Skip to main content

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांस एक पत्र...

लेखक वटवट यांनी शुक्रवार, 03/03/2017 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
आदरणीय तात्याराव, आमची पिढी ही जास्त पत्रलेखनावर भर देत नाही. सरळ सरळ जाऊन बोलण्यावरच आमचा भर असतो... खरंच हे पत्र नं लिहिता सरळ तुम्हाला भेटणंच शक्य असलं असतं तर?? असा एक विचार मनातून चमकून गेलाय आत्ताच.. आणि त्याच विचाराला अधिष्ठान मानून हे पत्र लिहीत आहे. तात्या, एका शब्दप्रभूला शब्दांनीच आदरांजली वाहणे आणि तीही मराठा भाषेच्याच दिनी योग्य म्हणून हा यथाशक्ती पत्रप्रपंच. तात्या, २६फेब्रुवारी १९६६ रोजी तुम्ही प्राणोत्क्रमण केलेत, त्या दिवशी जी काही प्रचंड मोठी अंत्ययात्रा दादरला निघाली होती, ती अंत्ययात्रा दोन चिमुकले डोळे त्याच्या घराच्या सज्ज्यातून अनुभवत होते.

वर्ल्डकप क्लासिक्स - २००७ - वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 03/03/2017 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
२१ एप्रिल २००७ केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन बार्बाडोसच्या ब्रिजटाऊनमधल्या केन्सिंग्टन ओव्हलच्या मैदानात सुपर एटमधली वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यातली मॅच खेळली जाणार होती. वेस्ट इंडीज आणि इंग्लंड या दोन्ही संघांचं आव्हान संपुष्टात आलं असल्याने सेमीफायनलच्या मुकाबल्यावर या मॅचच्या निकालाचा काहीही परिणाम होणार नव्हता. पण वेस्ट इंडीज आणि इंग्लंड या दोघांच्या दृष्टीने मात्रं ही मॅच महत्वाची होती.

अल्पसंख्यांकांचा प्रश्न! भाग २

लेखक आदित्य कोरडे यांनी गुरुवार, 02/03/2017 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
मागील महिन्यामध्ये ह्या लेखाचा पहिला भाग मिसळपाव वर प्रसिद्ध झाला. त्याचीच लिंक मी WhatsApp आणि फेस बुक वर प्रसिद्ध केली. अपेक्षे पेक्षा जास्त प्रमाणात लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. हा लेख वाचणारे कामावरचे अनेक सहकारी (ज्यात मुस्लीम सुद्धा आहेत) मला प्रत्यक्ष येऊन भेटून, चर्चा करून आणि प्रतिक्रिया देऊन गेले.काही लोकांचे फोन आले. साहजिक त्यात हा लेख आवडलेले लोक जसे होते तसेच तो न आवडलेले लोकही होते.लेख न आवडलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया किंवा त्यांना लेख न आवडण्यामागचे कारण मी समजू शकत होतो. ते अपेक्षितही होते.

मन

लेखक अमिता राउत यांनी गुरुवार, 02/03/2017 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
का कुणास ठाऊक उगाच मन उदास होत आतल्या आत कुढत असतं. अपेक्षांचं ओझ उगाच खांदयावर पेलत असतं , पूर्ण झाल्यातर आनंद नाही तर रागराग करत बसतं. मनाचा खेळ सारा , घटकेत भविष्यात तर, घटकेत भूतकाळात तरंगळत असतो. वेध घेता भविष्याचा भूतकाळ पायाशी घुटमळत असतो , पाऊल टाकता पुढच चर्र्कन भूतकाळ झोंबून जातो. असचं जगतो प्रत्येकजण गटांगळ्या खात, पण वर्तमानाचा कुणाला पत्ताच नसतो. कर्णी सगळी मनाची, पण दोष मात्र चेहऱ्याला क्षणांत हसरा तर क्षणांत हिरमुसलेला. काय हवं असत या मनाला? एकदा विचारावं त्यांनी त्याच्याच मनाला मग कळेल घालमेल चेहऱ्याची. आकाशात ढग दाटावे तसे विचार येतात भरून , कधी गर्जना तर कधी सर येते धा

दिल दोस्ती डिकन्स्ट्रक्शन

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 02/03/2017 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
दिल दोस्ती Deconstruction सध्या भारतात D-construction किंवा बुद्धिभ्रम करणार्‍यांची चलती आहे. जे जे प्रचलित आहे त्याच्या नेमके उलट काहीतरी बोलायचे. समाजात जे शिष्ट संमत आहे त्यावर प्रश्न उपस्थित करायचे आणि फक्त प्रश्नच उपस्थित करायचे. उत्तरे शोधण्याची जबाबदारी मात्र नाही घ्यायची असे सुरु आहे. समाज दुर्गेला मानतो का, मग आम्ही महीषासूराची पूजा करणार. समाज लग्न संस्थेला मानतो का मग आम्ही लिव्ह इन रिलेशनचा पुरस्कार करणार.

लाईफ अँड सायकल

लेखक प्रतिक कुलकर्णी यांनी गुरुवार, 02/03/2017 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सायकल सायकल ग्रुप मध्ये प्रेरणेचा सुळसुळाट झाला आहे. डॉक श्रीहासने चॅलेंजची आईडिया काढल्यापासून लोक सुरूच झालेत. चॅलेंजच प्रकरण निघालं त्यावेळी मी सुद्धा काहीतरी व्यायाम प्रकार शोधत होतो जो रेग्युलरपणे करायला जमेल, याचवेळी एका मित्राची सायकलसुद्धा मिळाली. अशा प्रकारे सगळे योग जुळून आल्यामुळे माझं सायकलिंग सुरु झालं. आठवड्यात किमान ५ दिवस साधारण १५-२० किमी माझं सायकलिंग सुरु होतं. एका रविवारी सायकल सायकल ग्रुपचा युनिव्हर्सिटीला भेटण्याचा बेत ठरला. त्या भेटीत अनुभवी लोक त्यांच्या जुन्या सायकल राईडांच्या आठवणींना उजाळा देत होते. बोलता बोलता शेतकरी हॉटेलचा विषय निघाला.

राउळी या मनाच्या

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 02/03/2017 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा : http://www.apurvaoka.com/2017/03/poem-moon-sky-stars-memories-marathi.h… a राऊळी या मनाच्या वृत्तः भुजंगप्रयात जसा चंद्र हा या महाली नभाच्या तशी ती वसे राऊळी या मनाच्या तिला काढिता घोर अंधार दाटे स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या तिला वाटले तोडुनी बंध जावे न मी आड आलो तिच्या निर्णयाच्या तशी

ताळेबंद

लेखक रामदास यांनी गुरुवार, 02/03/2017 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
तसा चोख असतो ताळा आमचा , दिसा -मासाच्या गणिताचा. कुणाची तरी वाट बघत, जागलात, काही उत्तर रात्रीचे प्रहर. ते ही वळते केलेत , संधीकालाच्या वजावटीत. ओंजळीत चेहेरा झाकून रडलात , ते ही होरे जमा धरलेत, ग्रहणाच्या हिशेबात. तसा चोख असतो ताळा आमचा , दिसा -मासाच्या गणिताचा. उरलं सुरलं केलं वळतं घसार्‍याच्या आकडेवारीत तसे काही बाक़ी नाही देण्या घेण्याच्या हिशेबात . तसा चोख असतो ताळा आमचा , दिसा -मासाच्या गणिताचा. (मुठभर राखुंडी हातात ठेवून आयुष्य म्हणाले, हीच काय ती गंगाजळी इतक्या वर्षाच्या ताळेबंदात )

वर्ल्डकप कासिक्स - २००७ - इंग्लंड विरुद्ध श्रीलंका

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 02/03/2017 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
४ एप्रिल २००७ सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडीयम, नॉर्थ साऊंड अँटीगाच्या नॉर्थ साऊंडमधल्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडीयममध्ये सुपर एटमधली इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातली मॅच रंगणार होती. हे स्टेडीयम २००७ च्या वर्ल्डकपसाठी मुद्दाम बांधण्यात आलेलं होतं आणि त्याला व्हिव्हियन रिचर्ड्सचं नाव देण्यात आलं होतं. सुपर एटमधल्या ६ मॅचेस या मैदानात खेळवण्यात येणार होत्या. श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातली मॅच ही या मैदानात खेळवण्यात येत असलेली पाचवी मॅच होती.

अर्धा घाव

लेखक चांदणशेला यांनी बुधवार, 01/03/2017 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
गडद काळ्या अंधाराला फुटे वाचा अर्धा घाव काळजात राहिला कुणाचा रिमझिम अशी डोऴ्यांत लागली नाचू गाभार्यात आठवणींची भेट पुन्हा वेचू पिऊनी धरणी रात्र निजली तरी कशी दिशांना जाग आली थकले सारे दीप व्यथांचे जळूनी गेले पथ कुणाचे
काव्यरस