अंगाला अंग लागू न देण्याची ब्रिटिश सभ्यता धोक्यांत आली.

वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 02/02/2017 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
शोधतो मौनात कविता, वाहणे आता नव्याने मूळ अस्तित्वास फिरुनी शोधणे आता नव्याने कोणत्या त्या राऊळी वसतो हरी सांगा गड्यांनो माणसांच्या अंतरी डोकावणे आता नव्याने भूक, तृष्णा, वासनाही वाटती कां क्षुद्र आता? अस्मितेला मृगजळी धुंडाळणे आता नव्याने तू मला गोंजारणेही सोडले आहे अताशा वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने माणसांना शोधतो मी श्वापदांची कोण गर्दी लष्कराच्या भाकरी बघ भाजणे आता नव्याने मोल भक्तीला न उरले, 'जा'च तू येवू नको रे विघ्नहर्त्या हात जोडुन मागणे आता नव्याने विशाल कुलकर्णी
काव्यरस

वर्ल्डकप क्लासिक्स - १९७९ - सेमीफायनल - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 02/02/2017 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
२० जून १९७९ ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर लँकेशायरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात वर्ल्डकपचे यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली सेमी फायनल रंगणार होती. मार्क बर्जेसचा न्यूझीलंड संघ कोणाचीही अपेक्षा नसताना सेमी फायनलला पोहोचला होता. बर्जेसच्या संघात स्वतः बर्जेस, जॉन राईट, ब्रूस एडगर, जेफ हॉवर्थ आणि अनुभवी ग्लेन टर्नर असे बॅट्समन होतेच, शिवाय जेरेमी कोनीसारखा हरहुन्नरी ऑलराऊंडरही होता. बॉलिंगची मदार मुख्यतः रिचर्ड हॅडलीवर होती. त्याच्या जोडीला गॅरी ट्रप, ब्रायन मॅकेंझी आणि लान्स केर्न्स असे बॉलर्स होते.

"पॅलेस ऑन व्हील्स "

लेखक पदकि यांनी गुरुवार, 02/02/2017 04:57 या दिवशी प्रकाशित केले.
तीन कोटी टिऱ्या* / आभाळ देखती नाके ती टेकती/ धरतीला फाटलेली चड्डी/ शर्ट असे, नसे लढावे ते कसे/ हिवाळ्याशी हातातले त्यांच्या / गंजके खुरपे झपाझप कापे/ गवताला डोक्यावर त्यांच्या /नसे ते छप्पर फुटके खप्पर / आईबाप शाळेमाजी त्यांना/ नसे ते शिक्षण "रात्रीला भक्षण / काय करू?" वाढदिवसाचे / फुगलेले फुगे रंगीत नी झगे / कोठून ते तीन कोटी पोरे/शेतांत राबती भयाण सोबती/ दारिद्र्य ते दुख्खाचीच कढी /दुख्खाचाचि भात जेवोनिया तृप्त / कोणी नसे मधूनच जाई / नवी आगगाडी शहरची जाडी/ पोरेबाळे हाती त्या सर्वांच्या / थंड कोकाकोला ऑर्डरही केला / पिझ्झा मस्त दोन्ही बाजूंमध्ये / नसे तो संवाद आपुलाचि
काव्यरस

प्रणय रात्र

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 01/02/2017 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
अधरावरल्या दंतव्रणावर जिभ ह्ळुवार फिरली प्रणय रात्र ति आठविता, गात्रे पुन्हा मोहरली * धुंद सारे शब्द होते..कामधुंद त्या भावना बहर प्रीतिचा मनि, अन मदन दाह सोसवेना प्रणयाची लाट ओसरे,पण सय अजुन राहीलि ति प्रणय रात्र आठविता,गात्रे पुन्हा मोहोरेली * घेतले मिठीत तु अन कामगंध उधळले मिसळता श्वासांत श्वास, गंध उन्माद्क परीमळे. प्राशिता मकरंद अधराचा, खुण मागे ठेवली ति प्रणय रात्र आठविता,गात्रे पुन्हा मोहोरेली * पुनवेच्या चांदण्यात सारी ,ति मधुरात्र डुंबली प्रणय खेळ खेळता ,रात्र सारी जागवली उन्मादक तृप्त तनु, काम रसानें माखली ति प्रणय रात्र आठविता,गात्रे पुन्हा मोहोरेली *

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: दृष्टीकोन

लेखक मिडास यांनी बुधवार, 01/02/2017 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
a नवी मुंबईचं खारघर रेल्वे स्टेशन. मी रात्री मुंबईला जाणाऱ्या गाडीची वाट बघत होतो. स्टेशन वर त्यामानाने गर्दी नव्हती. इतक्यात समोरच्या प्लॅटफ़ॉर्मवर एक तरुण एका दहा - बारा वर्षाच्या मुलाला मानगुटीला धरून चालताना दिसला. मुलाच्या एकंदर अवतारावरून तो भिकारी दिसत होता. तो तरुण त्या मुलाला रेल्वे पोलिसांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. आत जाऊन त्याने दरवाजा ओढून घेतला. क्षणभर मी चरकलो. तळव्यांना घाम फुटायला लागला.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: सागरकिनारे

लेखक रातराणी यांनी बुधवार, 01/02/2017 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
aa "अगं पण का? माझं काय चुकलंय?" "अरे तुझं नाही काहीच चुकलेलं, पण मी शब्द दिलाय त्याला.." "तुझ्यासाठी सगळ्यांनी सरप्राईज पार्टी अरेंज केलीये... आजतरी नको जाऊस..." "त्यांच्यासाठीच थांबले होते इतकी वर्ष, फक्त एक वाढदिवस मला माझ्या मनाप्रमाणे सेलिब्रेट करू दे..प्लीज" सागरकिनारे...