पुणे ते लेह (कारने)
नमस्कार मंडळी,
गेली ४ वर्षे प्लॅन केलेली आणी दरवेळी काहीतरी टिनपाट कारणाने बारगळलेली पुणे ते लेह लडाख ट्रिप ह्या वर्षी जून मध्ये करण्याचे ठरवले आहे. अंदाजे १ जूनला पुण्यातून निघायचे असा बेत आहे. (९९.९९% ह्या वेळी ट्रिप होईलच).
(मनाली वरून लेह गाठायचे आणी श्रीनगर वरून परत यायचे का उलट करायचे ह्याचा अजून निर्णय झालेला नाही)
ट्रिपच्या अनुषंगाने मोदक रावांना भेटून तसेच कारने ट्रिप केलेल्या एका व्यक्तीचा अनुभव वाचून प्राथमिक माहिती घेतली आहे. मोदक रावांच्या अनुभवानुसार जून हाच योग्य महिना आहे जायचा.
मिसळपाव
.
मना मामाना गावमा एक डाव असं घडनं. मी तवयं धाकला व्हतू.पन मना मामा , मना दोस्त व्हता. रातले, मी मामाना जोडे जपाले जाये. तवय मना मामा माले रोज गावमा काय काय घडनं, ते सम्दं सांगे. मामाले चावयानी भलती गोडी व्हती. मामीले आयकाना भलता कटाया व्हता. म्हनिसन माले गावमा काय काय भानगडी चालु शेतस त्या बठ्ठा समजे.
एक रोज मामा सांगत व्हता. त्या गावमां एक सुतार र्हाये. सुतार तसा कामले चांगला व्हता. लोकेस्मा मियि मिसळीसन र्हाये. काम कराले बी वाघ व्हता. सम्दा लोके त्याले 'सुतारदादा' म्हनीसनी हाक मारेत.