Skip to main content

जागतिक मराठी भाषा गौरव दिन २०१७: बोलीभाषा सप्ताह समारोप

लेखक पैसा यांनी मंगळवार, 28/02/2017 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
1 . नमस्कार मंडळी! आपल्या मिपावर जागतिक मातृभाषा दिनाला म्हणजे २१ फेब्रुवारीला बोलीभाषा सप्ताह या आपल्या मातृभाषेच्या उत्सवाची सुरुवात झाली. वटवृक्षाच्या पारंब्याप्रमाणे असलेल्या तिच्या अनेक बोली लेख, कविता, कथांच्या स्वरूपात आपल्यापुढे येत गेल्या. जागतिक मराठी दिनाला म्हणजे २७ फेब्रुवारीला या उत्सवाची सांगता होत आहे. समारोप म्हणवत नाही, कारण ही अखंड तेवावी अशी ज्योत आहे. मिपावर बोलीभाषा सप्ताहच करायचा असे का ठरले?

वर्ल्डकप क्लासिक्स - २००३ - दक्षिण आफ्रीका विरुद्ध श्रीलंका

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 28/02/2017 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
३ मार्च २००३ किंग्जमीड, दर्बन क्वा झुलू नाताल प्रांतातल्या दर्बानच्या किंग्जमीड मैदानावर यजमान दक्षिण आफ्रीका आणि श्रीलंका यांच्या पूल बी मधली मॅच होणार होती. दक्षिण आफ्रीकेच्या दृष्टीने ही मॅच अत्यंत महत्वाची होती. ग्रूपमधल्या पहिल्याच मॅचमध्ये वेस्ट इंडीजकडून पराभव पत्करावा लागलेल्या दक्षिण आफ्रीकेला नंतर न्यूझीलंडने पावसाने व्यत्यय आलेल्या मॅचमध्ये डकवर्थ - लुईस नियमाच्या आधारे हरवलं होतं.

मोबियस भाग -२ : प्रकरणे २३-२४

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 27/02/2017 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
...तो गुणगुणताना त्याच्या टीव्हीचा आवाज इतका मोठा करतो की ज्यांचे आयुष्यवस्त्र उसवले आहे त्यांचा आक्रोश त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. एक धागा सुखाचा शंभर धागे.... हे गाणे या जगात खितपत पडलेल्या मनुष्यजातीचे गाणे आहे....

असेही आहेत शिक्षक !

लेखक माहितगार यांनी सोमवार, 27/02/2017 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
जिल्हा परीषद प्राथमीक शाळा, लमाण तांडा, बेळंब मराठी भाषा दिवसाच्या निमीत्ताने मराठी विकिपीडियावर बरेच काही लेखन होत असते. सगळेच ज्ञानकोशीय परिघात बसणारे नसते. असाच एक अनुभव उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील लमाण तांडा, बेळंब येथील जिल्हा परिषद प्राथमीक शाळेच्या श्री.खोसे उमेश रघुनाथ ( सहशिक्षक ) यांनी शेअर केला आहे. खरेतर तो त्यांच्याच शब्दात वाचणे उत्तम राहीले असते, पण विकिपीडियावरील माहिती स्थानांतराबाबत झालेल्या नाराजीमुळे माझ्या स्वतःच्या शब्दात अंशतः तरी रुपांतरीत करण्या शिवाय पर्याय नाही. शिक्षक उमेश खोसे यांना 15 जून २००७ रोजी जि.पं.प्रा.शाळा लमाण तांडा बेळब ता.

कातरवेळी

लेखक चांदणशेला यांनी सोमवार, 27/02/2017 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
कातरवेऴी दिसे तुझा गाव जागला पुन्हा सांज केशरी भाव डोंगराआड मालवून गेला सूर्य हऴूवार करीतो त्यास एकांत अर्ध्य नजर तुडवीत काळोख फुटला अवकाशी लाल शुक्रतारा पेटला भय असे गात्रातूनी उठले अवेऴी दैवाने पाश जखडले
काव्यरस

आज मला समजलं

लेखक अभिषेक पांचाळ यांनी सोमवार, 27/02/2017 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
आई , ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं आठवणीच्या डोहामध्ये , मन पुरं भिजलं तहान भूक झोप सारं , क्षणात परकं होतं अनोळखी ते मोठं घर , गिळून मला खातं मनात माझ्या उत्तरांचं , काहुर एक माजलं आई, ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं गर्दी असते बाजूला , पण हाकेला तो ओ नसतो दूर जाऊन उमगलं , एकटेपणा काय असतो दूर जाऊन सहवासाच्या , किंमतीचं ते बीज रुजलं आई, ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं आवाजाची किमया न्यारी , ओढीची ती तहान सारी शब्द ऐकता तुझे ते सारे , होते जणू जादू प्यारी आवाजातही ओढ असते , हे तुझ्याशी बोलून समजलं आई, ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं - अभिषेक पांचाळ , पुणे
काव्यरस

:( ?

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी सोमवार, 27/02/2017 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या रूपाने मिळाला, अस्तित्व घडवणारा एक वटवृक्ष. माझ्या पावलांना प्रकाश पुरवणारी तुझी सावली, पानापानांना जीवनरसाने ओथंबून टाकणारी मुळंही तुझीच. माझी सगळी शस्त्र इथेच परजलेली, संकटसमयी तुझ्याच ढोलीत लपवलेली. हरवलो जरी कधी तरी, स्वतःला शोधायला आलो, तुझ्याच गार सावलीत सापडत गेलो स्वतःला, दरवेळी नव्याने. पण आपल्या छोट्याशा विश्वाचा आधार असलेली तुझी मु़ळं, खोलवर जाऊ लागलीत, अनोळखी विश्वाच्या दिशेनं. माझ्यावरचा ऊनपाऊस अलगद झेलणाऱ्या तुझ्या फांद्या, आधार शोधू लागल्यात अनंताचा. जाळी होत चाललेल्या तुझ्या पानांमधुन, अंधार झिरपू लागलाय अताशा. मुक्त होत चाललीस तू, कणाकणाने, क्षणाक्षणाने. पण... तु

पुस्तकांविषयी सर्वकाही...

लेखक मोदक यांनी सोमवार, 27/02/2017 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स.. सर्वप्रथम जागतीक मराठी दिनाच्या भरपूर शुभेच्छा..!! आपल्यापैकी बहुतांश लोक पुस्तकप्रेमी आहेत आणि सतत कांहीना कांही वाचत असतात. आपल्यापैकी अनेक दिग्गजांना पुस्तकांविषयी भरपूर गोष्टी माहिती असतात आणि अनेक वैविध्यपूर्ण माहिती / अनुभवही असतात.

अंजलीची गोष्ट - तिघी (कथा)

लेखक aanandinee यांनी सोमवार, 27/02/2017 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
"आई, मोहना आणि शालिनी बरेच दिवस म्हणतायत भेटूया म्हणून. या शनिवारी जाऊन येऊ? तू रियाला बघशील?" अंजलीने आईला विचारलं. आई होच म्हणणार आहे हे माहीत असलं तरीही रियाची जबाबदारी आजीवर टाकण्याआधी अंजली नेहेमी आजीची परवानगी घेत असे. आजीची आणि रियाचीसुद्धा! शनिवारी लंचला त्या तिघींच्या ठरलेल्या सीफेस रेस्टाॅरंटमधे भेटायचा प्लॅन ठरला. हे रेस्टाॅरंट तसं थोडं लांबच पडायचं पण शांत, निवांत माहौल आणि खिडकीतून दिसणारा समुद्र ..... त्यामुळे तिघीनांही तिथे भेटायला आवडायचं. ड्राईव्ह करताना अंजली आठवू लागली. मेडिकल कॉलेज मधे सुरु झालेल्या या मैत्रीला आता तब्बल पंधरा वर्ष झाली होती.