Skip to main content

मेट्रो प्रवासात मनुस्मृति वर चर्चा - ब्राम्हण आणि शुद्र

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 25/03/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशातल्या एका मोठ्या प्रसिद्ध विश्वविद्यालय जेथून समाजात बदल घड्विनारे अनेक बुद्धिमंद तैयार होतात. तेथील विद्यार्थांनी मनुस्मृति जाळली. तेथे उपस्थित असलेल्या अधिकांश विद्यार्थांनी मनुस्मृति कधी वाचली हि नसेल. मनुस्मृति जाळण्याचे कारण काय बरे असेल. विद्यार्थांच्यामते शूद्रांचे शोषण करण्यासाठी ब्राह्मणांनी लिहिलेला ग्रंथ अश्यारीतीची काही त्रोटक माहितीच या ग्रंथा बाबत विद्यार्थांना असेल. कदाचित त्या वरून त्यांनी मनुस्मृति जाळण्यातचे ठरविले असेल किंवा कुणी आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर केला असेल. जिथे मनुष्यच परिपूर्ण नाही तिथे मनुष्याने लिहिलेला कुठला हि ग्रंथ परिपूर्ण राहू शकत नाही.

हॅप्पी बर्थडे व.पु.

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 25/03/2016 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
'One for the road' असलेल्या या जगात कायम 'जेके मालवणकर' सारखं जगण्याची प्रेरणा देऊन माझ्या 'पार्टनर' असलेल्या 'सखी' शी कायम प्रामाणिक राहण्याची शिकवण देणारा 'दोस्त' म्हणजे व.पु. तुला माहितीये गेल्या वर्ष भरात कित्येक जणांनी 'रंग मनाचे' दाखवलेत. या दुनियेच्या 'भूलभुलैया' मध्ये 'माझं माझ्यापाशी' काहीच राहिलेलं नसताना मनात प्रेरणेचा 'हुंकार' भरून या 'तप्तपदी' वर चालण्याचं बळ तूच दिलंस. तुझ्या प्रत्येक शब्दांत एक जादू भरलेली आहे, जी जगण्याची अखंड प्रेरणा देत राहते.

सडमाडं

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 24/03/2016 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
कळी, भात, वांग्याची आमटी, आन चपाती पत्रावळीवर आल्यावर बब्यानं जेवायला सुरु केलं. आण्या मात्र कोशिंबीरीची वाट बघत खाऊ का गिळू अवस्थेत ताटकळला होता. रामाला हाकावर हाका मारुन कोशिंबीर त्यानं त्याच्या पंगतीत फिरवायची व्यवस्था केली. चार पळ्या कोशिंबीर त्याच्या पत्रावळीत पडली तवा त्याच्या जिवात जीव आला. तरी अजून पापड्या यायच्या बाकी होत्या. मग गर्दीत हरवलेल्या पापडीवाल्याच्या शोधात त्यांच्यावर बारीक नजर ठेवतच आण्यानं जेवन झोडायला सुरुवात केली. वाढपी दुरडी घेऊन फिरत होते. दुरडीत भात का कळी हे खाली बसून कळत नव्हतं. बब्या वाढप्याला बोलवायचा आणी त्याचा दुरडीत जे आसल ते घ्यायचा.

पुढच्यास ठेच मागचा शहाणा

लेखक उल्का यांनी गुरुवार, 24/03/2016 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
(इथे कोणतीही पाककृती दिलेली नाही. स्वयंपाक करताना आपले काहीना काही चुकते आणि त्यातून आपण शिकत जातो. अशाच माझ्या चुकांविषयी हा लेख आहे. दुसऱ्यांकडून त्या कधीही होऊ नयेत म्हणून लिहिलेला! खास नवशिक्यांसाठी! जाणकारांना मात्र बाराखडी वाटेल यात शंका नाही.) लहानपणापसून आईच्या मागे मागे करीत स्वयंपाक घरात लुडबुड करणे हा माझा आवडता छंद होता. त्यामुळे मोठी होता होता मी जरा लौकरच स्वत:ला स्वयंपाकात कुशल (गैर)समजू लागले. तर अशी अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली मी फजितीला कशी सामोरी गेले त्याचीच ही थोडक्यात हकीकत. तेव्हा मी २० वर्षांची असेन.