पुणे परिसरातील चित्रपट रसिकांसाठी महत्त्वाचे..!!
पुणे परिसरातील चित्रपट रसिकांसाठी महत्त्वाचे..!!
पुण्याच्या 'राष्ट्रीय फिल्म संग्रहालयातर्फे देशोदेशीचे उत्तम चित्रपट दाखवणारा फिल्म क्लब चालवला जातो. दर शनिवारी संध्याकाळी सहा वाजता संग्रहालयाच्या प्रभात रोड येथील इमारतीमधील थिएटरमधे हे चित्रपट दाखवले जातात. या फिल्म क्लबची वार्षिक वर्गणी रु. १,५००/- आहे. हा खर्च आपल्या मल्टिप्लेक्स संस्कृतीत सुमारे तीन ते चार चित्रपट पाहण्याइतका आहे. यात वर्षभरात देशोदेशीचे निवडक असे किमान ५२ चित्रपट पाहता येतात. याशिवाय जानेवारीमधे पुण्यात होणार्या इंटरनॅशनल फेस्टिवलच्या पासाच्या किंमतीत सवलत मिळते.
मिसळपाव
.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------