नाही; माझा प्रॉब्लेमच आहे
ब्लॉग दुवा
रोजची गर्दी, रोजचा प्रवास, कटकट करत मी ऑफिसला येतो
कंपनी ची कॉन्फरन्स, गोव्याला जायचं, आनंदाचा माहोल असतो
हो काय? मी साशंक होतो. कसला तरी विचार करतो
आता मिळाला ना ब्रेक ! मग यावं नाही का आनंदाला उधाण! मी म्हणतो
उलट इथे मात्र मनालाच कसलातरी ब्रेक लागतो
नाही; माझा प्रॉब्लेमच आहे.
कसं जायचं? विमानाने? की कोकण रेल्वेने? चर्चा चालू
ए कॅमेरा आण हं... स्विमिंग कॉश्चूम आहे का एक्स्ट्रॉ? जुळवाजुळव चालू
मी आजच स्टॉक आणतो आपला! बेत आखणं चालू
सहकर्मचारी मित्र होतो आणि प्रत्येक जण जणु गोव्यात पोचतो
आणि मी?
काव्यरस
अंबरनाथ ते म्हसा ०९/०४/१७ सायकल भ्रमंती
सायकलिंग च्या सुरवातीच्या दिवसांत , सायकल बदलण्यापुर्वी जीला अनेक वेळा त्रास देउन , अनेक चौकशा करुन भंडाउन सोडलं ती , सीएफयू( सी एफ यू= कॅम्प फायर अनलिमिटेड नावाचा व्हाटस App गृप) ची एक लेडी सायकलिस्ट नंदिनी जोशी (बदलापूर ) चा एक मेसेज होता सात / आठ तारखेला .. " या रवीवारी जर राईड करणार असाल तर मला कळवा " मला ही यायचय तुमच्याबरोबर.
हा रवीवार मला ही मोकळा होता , कल्याण सायकलिस्ट ची राईड होती कल्याण ते व्हिवियाना मॉल ठाणे अशी ..
म्हणजे सिमेंट च्या जंगलातुन सिमेंट च्या रस्त्याने सिमेंट च्या कोअर फॉरेस्ट मध्ये जायचे ते ही अनेक वाहन चालकांच्या रागाला तोंड देत .
माझे बँकानुभव
माझी बँक माझे अनुभव
गजावरील राणी
परवाच्या दुपारी टळटळीत उन्हात 'पित्तशामक नीरा' घशाखाली सारत असताना किलकिल्या डोळ्यांनी या वाड्याला न्याहळत असताना हे दृश्य दिसले.एप्रिल महिन्याचा दिवस असूनही टांगलेला आकाशकंदील येथे साजऱ्या होणाऱ्या वार्षिक दीपावलीच्या साक्ष देत होता.त्या खाली नजर टाकली आणि आश्चर्य वाटले.
पुण्यातील सगळ्यात जुनी पेठ म्हणून आपण जिचे वर्णन वाचतो ती हि कसबा पेठ.पुणेरी खोचकपणा,टोपी,कोट धोतर आणि अनुनासिक आवाज,तिरकसपणा,ओतप्रोत भरलेला उपहास,पुणेरी पगडी आणि टांगा या गोष्टींचे उगम स्थान आणि पर्यायाने केंद्रबिंदू.छत्रपती वास्तव्यास येऊन गेले,पेशवे सरले,टिळक,गोखले,आगरकर वावरले,त्याबरोबर गोरा साहेबाची इथून
मनाच्या बाहेर !
अरांच्या मनातल्या मनात !! वर चाललेली चर्चा निर्णयाप्रत येऊ शकत नाही याची दोन कारणं आहेत :
१) अरांच्या धारणेत `मनावेगळं कुणीही नाही' आणि माझ्यामते हे `उघडपणे स्वतःलाच नाकारणं' आहे. जगात फक्त एकाच गोष्टी कुणीही नाकारु शकत नाही ती म्हणजे `मी आहे ' ! सो, अरा इज ट्राइंग इंपॉसिबल.
२) इन अ वे, `मी आहे' हे विधान नाकारता येत नसलं तरी जोपर्यंत व्यक्ती स्वतःप्रत येत नाही तोपर्यंत तिला आपण `मनावेगळे आहोत' हा उलगडा होत नाही.
नाऊ द ट्रबल इज, (१) लॉजिकचा विषय आहे आणि (२) अध्यात्म आहे.
हागणदारीमुक्तीचा तमाशा
कथा आणि व्यथा
*****************
हागणदारीमुक्तीचा तमाशा
*******
पहाटं पहाटं कावळे मास्तर नि शेरगाव गाठलं. झावळातच गडी ग्रामपंचायती
समोर हजर. गाडी उभी केली.उपरण्याने आळपलेले थोबाडं मोकळ केल. इकडं तिकडं पाहिलं .कुणाचाच पत्ता नव्हता. कुणाचा म्हंजी पथकातलं एक ही मेंबर अजून टपकालं नव्हता. सीयोची आडर असल्यामुळे येतेल सारी. पण कोणं टॅन्शाॅन घेत एवढं ? ग्रामपंचायतीचा चपराशी सुदाक आला नव्हता अजून...
आता काय करावं म्हणून मास्तरं नी तंबाखूची पुडी काढली .चुन्याची डब्बी काढली. केला घाणा मळायला सुरू...
आता हे बसले तंबाखू मळीत पण पंचायत बायांची झाली.
मिसळपाव