Skip to main content

मला आवडणारे काही podcasts.

लेखक बार्नी यांनी शुक्रवार, 10/03/2017 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिस मधून घरी येताना फोनवर podcasts ऐकणे हा माझा आवडता छंद आहे . दोन वर्षाआधी अचानक मला podcasts चा आंतरजालावर शोध लागला आणि तेव्हापासून मी नियमित podcasts ऐकत आहे. गेल्या दोन वर्षात मला गवसलेले आणि माझ्या आवडीचे काही podcasts खाली देत आहे . आपणही आपल्या आवडीचे podcasts सुचवू शकता. • Dan carlin's Hardcore History जर आपणास इतिहासाची आवड असेल तर आपणास हा podcast आवडेल. जागतिक इतिहासातील महत्त्वाचे विषय घेऊन त्यावर ४ ते ५ तासांचा एक एपिसोड असतो.

खन्त

लेखक प्रविण गो पार्टे यांनी शुक्रवार, 10/03/2017 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली.. एकाचवेळी दोन प्रतिक्रिया मनात उमटत होत्या. शिवाजी महाराजांचा पराक्रमाचे प्रतीक पाहून अभिमानाने छाति भरून यत होती तर दुसर्‍याच वेळी किल्ल्याची झालेली द्यनीय अवस्था पाहून लाजेने मान खाली झुकत होती. काय रुबाब होता एक वेळ सिंधुदुर्गाचा!!! अरबी समुद्राच्या लाटेला न जुमनता थेट परकीय जुलमी राजवटीला आव्हान देत मराठ्यांचे समुद्रावर वर्चस्व निर्माण करणारा आज तोच त्या समुद्राच्या लाटांमधे स्वतहाचे अस्तित्व टिकवण्यासाठी झगडतोय.

तुम्हाला कुणाचा हेवा वाटतो का?

लेखक इना यांनी शुक्रवार, 10/03/2017 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
हेवा, मत्सर, असूया. च्यायला आम्ही इतकं घासून पण उपयोग नाही, कुणालाही पाठवतात साले ऑनसाईट किंवा त्याला कसं प्रमोशन मिळालं माझ्यानंतर येऊन!? मला सगळ्या गोष्टी मिळवायला कष्ट करावंच लागतं! पण त्याला किंवा तिला किती सहज मिळते प्रत्येक गोष्ट! घर, गाडी वर्षा दोन वर्षात लगेच फॉरेनच्या ट्रिप! इथं मी साधं मुळशी नाहीतर खडकवासल्याला जाऊया म्हणलं तरी नाक मुरडतात! माझ्या बहुतेक हातालाच चव नाही, तिनं काहीही कसंही केलं तरी ते चांगलंच होतं. मी मोठी/मोठा असून मला घरात कुणी विचारत नाही! सगळे निर्णय लहान भाऊ/बहीण/जावेच्या हातात! कसलं भारी सरप्राईज गिफ्ट दिलं तिच्या नवऱ्यानं/ त्याच्या बायकोनं!

वर्ल्डकप क्लासिक्स - २०१५ - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 10/03/2017 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
२८ फेब्रुवारी २०१५ इडन पार्क, ऑकलंड न्यूझीलंडच्या उत्तर बेटावरच्या ऑकलंडच्या ईडन पार्कच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन यजमान देशांतली पूल ए मधली मॅच रंगणार होती. न्यूझीलंडने श्रीलंका, इंग्लंड आणि स्कॉटलंड यांचा पराभव करुन आपल्या पहिल्या तीनही मॅचेस जिंकल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडला आरामात धूळ चारली होती, पण बांग्लादेशविरुद्ध ब्रिस्बेनच्या दुसर्‍या मॅचवर पाऊस पडला होता, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने ही मॅच विशेष महत्वाची होती. ही मॅच जिंकल्यास क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश मिळवणं ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने सुकर होणार होतं.

मुलगी झाली

लेखक शेवटचा डाव यांनी शुक्रवार, 10/03/2017 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
गावाच्या बाहेर मोरीवर बसलो होतो .तोच खट खट बुलेट चा आवाज करीत पांडुभौ आला . त्याच तोंड उतरेल व्हत . "कायर काय झाल पांडुभौ "आर तुझी वहनीची वटी भरली" "काय सांगतुस मग काय करायच ठरवलय तुला ध्यानात हाय ना शेवटाला पुजीच्या अन आर्चीच्या टायमाला शिजर केलय विहनीच " "हो ठाव हायर पण आय काय ऐकणार नाय अस वाटतय " अन मी पुन्हा सिता वहीनीच्या विचारात गुंतलो .आकरा वर्षे झाली पांडुभौ अन सिता वहीनी यांच्या लग्नाला, तशी पांडुभौ अन काकु काका (पांडुभौ चे आई वडील)यांची देखरेख ,शेतीतील कामे, घरात आल्या गेल्याची निट ठेप ,सगळ हसत मुखाने करानारी सिता वहीनी .

झेप

लेखक aanandinee यांनी शुक्रवार, 10/03/2017 04:46 या दिवशी प्रकाशित केले.
पक्ष्यांनी तर उंच उडावे  क्षिती नसावी पडण्याची अन भीती नसावी आभाळाची डोळ्यांमधल्या स्वप्नांसाठी पक्ष्यांनी तर उंच उडावे   पिंजरे सगळे तॊडून टाकून दाणे पेरू मागे सोडून नजर लावूनी निळ्या नभांवरी  पक्ष्यांनी तर उंच उडावे कुणी क्वचित मेघांत हरवतील  इंद्रधनूच्या पारही जातील, ना जावे तर कसे कळावे पक्ष्यांनी तर उंच उडावे शोध नव्हे हा आभाळाचा शोध पंखांतील बळाचा गंगनभरारी घेताना पक्ष्याने स्वतःला तोलावे पक्ष्यांनी तर उंच उडावे डाॅ. माधुरी ठाकुर https://drmadhurithakur.blogspot.co.uk/

अंदाजे-गालिब

लेखक मिडास यांनी गुरुवार, 09/03/2017 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
शायरी म्हटलं कि गालिबचं नाव पहिलं ओठांवर येतं. आणि त्याच्यात प्रेमभंग वगैरे असेल तर गालिबला पर्याय नाही. त्या गालिबच्या काही शेरांचा मज पामराने लावलेला अर्थ.