Skip to main content

थायलंड (एक अश्वत्थामा)

लेखक बाजीप्रभू यांनी बुधवार, 24/08/2016 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
व्हिएतनाम युद्ध!, दक्षिणपूर्व आशियात कम्युनिस्ट विचारसरणीचा आणि पर्यायाने रशियाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी अमेरिका, 'व्हिएतनाम' या चिमुकल्या देशाविरुद्ध १९५४ पासून इनडायरेक्ट आणि ६०साली प्रत्यक्ष युद्धात उतरली. २० दिवसांत व्हिएतनामच्या मुसक्या आवळू या वल्गनेसह उतरलेली अमेरिका प्रत्यक्ष २० वर्ष या युद्धात अडकून पडली. हिच २० वर्षे थायलंडच्या तीन महत्वाच्या शहरांच्या अंतर्बाह्य बदलास कारणीभूत ठरली. अमेरिकेचा आजही मित्र राष्ट्र असलेल्या 'थायलंड' देशात त्याकाळी अमेरिकेने "युद्ध-तळ" बनवला होता.

अळूची चिंचगुळातली मसाला देठी

लेखक अनन्न्या यांनी बुधवार, 24/08/2016 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
तसा मला रेसिपी द्यायला उशीर झालाय, श्रावणात शाकाहार असल्याने अनेकांना भाज्या काय करायच्या हा प्रश्न पडतो. त्यासाठी ही वेगळी कृती! साहित्यः अळूची नुसती देठी २५/३० नग, चिंचेचा कोळ तीन चमचे, गूळ तीन चमचे, लाल तिखट एक चमचा, गोडा मसाला दोन चमचे, शेंगदाण्याचे कूट अर्धी वाटी, ओले खोबरे अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, तेल फोडणीसाठी,फोडणीचे साहित्य, कोथिंबीर. dethi कृती: अळूची पाने आपण अळूवडीसाठी वापरतो.

अमरबाबा

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 24/08/2016 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
गावात पोहोचताच बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याजवळच्या मोकळ्या जागेत त्याने गाडी उभी केली. हौद्यातून गुंडाळलेले पोस्टर काढून बाहेर टांगले. 'हिमालयकी अद्भुत चमत्कारी जडीबूटीयो का चमत्कार' अशी अक्षरे असलेल्या त्या फलकावर बर्फाचा डोंगर व त्यात मधूनमधून उगवलेल्या काचेच्या, जडीबुटी भरलेल्या बरण्या असे विचित्र चित्र होते. काही वेळातच मेगाफोनवर एक टेप लागली. अमरत्व बहाल करणारी जडीबुटीवाला बाबा गावात आलाय, ही वार्ता लगेचच वाऱ्यासारखी फैलावत सुटली. बघता बघता गाडीभोवती गर्दी जमली. बाबानं आपल्या सहकाऱ्याला खूण केली, आणि बाबाचं भाषण सुरू झालं.

बादलीयुद्ध ११

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 23/08/2016 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
सुमडीत कुमडी म्हणून त्यादिवशी नुसताच बसून राहिलो. परीक्षेचे दिवस फार वैतागवाणे. म्हणजे रात्रीसुध्दा डोके वगैरे ओले करुन अभ्यासाला बसणे ही माझी पद्धत होती. पुस्तकात जरा कुठं डोकं घातलं की मन कुठल्यातरी डोंगरावर वगैरे जाऊन भटकायचं. हे फार वाईट. मागं एकदा कुणी सांगितलं होतं की पेटत्या मेनबत्तीकडे एकटक बघत राहावे. मी लाईट वगैरे बंद करुन तसा बघत ही बसलो होतो. बराच वेळ. मग भीतीच वाटायला लागली. बरीच भुतंबितं आजूबाजूला वावरत असल्यासारखी वाटायला लागली. म्हटलं नकोच हे. नंतर पुस्तक उघडल्यावर अक्षरं दिसायची पंचाईत झाली. ते वेगळंच. नंतर भिंतीवर एक कोरा कागद लावला. त्याच्या मधोमध ठिपका वगैरे.

दुर्गदुर्गेश्वर रायगड ------ एक स्वर्गीय अनुभव!

लेखक शान्तिप्रिय यांनी मंगळवार, 23/08/2016 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो. मैत्रिणींनो , सर्व प्रथम सर्व मिपाकरानी मला रायगडाबद्दल दिलेल्या माहितीबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! हिंदवी स्वराज्याचा दैदिप्यमान इतिहास , शिवचरित्र वाचून कृतकृत्य झाल्यानंतर शिवाजी महाराजांचे सर्व किल्ले बघण्याचा मनोदय अतिशय उशिरा आणि हळूहळू का होईना पूर्ण होत आहे. आतापर्यंत सिंहगड, सज्जनगड कित्येक वेळा पाहिला. पण इतर किल्ले पाहण्याचे जमत नव्हते. दुर्गदुर्गेश्वर रायगड रोपवेसकट पाहण्याचे मनात होते. आणि हा योग २० ऑगस्ट ला जमून आला. सुरुवातीला पाच जण मित्राच्या कारमधून जाण्याचा बेत होता पण नेहमीच्या अनुभवाप्रमाणे पाच पैकी तीन गळलेच! पण ही इष्टापत्ती होती.

आदरांजली -१ टोबा टेक सिंह

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 23/08/2016 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
स़ाअदत हसन मन्टो Simple, Free Image and File Hosting at MediaFire मित्रांनो, ज्या प्रमाणे इस्मत चुगताईच्या तीन कथांचे भाषांतर करुन मी त्यांना आदरांजली वाहिली होती त्याचप्रमाणे अजून एका लेखकाला आदरांजली वाहतोय. तीन कथांचे भाषांतर करुन. अर्थात तुम्ही त्या वाचल्या असतील पण मी हे माझ्या समाधनासाठी लिहितोय असे समजुयात.....

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग १ - सहलीचा पहिला दिवस

लेखक विहंग३००७ यांनी मंगळवार, 23/08/2016 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
जॉर्डन – पश्चिम आशियातल्या धगधगत्या वाळवंटी प्रदेशात शांतता आणि स्थैर्य टिकवून ठेवलेला एक चिमुकला देश. उत्तरेकडे सिरीया, पश्चिमेकडे इस्रायल व पॅलेस्टाईन, दक्षिणेकडे सौदी अरेबिया, तर पूर्वेकडे इराक अशा सतत ‘चर्चेत’ असणाऱ्या देशांच्या मध्ये राहून जॉर्डनने मोठ्या हिमतीने एक सुस्थिर राष्ट्र निर्माण केले आहे. जर्मनीहून भारताकडे येताना एकदा एजंटने रॉयल जॉर्डानियन या विमान कंपनीची तिकिटे हातात ठेवली. नाताळच्या सुट्टीमुळे विमानाची तिकिटे महागच होती. त्यातल्या त्यात याच कंपनीची तिकिटे जरा परवडणाऱ्या दरात मिळत होती. मात्र अम्मान (जॉर्डन ची राजधानी) येथे १३ तासांचा स्टॉप-ओवर होता.

गावाकडची गोष्ट (भाग 4 ) शेवटचा

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 23/08/2016 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १: http://www.misalpav.com/node/37022 भाग २: http://www.misalpav.com/node/37041 भाग 3: http://www.misalpav.com/node/37058 भाग ४  ते गोदामाच्या दिशेने निघाले आणि मी त्यांच्या मागे. गोदामाच्या दारापाशी जीवा उभा होता. "आत कोणाला सोडू नकोस. मी आणि दिघे एकूण लाकडांची मोजणी करून लगेच बाहेर येतो आहोत." अस म्हणून मालक गोदामात शिरले.

मोहोन्जो- दारो: एक हुकलेली संधी (स्पॉयलर अलर्ट: हाय!!!)

लेखक ए ए वाघमारे यांनी मंगळवार, 23/08/2016 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
स्पॉयलर अलर्ट लेवल: हाय !!!) आशुतोश गोवारीकर हा एक प्रामाणिक सिनेमाकार आहे. तो जीव तोडून मेहनत करत सिनेमे काढतो. पण त्याचं दुर्दैव म्हणा किंवा प्रयत्नांची- अभ्यासाची कमतरता म्हणा, कुठेतरी कमी पडतो. त्याचा नवा 'मोहोन्जो-दारो'ही या लौकिकाला अपवाद नाही. लगान, जोधा अकबर यासारखं प्रत्येकवेळी मोठ्या कॅनव्हासवर चित्र काढायाची हौस कितीही असली तरी चित्राच्या विषयात आणि ते चितारणार्‍या कुंचल्यात तेव्हढा दम हवा नाहीतर 'गवत खाणारी गाय' या चित्रासारखी त्याची गत होते आणि पाहाणार्‍याला गवतही दिसत नाही अन् गायही.