महाराष्ट्राचे दुर्गवैभव आणि आपण
महाराष्ट्र हा प्राचीन काळापासून एक समृद्ध, प्रगतीशील आणि पराक्रमी देश आहे, हे त्रिकाळ अबाधित सत्य आहे. प्राचीन काळी हा प्रांत ऋषीमुनींचे आणि महारथींचे दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा. भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम हे येथील राष्ट्रीकांचे वैशिष्ट्य राहिले आहे. अगदी कला, स्थापत्य आणि निसर्गसौंदर्य हे देखील या भूमीला वरदान ठरले आहेत. अजिंठावेरुळचे स्थापत्य तर जगाला भुरळ घालत आहेत. लोणारचे खारयुक्त सरोवर हे खगोलतज्ञ आणि वैज्ञानिक यांचे आवडते ठिकाण.
अनेक वैदिक, पौराणिक, मध्ययुगीन आणि अर्वाचीन दाखले याला प्रमाण आहेत.
मिसळपाव