Skip to main content

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९२ - सेमीफायनल - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रीका

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 16/02/2017 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
२२ मार्च १९९२ एससीजी, सिडनी न्यू साऊथ वेल्समधल्या सिडनीच्या ऐतिहासिक मैदानात गेल्या वर्ल्डकपमधले उपविजेते इंग्लंड आणि अपार्थाईड व्यवस्था मोडीत निघाल्यावर वर्षाभरापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेली दक्षिण आफ्रीका यांच्यात वर्ल्डकपची दुसरी सेमीफायनल रंगणार होती. या मॅचमधील विजेत्या संघाची मेलबोर्नच्या मैदानावर फायनलमध्ये गाठ पडणार होती पाकिस्तानशी! ग्रॅहॅम गूचच्या इंग्लिश संघात स्वतः गूच, अनुभवी अ‍ॅलन लॅम्ब, ग्रॅहॅम हिक, नील फेअरब्रदर, अ‍ॅलेक स्ट्युअर्ट असे बॅट्समन होते. इंग्लंडच्या बॉलिंगचा भार मुख्यतः अनुभवी फिलिप डिफ्रीटार, ग्लॅडस्टन स्मॉल, रिचर्ड इलिंगवर्थ यांच्यावर होता.

!!! ....सभा "Social Networking " ची.... !!!

लेखक बटाटा चिवडा यांनी बुधवार, 15/02/2017 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
भरली होती एकदा 'Social Networking' ची सभा Twitter होता मध्यस्थानी, Facebook सोबत उभा.. चढ़ाओढ़ होती लागली, कोण Social Networking चा राजा Google Plus आणि Ibibo करत होते प्रसिद्धीसाठी गाजा - वाजा.. Orkut म्हणाले Facebook ला , तुझ्यामुळे गेली माझी खुर्ची Facebook च्या आगमनाने Orkut ला भलतीच लागली होती मिरची.. Linked IN म्हणाले आहे मी 'Professional', मलाच करा 'King' सगळे म्हणाले, "Timepass" की बात करो तो "LINKED IN is Nothing " .. Whatsapp म्हणाले गर्वाने, करतात मला सगळे Like काय माहित,देव जाणे, रूसून कोपऱ्यात का बसले Hike.. या सर्व गदारोळात.. Myspace, PerfSpot, BigAdda ओरडत होते 'आम्ही पण आह

धोडपचे धाडस - सोलो ट्रेक

लेखक भटक्या चिनु यांनी बुधवार, 15/02/2017 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून काही जण गोंधळतील तर काहींचा विश्वास बसणार नाही. पण जे अनुभवलयं तेच इथे लिहीत आहे. सतरा वर्षांच्या ट्रेकींग प्रवासातील मी एकट्याने केलेला पहिलाच ट्रेक. एक वेडेपणाच.             नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात माझी पंढरीची वारी (परीक्षा) आटोपली होती. त्यानंतर आँफिसला रूजू होण्याची घाई नसल्याने खूप निवांत झालो होतो. आजच्या काळात नशिबाने मिळालेल्या अशा मोकळ्या वेळात वाचन पुन्हा सुरू केलं. पण यंदा चटक लागली ती e-sahityवरच्या 'भूतकथा, रहस्य, गूढकथा, तंत्र-मंत्र' ह्यांची. दिवसरात्र ती पुस्तक वाचवून संपवत होतो.

भाषेचे मूळ : चिंता आणि चिंतन

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/02/2017 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे जानेवारी-फेब्रुवारी (२००३) महिन्यात भाषेविषयीच्या राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रासाठी ‘अहिराणी भाषेचा प्रतिनिधी’ या नात्याने निमंत्रित म्हणून म्हैसूर येथील केंद्रीय भाषा संशोधन संस्थेत गेलो होतो. दिवसभर परिसंवादातील चर्चा आणि रात्री विविध नाटके पाहायला मिळत होती. नाटकांना जाताना भाषेची निवड हा भाग दुय्यम महत्त्वाचा होता.

रात्र…

लेखक चिनार यांनी बुधवार, 15/02/2017 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
दामूचं कायतरी बिनसलंय हे तिनं तो संध्याकाळी घरी आला तेंव्हाच ओळखलं होतं. एक दोनदा तिनं तसं विचारायचा प्रयत्नही केला पण दामूने दाद दिली नाही. जेवताना दामूचं लक्ष नव्हतं. आज कित्येक दिवसांनी तो पोरांवर डाफरला ही नव्हता. रात्री विचारू असं म्हणून ती शांतपणे तिची कामं करत होती. अर्थात रात्री दामू तिला विचारायला वेळ कधीच देत नव्हता. अश्या कितीतरी गोष्टही तिने रात्री बोलू,विचारू म्हणून मनातच दाबून ठेवल्या होत्या. रात्री दामू आपला 'कार्यभाग' साधेपर्यंत ती मनातल्या मनातच त्याच्याशी कितीतरी बोलून जायची. तोंड उघडलं तर आवाजाने पोरं उठतील अशी भीती तिला वाटायची.

गजलांकित प्रतिष्ठान

लेखक माहितगार यांनी बुधवार, 15/02/2017 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
जनार्दन केशव म्हात्रे आणि त्यांच्या गजलांकित प्रतिष्ठान बद्दल (आंतरजालावर स्वतंत्र स्रोतातून पुरेशी माहिती मिळत नसल्यामुळे माहितीची खात्री करुन हवी अथवा दुजोरा हवा आहे. गजलांकित प्रतिष्ठान https://mr.wikipedia.org/s/30r3 विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून गजलांकित प्रतिष्ठान ही महाराष्ट्रातील म

मोबियस प्रकरणे भाग -२ प्रकरणे ११-१२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 15/02/2017 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
त्याचे डोकेच काम करेनासे झाले होते. त्यातच पडलेल्या स्वप्नाने ते पुरते भंजाळून गेले. स्वप्नात तो एका खराट्याच्या काडीवर एका रस्त्यावरुन उडत चालला होता. एखादी स्कुटर चालवावी तशी. पण जशी त्याची नजर रस्त्यावरुन ढळली तसा तो धाडकन जमिनीवर आला. त्याच्या जवळचा रस्ता लाल होता तर दूरवर तो हिरव्या रंगाचा वाटत होता. त्या रंगसंगतीने तो गोंधळून गेला.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९२ - सेमीफायनल - न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 15/02/2017 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
२१ मार्च १९९२ ईडन पार्क, ऑकलंड न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडमधल्या ऑकलंडच्या ईडन पार्कवर यजमान न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल रंगणार होती. न्यूझीलंडच्या संघाने आपल्या ८ पैकी सात मॅचेस जिंकून सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. पहिल्या ७ मॅचेस जिंकल्यावर शेवटच्या एकमेव मॅचमध्ये न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला होता. अर्थात आधीच सेमीफायनल गाठलेली असल्याने न्यूझीलंडच्या दृष्टीने ही मॅच फारशी महत्वाची नव्हती. याउलट पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला होता तो पावसाच्या कृपेने! इंग्लंडविरुद्ध ७४ रन्समध्ये ऑलआऊट झाल्यानंतरही पावसामुळे ही मॅच वाहून गेली होती.

जनार्दन केशव म्हात्रे -व्यक्ति परिचय

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 14/02/2017 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
विकिपीडियाचे माध्यम गवसल्याच्या उत्साहात अनवधानाने काही विकिपीडियन्सकडून स्वतः बद्दल लेखन होत असते. ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेची निश्चिती असेल तर ते ठेवले जाते. मराठी भाषेत विवीध क्षेत्रातील व्यक्तींची दखल घेण्या जोग्या पुरेशा नोंदींच्या अभावी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता निश्चित करणे अवघड होते. किंवा सर्व व्यक्ति / विषय मराठी विकिपीडियनना परिचीत असतातच असे नाही. असाच एक लेख नवे मराठी विकिपीडियन जनार्दन केशव म्हात्रे यांच्या बद्दल लिहिला गेला आहे. ज्ञानकोशीय उल्लेखनीय पुरेसा मजकुर स्वतंत्र स्रोतातून दुजोरा मिळे पर्यंत ती माहिती दुजोरा मिळवण्यासाठी मिसळपाव डॉट कॉमवर स्थानांतरीत करीत आहे.