Skip to main content

मुखपृष्ठ

लेखक पिलीयन रायडर यांनी सोमवार, 16/01/2017 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
. " गोष्ट तशी.. " ची व्याप्ती इतकी प्रचंड होती की तिला मुपृमध्ये बसवताना धांदल उडणार हे सरळ होतं. अशा वेळी सरळ तज्ज्ञांकडे गोष्टी सोपवून आपण हरी - हरी करणे हा मार्ग स्वीकारणे इष्ट. त्यात ही तज्ज्ञ एस भाऊ आणि वेल्ला सारखे असतील तर जॅकपॉटच हो ! एस भाऊंनी लेख दिल्यावर आम्ही त्यांच्याकडे मुपृसाठी लकडा लावला. त्यांनी आधीच या उपक्रमाला " आपला" मानलेला असल्याने एक स्केच करून पाठवलं देखील.

ओरिजिनल खान !!

लेखक संदीप चित्रे यांनी सोमवार, 16/01/2017 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
*/

ऐन तारुण्यात तो देखणा होता ह्यात वादच नाही! तो अभिनेता कसा होता ह्यावर दुमत असू शकतं. तो स्टाइलबाज होता ह्यात वादच नाही! त्याचा स्टाइलबाजपणा कधी धेडगुजरी वाटायचा, ह्यावर दुमत असू शकतं. त्याच्या दिग्दर्शनाचे काही चित्रपट तुफान चालले ह्यात वादच नाही! तो किती चांगला दिग्दर्शक होता ह्यावर दुमत असू शकतं.

विंगेत गलबला - पुष्कर श्रोत्री आले बरं का !!

लेखक ढ.अदिती यांनी सोमवार, 16/01/2017 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
*/

पुष्कर श्रोत्री हे नाव मराठी प्रेक्षकाला नवं नाही. महाविद्यालयीन नाट्यस्पर्धांमधून सुरुवात करून इथवर पोहोचलेला एक गुणी कलाकार. हजारो - लाखो प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करणार्‍या एका नामवंत टीव्ही-सिने-कलाकाराला आमच्या ३०००० लोकांसाठी "मुलाखत द्याल का हो?" असं विचारल्यावर एकदम "अरे देऊ की! का नाही?

दक्षिण घळ भाग 7 (शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 16/01/2017 00:53 या दिवशी प्रकाशित केले.

दक्षिण घळ भाग 6

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 15/01/2017 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण घळ भाग 1 दक्षिण घळ भाग 2 दक्षिण घळ भाग 3 दक्षिण घळ भाग 4 दक्षिण घळ भाग 5 दक्षिण घळ भाग ६ "अहो... मी इथे अडकून पडले आहे. कोणी मदतीला नाही आहे. मला इथून बाहेर पडायचे आहे पण रस्ताच माहित नाही.

गावगाड्यात हरवलेला चेहरा: नारायणमामा

लेखक चंद्रकांत यांनी शनिवार, 14/01/2017 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
गावगाड्यात हरवलेला चेहरा: नारायणमामा ताई, नवरदेव-नवरीले हायद लावले चाला! अप्पा, मानतानं निवतं शे! जिभाऊ, शेवंतीले निघा! बापू, टायी लावाले चाला! आबा, तात्याकडनं चुल्हाले निवतं शे! या आणि अशाच प्रसंगपरत्वे अगदी बारश्यापासून बाराव्यापर्यंत कार्यक्रमांसाठी निवते देणारा खणखणीत आवाज गल्लीच्या सीमा पार करून निनादत राहायचा काही वेळ तसाच आसपासच्या आसमंतात. त्या सांगण्यात एक लगबग सामावलेली असायची. आजही हा आवाज मनात आठवणींच्या रूपाने स्पंदित होतो. स्मृतीच्या गाभाऱ्यातून निनादत राहतो. या आवाजाचा धनी कालपटाने जीवनग्रंथात अंकित केलेल्या काही वर्षांची सोबत करून निघून गेला आहे.