Skip to main content

डाव - ४ [खो कथा]

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 09/04/2017 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
डाव - १ डाव -२ डाव- ३ सखारामच असणार तो. त्याचं हे नेहमीचंच हाय. उगा हितं तिथं कडमडायचं. नाय तर काय. आता त्यानं गावभर बोभाटा केला तर आली का नाय पंचाईत? आधीच बाबांना संशय आलाय. परवा मोबाईलचं बील बघून तडतडलेत.  मोबाईल काढून घ्यायची धमकी पण दिलीय. सखारामचं तोंड दाबायचं  काम वस्तादनं चांगलं केलं आसतं.

एक मिसळ बारा पावः नाशिकच्या मिसळपावची गाथा.

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 09/04/2017 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिकच्या मिसळीचे दिवाने हजारो है, नाशिकच्या मिसळ दिवानग्यांची ही दिवानगी नक्की केव्हापासून सुरु झाली आणि काय काय रुप घेऊन कशी कशी नव्याने अवतरत आली ह्याची सुरसरम्य कथा मांडली आहे खालच्या माहितीपटातून. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकही सेकंद चुकवू नये अशी नितांतसुंदर फिल्म मिसळपावडॉटकॉम वर असलीच पाहिजे म्हणून इथे शेअर करत आहे. एन्जॉय!!! श्रेयनिर्देशः दिग्दर्शक, कॅमेरामन, संकलकः तेजस जोशी ध्वनी आणि आवाज : रुचिर पंचाक्षरी संशोधनः लिनाली खैरनार, सी. एल.

त्या सुऱ्याची चालही लयदार आहे!

लेखक सत्यजित... यांनी रविवार, 09/04/2017 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
साचला का एवढा अंधार आहे? काजव्यांचा तेवढा आधार आहे! जागल्या होत्या मशाली काल येथे आज इथला सूर्यही बेजार आहे! एकही ठिणगी कशी येथे पडेना? कोण इथला आंधळा सरदार आहे? फुंकतो आहे कधीचा सूर्य मीही श्वास माझाही जरा उबदार आहे! सारखा हिंदोळतो हा प्राण माझा त्या सुऱ्याची चालही लयदार अाहे! —सत्यजित
काव्यरस

वायूमंडल

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 09/04/2017 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या पृथ्वीवर आपण राहतो, त्या पृथ्वीवरच्या भूपृष्ठाचा एक तृतियांश भाग पाण्याने अनावृत्त असला तरी दोन तृतियांश भागावर पाण्याचे विशाल साठे विपुलतेने विखुरलेले आहेत. महासागर आहेत ते. अनावृत्त भागही वस्तुतः वायूंच्या सुमारे दहा किलोमीटर उंचीच्या थराने आवृत्तच आहे. ह्या वायूंचे वजन, म्हणजेच वातावरणीय हवेचा दाब.

संध्याकाळचा एक पर्पल-प्रसन्न संवाद

लेखक माहितगार यांनी रविवार, 09/04/2017 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट परगावात आटपाट काम निघाले आणि अस्मादीकांनी एजंट महोदयांना मोबाईल फिरवला, रेल्वेचे कन्फर्म्ड तिकीट उपलब्ध झाले नाही तेव्हा बसगाडी शिवाय पर्याय नव्हता, शिवनेरी शिवाय इतर बससेवांवर मागची बरीच वर्षे चालवलेला बहीष्कार उठवण्याची वेळ आली होती.

रामू

लेखक अक्षरमित्र यांनी शनिवार, 08/04/2017 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर रामकृष्ण हे त्याचे खरे नाव. पण आम्हा पोरांमधे तो रामू किंवा राम्या नावानेच फेमस होता. म्हणजे तो अजुनही आहे पण आता मी तिथे नाहिये. रामू माझ्यापेक्षा नक्की किती वर्षांनी मोठा आहे हे मला नीटसं ठाऊक नाहिये पण साधारण आमच्यामधे ७-१० वर्षांचे अंतर असावे. मात्र बारीक अंगयष्टीमुळे रामुचे वय अजुनही कळून येत नाही. रामू ला राजकारणाची आवड आहे की खाज आहे हे मला नीटसं अजुन उमगलं नाहिये पण कदाचित दोन्ही असावं असं मला अजुनही वाटतं. रामूचं घर चाळीच्या पुढच्या बाजुला तर माझं मागच्या बाजुला.

गार्लिक नान

लेखक सविता००१ यांनी शनिवार, 08/04/2017 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
आज आपण आमच्या घरातली माझी आजची बक्षिसपात्र पाककृती पाहू बरं का. नेहमी आपण मैद्याची नान खातो. पण ती थंड झाली की चिवट होते. मग घरातल्या मोठ्यांची नाराजी. त्यावर उपाय म्हणून ही संपूर्ण कणीक वापरून केलेली नान. पहा कशी वाटते. थंड झाली तरी चिवट होत नाहीच पण चविष्ट ही लागते. साहित्यः २ वाट्या कणीक, २ चमचे दही, १ चमचा तेल, मीठ, १/२ चमचा यीस्ट, १ चमचा साखर, ३ टी स्पून बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, २ टी-स्पून कलोंजी/काळे तीळ, कणीक मळायला कोमट पाणी, बटर. कृती: यीस्ट अर्धा कप कोमट पाण्यात साखर घालून अर्धा तास ठेवले.

कथुकल्या २

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 08/04/2017 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
१. आवाहन… दिशाचे आईवडील पार्टीला गेले अन तिने लगेचच पुजाला घरी बोलावलं. पुजा सगळी तयारी करून आली होती. आल्याआल्या तिने दरवाजा खिडक्या बंद केल्या, खिडक्यांवरचे पडदे ओढून घेतले. नंतर टेबलावर बॅग ठेवून त्यातलं सामान बाहेर काढायला सुरुवात केली. सगळ्यात आधी काचेचा चकचकीत गोळा बाहेर आला. खोलीतल्या अंधारातही तो मंदगूढ उजेड फेकत होता. “काय आहे हे?” “याच्या मदतीने आपण भूतांना बोलावू शकतो.” “काहीपण काय फेकतेस गं.” “अगं खरंच. बाबांच्या जॉबमुळे आम्ही आफ्रिकेत होतो न तिथे मी तंत्रमंत्र शिकले होते.

पुणे ते वाडा... भाग 2

लेखक इरसाल कार्टं यांनी शनिवार, 08/04/2017 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वार्ध पुणे ते वाडा... भाग १ काल मोहनकडे पोचलो तेव्हाच ठरवलं होतं कि लवकर झोपायचं, पहाटे पाचलाच उठून सहा वाजेपर्यंत निघायचं, जेणेकरून उन्हं पडेपर्यंत जास्तीत जास्त अंतर कापता येईल. पण झालं उलटंच, मोहनबरोबर केलेलं लांबच लांब वॉक, त्यानंतर रंगलेल्या गप्पा. जेवण हे सगळं उरकायला रात्रीचे बारा वाजले. माझा सक्काळीच निघण्याचा निर्णय वाहिनीसाहेबांनी साफ धुडकावून लावला. अजून काय पाहुणचार करायचा राहिला होता देव जाणे.

नारायण...कोण नारायण?

लेखक चिनार यांनी शनिवार, 08/04/2017 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा: स्व.श्री.पु.ल.देशपांडे ह्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं अजरामर व्यक्तिचित्र: नारायण…!) "हे बघ नारायणा..ती तुझ्यासारखी लग्नातली स्वयंसेवकगिरी मला अजिबात जमणार नाही आता",मी नारायणाला सांगून मोकळा झालो. "का नाही जमणार पण?" "अरे हल्ली कोणाच्या लग्नाला जायलासुद्धा जमत नाही रे.लग्नाची कामं कुठून करणार?" "काय सांगतोस." "इतरांच्याच काय...स्वतःच्या लग्नात जरी मी उपस्थित असलो तरी पूर्ण वेळ स्टॅण्डबाय मोडमध्येच होतो." "आता हा स्टॅण्डबाय मोड काय असतो" "म्हणजे आसपास सुरु असलेला अभूतपूर्व गोंधळ हा आपल्या नावानेच सुरु असूनही मी 'बघ्या' शिवाय काहीही करू शकत नव्हतो!