पौगंडावस्थेतील मुला-मुलींच प्रेम
'पौगंडावस्थेतील मुला-मुलींच प्रेम' हा आई-बाबांसाठी काळजीचा विषय. मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडलेत हे कळल्यानंतर, 'हे वय आहे का प्रेम करण्याचं?' ह्या वाक्यापासून सुरुवात होते. प्रेमावर मग बंधनं घातली जातात. 'पुन्हा त्याला भेटलीस तर बघ', अशा धमक्या दिल्या जातात. प्रेमात पडण, अफेअर असणं म्हणजे वाया जाणं, असा समज असतो. म्हणूनच मुलांच्या प्रेमात पडण्याने आई-बाबा हवालदिल होतात.
आपली मुलगी किंवा आपला मुलगा चुकीच्या माणसाच्या प्रेमात वाहवत जाऊ नये, ह्याची काळजी वाटणं ती घेणं पालक म्हणून खूप गरजेचं असतं. पण त्रागा हा त्यावर उपाय नाही.
मिसळपाव
रणखांबे मास्तर लईच दार्शनिक.
परीक्षेत दुसऱ्याचं बगून ल्हिवायचो तर म्हनायचा '' तू लेका बांडगूळच रहाणार आयुष्यभर ''
लई राग याचा तवा .
धाव्वी काय लाभली नाय - आलो पुन्यात .
वळखीतनं युवराजदादाला भेटलो , पुढारी माणूस, कामबी मिळालं .
यका खबदाडीत झेरॉक्स मशीन टाकून दिली.
आकडा टाकून कनेक्शनबी दिलं.
फिप्टी - फिप्टीला आपल्या बाचं काय जातंय ?
दिपवाळी झाली.
मावळतीची किरणे चहूकडे सोनं उधळीत होती,
ते सोनेरी लेणं लेऊन लाटाही चमचमत होत्या,
फेसाळत्या लाटांच्या गाजेने आसमंतास एक गूढगंभीर साज चढवला होता.
तिला समुद्र आवडतो, मनापासून..
त्याला माहित होतं, म्हणून तो तिला इथे घेऊन आला होता,
जिथे होते फक्त ते दोघे, समुद्र, आणि साक्षीला सांजवेळ..
तिच्याकडे बघून मंद स्मित करत त्याने तिचा हात हाती घेतला," खुश ना?"
तिचा चेहरा उतरला," किती कमनशिबी आहे मी,
समोर अथांग समुद्र..
खांद्यावर पर्स, हातात छत्री, डबा, गळ्यात मंगळसूत्र आणि ओढणी सांभाळत स्टॉपपासून पन्नास मीटर लांब जाऊन थांबलेल्या बसमध्ये चिखलातून वाट काढत गर्दीतून स्वतःला आत घुसवलं.
खिडकी नीट बंद होत नसल्यामुळे काल पावसाचं पाणी आत आलं होतं, त्यामुळे आज आयलकडच्या सीटवर जागा मिळाली, बरंच वाटलं.
'मॅनेजरला काय उशीरापर्यंत मीटींग ठेवायला? चापेल घरी जाऊन आयतं.'
कॉलेजकन्यकांचा घोळका खिदळत बसमध्ये शिरला.
"शाळेत अतिरेकी लपल्याची खबर मिळाल्यामुळे आम्ही क्षेपणास्त्र डागलं. अतिरेकी मेले पण शाळेची इमारत कोसळली आणि तुमच्या यजमानांना आणि काही विद्यार्थिनींना हकनाक प्राण गमवावे लागले. पण तुम्ही या दुःखात अडकून न पडता निर्वासितांच्या छावणीत शाळा पुन्हा सुरु केलीत हे खरोखरच कौतुकास्पद आहे. काही मदत लागली तर सांगा", असं छापील बोलून तो ऑफिसर निघून गेला.
पण तिला मदतीची गरज नव्हती.