Skip to main content

मराठी भाषा दिन २०१७: वोवळां (अंत्रुज कोंकणी)

लेखक प्रीत-मोहर यांनी गुरुवार, 23/02/2017 06:29 या दिवशी प्रकाशित केले.
1 आमकां गोंयकारांक फुलांचे-झाडांचें- परमळाचें खूब पिशें. आमी जगांत खंयय वचून रावूं, आंगणात चार तरी परमाळिक फुलांकंद, तुळस बी रोयतातच. आनिक एक म्हळ्यार वास नासलेली पिशी आनी रतन आबोलेचेय ४ तरी रोपे जायच. हाका हांव कशें फंट थारायतलें? म्हाकांय सुगंधाचें खूब्ब पिशें. ह्या पिश्याचे मूळ म्हजे गांव, घर आनी घरची मनशां. आमचो (कुळारचो) गांव म्हळ्यार सह्याद्रीच्या पायांसामकारांतलो एक माणकुलो गांव. गांवाच्या एका कोनश्याक आमचे घर. लागी-लागसराक सगले रान, एकुय घर ना. सैमाचें एक वेगळेंच रूप आमका पळवपाक मेळटा.

मराठी भाषा दिन २०१७: जागृत (बाणकोटी)

लेखक सूड यांनी गुरुवार, 23/02/2017 06:26 या दिवशी प्रकाशित केले.
1 जागृत तं झाला काय, सगलीकडना काय बायशा बातम्या येईत. आज ह्या गावातला पोर पलवून बाटवलीन, उद्या त्या गावातल्या ल्येकीबालीला उचलून न्हेलीन. सगल्या गावात निस्ता भय, कंदी काय व्हयल त्याजा पत्त्या नाय. येका येलं त्या घुआगरातनं का कायशी बातमी आली, का म्हनं समुंद्रावरना लोका येईत आनि रोज नंदर ठेवीत, यकांदी बरी दिसनारी पोर न्हेईत आनि लांब दर्यात फेकून देईत. वान्या-बामनाच्या पोरी दिसाय कशा आप्सरंसार्‍या!! सगल्या भितीन् गारटून गेलंल्या. येकदोगीनी होरंत उडी मारलंनी.

मराठी भाषा दिन २०१७: जिता असल्याचा दाखला (वर्‍हाडी)

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 23/02/2017 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
1 जिता असल्याचा दाखला लय जुनी नाही, आता आताचीच गोष्ट हाय, २०४७ सालातली. देशाले स्वातंत्र भेटून शंभर वर्षे झाले. या शंभर वर्षात जमाना बदलला. आजकाल जेथ तेथ अंगूठा लावा लागते. बँकेतून पैसे काढाचे हाय - लावा अंगूठा, मत टाकाच हाय - लावा अंगूठा, कंट्रोलच सामान उचलाच हाय - लावा अंगूठा. मोठाला साहेब असू द्या नाहीतर गावातला पोट्टाबाट्टा असू द्या, अंगूठा लावण्यापासून कोणी सुटला नाही. बंदे अंगूठाछाप झालेत. माणसाहून अंगूठ्याचच महत्त्व वाढलं, म्हणूनच तर अंगूठ्याले लय जपा लागते. जमानाच तसा खराब हाय.

पाऊस असा रडतो

लेखक चांदणशेला यांनी बुधवार, 22/02/2017 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
पापण्यांच्या दाराशी हाक येती जीवास जखमांचे रंग फुटती घन वेदनांतूनी पाऊस असा रडतो दूर दूर वारा टाहो फोडतो उरात क्षितिजाच्या वैषम्य पेटले वैरी वादळ डोळ्यांत आले आगीत बुडाला प्राण वेडापिसा राऊऴातला नाद अस्त झाला कसा

मराठी भाषा दिन २०१७: अनुक्रमणिका

लेखक संपादक मंडळ यांनी बुधवार, 22/02/2017 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
1

अनुक्रमणिका

१) भाषा आणि बोली

लेखक: अमोल४५७२ (भाषा व बोली परस्पर संबंध याबद्दल लेख)
पूर्वी आदिमानव अप्रगत होता, त्या काळात हातवारे, खुणा करून त्याचं मनोगत व्यक्त करत असे. नंतरच्या काळात तो जसजसा प्रगत होत गेला, शेती करू लागला, गटागटाने राहू लागला, तसतसा हातवारे व खाणाखुणा यापेक्षाही जास्त तोंडाने विविध आवाज काढून व्यक्त होऊ लागला.

तमिझ्(तमिळ)शिकण्यासाठी

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 22/02/2017 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
तमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक! सर्वात शुध्द द्रविड भाषा! म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड! कामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते. अशा तमिळ शिकणार्‍यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत. पुस्तके,टिव्ही,इंटरनेट याद्वारे तमिळ शिकणारे काहीजण इथे एकत्र येत आहेत.प्रत्येकाची याबाबत प्रगती निरनिराळी!

मोबियस प्रकरणे भाग -२ : प्रकरणे १७-१८

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 22/02/2017 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
दरवाजाची चौकट एकदम अस्पष्ट झाली व तरंगत कुठेशी नाहीशी झाली. चंद्र...चंद्राचा रोगट प्रकाश... त्याचे डोळे त्या प्रकाशाला सरावताच त्या विवराचा तळ एखाद्या चमकदार पाण्यासारखा चमकू लागला. जणू काही त्या पाण्याला नवी पालवीच फुटली आहे.
मोबियस १७ तेवढ्यात विवराच्या कडेला पंख फडकताना जसा आवाज येतो तसा आवाज झाला.

आईसक्रीम

लेखक तिमा यांनी बुधवार, 22/02/2017 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
‘टबुडी टबुडी’ चाच (http://www.misalpav.com/node/26051) हा पुढचा भाग आहे असे समजावे, म्हणजे पुन्हा सर्व पात्रांची ओळख करुन द्यायची आवश्यकता नाही. तो वेडा जागा सोडून गेल्यावर तिथे दुसरे एक श्रीमंत गुजराती कुटुंब रहायला आले. त्यांचा बहारिनला मोठा धंदा होता. कुटुंब मोठे, मुख्य मोटाभाई म्हणजे आसुभाई, दोन तीन महिन्यांनी कधी एखादा आठवडा घरी यायचे. त्यांचे धाकटे भाऊ, नवीन आणि खिमन, मुंबईतला बिझिनेस सांभाळायचे. एक बहीण, बायको आणि दोन मुली आणि तीन मुले, शिवाय एक म्हातारी दमेकरी आई.

कदाचित (भयगुढ कविता)

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी बुधवार, 22/02/2017 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
कदाचित ही फक्त हवा असेल जी चाल करून येतीये विव्हळणाऱ्या जीर्ण फांद्यांना खिडक्यांवर फटकारतीये कदाचित हा फक्त पाऊस असेल जो ढगांना प्रसवतोय दाराछतातून टपटपून अंगावर बर्फशहारे आणतोय कदाचित ह्या फक्त सावल्या असतील ज्या श्वापदांसारख्या दिसताहेत सराईत शिकाऱ्यासारख्या मला चारीबाजूंनी घेरताहेत कदाचित हा फक्त कावळा असेल जो आत्ताच खिडकीवर धडकलाय रक्ताळलेली चोच आदळून काचांना तडे देत सुटलाय कदाचित हा फक्त भास असेल कुणीतरी जोरात किंचाळल्याचा आपोआप दिवे विझल्याचा अन मानेवरच्या उष्णगार श्वासांचा कदाचित भासच असेल हा कदाचित स्वप्न असेल कदाचित... ती आली असेल -------------------

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९९ - सुपर सिक्स - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रीका

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 22/02/2017 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
१३ जून १९९९ हेडींग्ली, लीड्स यॉर्कशायर काऊंटीचं माहेरघर असलेल्या हेडींग्लीच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात सुपर सिक्समधली शेवटची मॅच रंगणार होती. ऑस्ट्रेलियाच्या दॄष्टीने ही मॅच अत्यंत महत्वाची होती. सेमीफायनल गाठण्यासाठी ही मॅच जिंकणं अत्यावश्यक होतं. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रीका आणि पाकिस्तान यांनी आधीच सेमीफायनलम गाठली होती. पण या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्यास न्यूझीलंडविरुद्धची मॅच पावसात वाहून गेल्यामुळे एक पॉईंट मिळालेल्या झिंबाब्वेला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळाला असता!