उपकरण : एयर फ्रायर
कृती :
कुसकूस (गरम पाण्यात भिजवून), किनवा (शिजवून), मॅश्ड पोटॅटो, हिरवे वाटणे, मक्याचे दाणे, धने - जिरे पूड, लाल तिखट, मीठ स्वादानुसार, कोथंबीर एकत्र मळून घ्यावे. त्यात चवी प्रमाणे थाई रेड चिली सॉस आणि किसलेले चीज टाकावे.
आता या मिश्रणाच्या टिक्क्या कराव्यात. त्या ब्रेड क्रम्प्स मध्ये घोळवून घ्याव्यात.
तेलात तळण्या ऐवजी हवेवर एका बाजूने १५ मिनिटे तर दुसऱ्या बाजूने साधारणतः १२ मिनिटे तांबूस सोनेरी होई पर्यंत तळाव्यात.
बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट हवा हवाई कुसकूस- किनवा टिक्कीज तयार.
मोबल्याने एक, दोन फटू खेचावेत आणि टिक्क्यांचा गिल्ट फ्री फन्ना उडवावा.