दापोली एक रम्य स्थळ भाग -१ :- केशवराज आसुदबाग
पुर्वी मामाकडे आजोळी बांध-तिवरे येथे जायचो तेव्हा कुठल्या का कारणासाठी होईना आमच्या मामाची दापोलीची २ दिवसा आड एक फेरी ठरलेली असायची. तेव्हा मामा आईला "मी कापात जाऊन येतोय गं काय आणायचंय का? असे विचारत असे तेव्हा कापात म्हणजे काय हे कळायचे नाही. पुढे कळलं की कापात म्हणजे कॅम्पचा अपभ्रंश आहे. या गाववाल्यांनी खर तर कॅम्पचा उल्लेख कापात असा केला आहे.
इंग्रजांनी दापोलीचे महत्व ओळखले होते आणि त्यांच्या काळात एक कॅम्प दापोली येथे होता. इंग्रजांनी बांधलेले आल्फ्रेड गॅडनी हायस्कुल आजही तिथल्या मुलांच्या शिक्षणाची आस पुरी करत आहे.
मिसळपाव