दक्षिण घळ: भाग २
दक्षिण घळ : भाग १
"म्हणजे नक्की काय बघणार आहेस तू आप्पा?" दाजींनी त्याला विचारल.
"दाजी आपली दक्षिण वेसेकडची घळ आहे ना तिथल्या दरीत मी एक लहानसं खोपट केलं आहे. तसंही गावकरी त्याबाजूला जात नाहीत. उगाच तिथे भुताचा वावर आहे अस कधीतरी कोणीतरी पिकवून दिल आहे. त्याचा फायदा घेऊन मी तिथली जागा निवडली आहे. काल कोण कोण आलेत मला माहित नाही. कारण त्याची वर्दी मला नव्हती. पण तुम्ही काळजी करू नका. आपल्या गावात कोणालाही माझ्या या कामाची खबर नाही.
मिसळपाव

