Skip to main content

घेई छंद!

लेखक सिंधू वडाळकर यांनी मंगळवार, 17/01/2017 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाला अनेक छंद असतात. कुणाला वाचनाचा, कुणाला लिहिण्याचा, कुणाला झाडे लावण्याचा, कुणाला पशुपक्षी पाळण्याचा. छंदाशिवाय जीव म्हणजे सुकाणूशिवाय होडी होय. मला अनेक छंद आहेत आणि ते मी आजपर्यंत जोपासले आहेत. मानवी जीवनात अध्यात्माला अनन्यसाधारण महत्व आहे. श्रद्धेविना जीवन रुक्ष आहे. याला कारण म्हणजे लहानपणापासून मी घरातील अध्यात्मिक वातावरणात वाढले. माझ्या वडिलांना अध्यात्माची खूप गोडी होती. "जीवनात कुणाचेही मन विनाकारण दुखवू नये. कुणाचाही द्वेष, मत्सर करून नये. मन शुद्ध असावे. मग त्या मनात ईश्वराचे प्रतिबिंब पडते!" असे ते सांगत. रात्री वडील आम्हाला रामायण व महाभारतातील गोष्टी सांगत.

चिमणी

लेखक तिरकीट यांनी मंगळवार, 17/01/2017 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
अर्धी बोबडी चिमणी हाक डोळ्यांमधली चिमणी झाक अधुनमधुन फेंदारलेले नकटे नकटे चिमणे नाक....... चिमणे तोंड, चिमणे केस चिमणे हात, चिमणा वेश काही कारण नसतानाही रागवण्याचा चिमणा आवेश तुझे मन चिमणे चिमणे असेच फुलवत राहेन मी दोघेही राहु अगदि असेच.... चिमणी तु, चिमणा मी.....

बोहनी...

लेखक चिनार यांनी मंगळवार, 17/01/2017 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
नंद्या सकाळपासून खुशीत होता. आजपासून त्याला नवीन काम मिळालं होतं. राजाभाऊंकडून एक रिक्षा त्याने भाड्याने चालवायला घेतली होती. नंद्या तसा मेहनती,अंगापिंडाने मजबूत गडी. आजवर कधी हमाल,कधी बांधकामावरचा मजूर, कधी रंगरंगोटी कामगार असे बरेच कामं त्याने केले होते. पण महिन्याभरापासून नंद्या घरीच होता. बांधकामावर मिस्त्रीशी झालेल्या मारामारीनंतर नंद्या दहा-बारा दिवस जेलमध्ये होता. तिथून सुटल्यावर त्याला काहीच कामं मिळालं नाही. बायको चार घरी धुणीभांडी करायची म्हणून जेमतेम निभत होतं. नंद्या खिन्न मनाने घरात स्वतःला दोष देत बसायचा.

पानिपतात झालेले अब्दालीचे नुकसान

लेखक shantanu Paranjpe यांनी मंगळवार, 17/01/2017 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्याच तारखेला काही वर्षांपूर्वी भारत इतिहासातला एक मोठ युद्धसंग्राम झाला आणि त्याचे भारताच्या इतिहासावर दूरगामी परिणाम झाले. पण या युद्धात मराठे प्राणपणाने लढले आणि अमर झाले.

गोष्ट गरम.. गोष्ट गरम.. गोष्ट गरssssम!!

लेखक टुंड्रा यांनी मंगळवार, 17/01/2017 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
*/

‘गोष्ट तशी छोटी’साठी गोष्टी लिहिणार्‍या माणसाशी बोलायला हवं असं फार फार वाटत होतं. त्यातही खासकरून आपल्याला रोज भेटणार्‍या मालिकांच्या किंवा सिनेमांच्या लेखकाशी बोलता आलं तर काय बहार येईल, असेही खयाली पुलाव पकवणं चालू होतं. गंमत म्हणून ‘मधुगंधा कुलकर्णीं’ना हळूच फेसबुकवर मेसेज टाकला. त्यांना रोज शेकड्याने मेसेज येत असतील, आपल्याला कोण विचारणार म्हणून त्याबद्दल विसरूनही गेले.

सिनेमा नावाचे हत्यार

लेखक पिंपातला उंदीर यांनी मंगळवार, 17/01/2017 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
*/

सिनेमा नावाचे हत्यार A आपली मांड पक्की बसवण्यासाठी अमेरिकेने आपल्या 'सॉफ्ट पॉवर'चा पुरेपूर वापर केला आहे. 'सॉफ्ट पॉवर' ही संकल्पना सर्वप्रथम जोसेफ नॉय या अमेरिकन अभ्यासकाने मांडली. कोणतीही आर्थिक आणि लष्करी ताकद न वापरता राजकारणातली उद्दिष्टे साध्य करण्याची एखाद्या देशाची क्षमता म्हणजे 'सॉफ्ट पॉवर.

चित्रकथी

लेखक विशेषांक यांनी मंगळवार, 17/01/2017 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
*/

अ‍‍ॅरि फिल्म्सचे हे एक ड्रीम प्रोजेक्ट होते. आपल्या 'गोष्ट तशी छोटी'साठी ही फिल्म त्यांनी आपल्या डेडलाइनमध्ये बनवली, जेणेकरून ती पहिल्यांदा ह्या व्यासपीठावर प्रदर्शित व्हावी. तेवढ्याकरिता खास धर्मावरमला दोन दिवस मुक्काम ठोकून ही फिल्म चित्रित केली गेली. तेलगू मित्रमैत्रिणींची मदत घेऊन .. रात्री उशिरापर्यंत जागून युद्धपातळीवर भाषांतर झाले.

अभी ची तनु

लेखक अभी ची तनु यांनी मंगळवार, 17/01/2017 06:58 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ( अभी गावाकडे ) आज सकाळ पासुनच जाधवांच्या घरी धावपळ सुरु होती . कारण जाधवांचा एकुलता एक मुलगा अभिमन्यु उर्फ (अभी) आज घरी येत होता.

दुस्तर हा घाट

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 16/01/2017 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवासाच्या प्रत्येक वाकणा-वळणावर तुझ्या भेटीचे भास खात्री होती........ तू गहन ग्रन्था॑तून गवसशील, भोळ्या भक्तीतून भेटशील, उपभोगाच्या उबगातून उमजशील, कठोर कर्मकाण्डातून कळशील, प्रखर प्रज्ञाचक्षू॑ना प्रतीत होशील, प्रकाण्ड प्रमेया॑तून प्रकटशील.... तू मात्र.. श्रद्धेच्या साखळ्या सैलावून तर्काच्या तटब॑द्या तोडून ... नि:शेष निसटलास ....मला अपेक्षाभ॑गाच्या आघातात व॑चनेच्या वावटळीत भ्रमनिरासाच्या भोवऱ्यात भोव॑डत भरकटत ठेवून........ पण आता स्वतःला सावरून आस्तिकता अव्हेरून नास्तिकता नाकारून निघालोय..... अज्ञेयाच्या अनन्त यात्रेला
काव्यरस